Summer Season: उन्हाळ्यात फळबागांचे योग्य व्यवस्थापन केले तरच उत्पादन भर, लिंबूवर्गीय फळबागांचे ‘असे’ करा नियोजन!

अवकाळी काय अन् वाढत्या उन्हाच्या झळा काय...दोन्हीमुळेही फळबागांचे नुकसान हे ठरलेलेच आहे. सध्याच्या वाढत्या उन्हामुळे फळबागांच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. तीव्र उष्णता आणि झळा यांचा परिणाम संत्रा, मोसंबी व लिंबू फळबागांमध्ये होतो. प्रामुख्याने नवीन आलेली कोवळी नवती करपणे, आंबिया बहराची लहान फळांची फळगड, खोड तडकणे, झाडे निस्तेज दिसणे, नवीन कलमांमध्ये मर होणे असे विविध दुष्परिणाम दिसून येतात. राज्यातील अमरावती, नागपूर आणि मराठावड्यातील काही भागातील फळपिकांचे नुकसान झाले आहे.

Summer Season: उन्हाळ्यात फळबागांचे योग्य व्यवस्थापन केले तरच उत्पादन भर, लिंबूवर्गीय फळबागांचे 'असे' करा नियोजन!
वाढत्या उन्हामध्ये फळबागांचे व्यवस्थापन गरजेचे आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 5:18 AM

औरंगाबाद : (Unseasonable Rain) अवकाळी काय अन् वाढत्या उन्हाच्या झळा काय…दोन्हीमुळेही फळबागांचे नुकसान हे ठरलेलेच आहे. सध्याच्या वाढत्या उन्हामुळे (Orchard) फळबागांच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. तीव्र उष्णता आणि झळा यांचा परिणाम (fruit crop) संत्रा, मोसंबी व लिंबू फळबागांमध्ये होतो. प्रामुख्याने नवीन आलेली कोवळी नवती करपणे, आंबिया बहराची लहान फळांची फळगड, खोड तडकणे, झाडे निस्तेज दिसणे, नवीन कलमांमध्ये मर होणे असे विविध दुष्परिणाम दिसून येतात. राज्यातील अमरावती, नागपूर आणि मराठावड्यातील काही भागातील फळपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील ही दुष्परिणामांची दाहकता कमी करण्यासाठी योग्य व्यवस्थापन आणि उपलब्ध साधन सामुग्रीचा वापर होणे गरजेचे आहे.

नव्याने लागवड केलेल्या रोपांची निघा

1) सध्याच्या वाढत्या उन्हामुळे नव्याने म्हणजे 1 वर्ष झालेल्या कलमांची, रोपांची कोवळे शेंडे सुकतात, पाने गळतात. अशा प्रसंगी नवीन लागवडीच्या रोपेजवळील किमान 2 ते 3 फूट परिघामधे सेंद्रिय पदार्थांचा किमान 10 सेंटिमीटर जाडीचा थर देऊन आच्छादन करावे लागणार आहे.

2) कलमांच्या जवळ 2 फूट अंतराच्या परिघात गोलाकार पद्धतीने बोरू बी पेरावेत. यामध्ये बोरूची झपाट्याने वाढ होऊन सभोवताली सावली राहते. परिणामी, कलमांचे तीव्र उन्हापासून व उष्ण वारा यापासून संरक्षण होते. बांबू, कामठ्यांच्या साह्याने तुराट्याचे झाप किंवा कूड तयार करून ते दक्षिण पश्चिम बाजूंनी लावावेत.

3) कोणत्याही फळाचे कलम हे 1 ते 3 वर्षे होईपर्यंत झाडांचा बुडाशी छोटा पाण्याचा माठ ठेऊन झाडांना पाणी देता येते. त्यासाठी छोट्या मडक्याला बुडाशी एक बारीक छिद्र पाडून ठेवावे लागणार आहे. त्यातून सुती कपड्याची वात बाहेर काढावी लागणार आहे.

4) उन्हामुळे बाष्पीभवन व पणौत्सर्जनाचा वेग अधिक असतो, त्यामुळे कलमे, रोपे यांची पाने लवकर कोमेजतात. अशा वेळी पोटॅशिअम नायट्रेट ( 13:0:45 ) 1 किलो प्रति 100 लिटर पाणी या प्रमाणे 20-25 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. यामुळे पानांतील पर्णोत्सर्जनाचा वेग कमी होतो.

मोठी झाडे व बागेचे नियोजन

पाण्याची कमतरता असणाऱ्या फळबागांमध्ये पाणी बचतीसाठी उन्हाळी हंगामात सेंद्रिय पदार्थांचे 10 सेंटिमीटर थर देत आच्छादन करावे लागणार आहे. किंवा काळ्या रंगाच्या पॉलिथिन पेपर (100 मायक्रॉन ) आच्छादन करावे लागते यामुळे झाडाजवळ ओलावा टिकून राहतो, आच्छादनामुळे जमिनीवर सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे तणाची वाढ होत नाही,जमिनीचे तापमान नियंत्रित राहते, सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन केले असल्यास कालांतराने कुजून त्यापासून उत्कृष्ट सेंद्रिय खत मिळते तर उन्हाळ्यात पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर वाढविता येते.

उन्हाळ्यामध्ये सिंचनाचे व्यवस्थापन महत्वाचे

हलक्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही भारी जमिनीपेक्षा कमी असते. हलक्या जमिनीला वरचेवर पाणी द्यावे लागते, तर भारी जमिनीमध्ये दोन पाणी पाळ्यांतील अंतर कमी असले तरी चालते. ठिबक सिंचनाने अत्यंत काटेकोरपणे व अचूक मोजून पाणी देता येते. पाण्याचा अपव्यय टाळला गेल्याने पाण्यामध्ये 40 ते 50 टकके पाणी बचत होते. यातून रासायनिक खतेही पाण्यासोबत मुळांच्या कक्षेमध्ये देता येतात. खतांची 30 टक्क्यांपर्यंत बचत होते. पाणी उपलब्ध असल्यास आंबिया बहराची फळे टिकून ठेवण्यासाठी ओलित सुर ठेवणे गरजेचे आहे.

(सदरील बातमीतील माहिती ही डॉ. योगेश इंगळे, डॉ. दिनेश पैठणकर यांच्या लेखातील आहे. तरी शेतकऱ्यांनी तज्ञांचा सल्ला घेऊन व्यवस्थापन करावे)

संबंधित बातम्या :

Central Government : Zero Budget शेतीसाठी मोठी आर्थिक तरतूद, शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

Solapur : अखेर ज्याची भीती तेच घडले, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे गणितच बिघडले

Sugarcane Sludge : ऊसतोड मजुरांसाठी कायपण! गाळप पूर्ण होण्यासाठी कारखान्याची अनोखी शक्कल

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.