AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सहा दिवसांमध्ये 6 लाख हेक्टराने वाढले नुकसानीचे क्षेत्र, पावसाचा कहर सुरुच

खरीपातून उत्पादन पदरी पडेल ही आशाच मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सोडून दिलेली आहे. आता केवळ नुकसानीचे आकडेवारी आणि मदतीबाबत सरकारची भुमिका एवढाच खरीपाचा विषय चर्चेचा राहिलेला आहे. सहा दिवसांपूर्वी मराठवाड्यातील 14 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने दिलेला होता.

सहा दिवसांमध्ये 6 लाख हेक्टराने वाढले नुकसानीचे क्षेत्र, पावसाचा कहर सुरुच
पावसामुळे खरीपातील पिकांची अशी अवस्था झालेली आहे
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 9:52 AM

लातूर : खरीपातून (Kharif Hangam) उत्पादन पदरी पडेल ही आशाच मराठवाड्यातील (Marathwada) शेतकऱ्यांनी सोडून दिलेली आहे. आता केवळ नुकसानीचे आकडेवारी आणि मदतीबाबत सरकारची भुमिका एवढाच खरीपाचा विषय चर्चेचा राहिलेला आहे. सहा दिवसांपूर्वी मराठवाड्यातील 14 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने दिलेला होता.

आता यामध्ये वाढ झाली असून तब्बल 20 लाख हेक्टरावरील पिकाचे नुकसान झाल्याचे विभागीय आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्याचत आले आहे. शिवाय 90 टक्के पंचनामेही पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, पावसामुळे नुकसानीचे क्षेत्र हे वाढतच असून आता पंचनाम्याची औपचारिकता न करता थेट मदतीची मागणी हे शेतकरी करीत आहेत.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर हा सुरुच आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु झालेला पाऊस हा आजही कायम आहे. त्यामुळे काढणीला आलेले सोयाबी, कापूस ही मुख्य पीके अजूनही वावरातच आहेत. शिवाय दोन दिवसांमध्ये मराठवाड्यातील सर्व मोठे प्रकल्प हे ओव्हरफ्लो झाले असून आता धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावलेली आहे. त्यामुळे धरणालगतच्या शेतातील पिके पाण्यात आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे.

मदतीचे निकष बदलले तर शेतकऱ्यांना दुपटीने फायदा

एनडीआरएफचे नुकसानभरपाई बाबतचे निकष हे दर पाच वर्षांनी बदलले जातात. परंतू, सहा वर्ष झाली तरी हे निकष बदतले गेले नाहीत. आतापर्यंत प्रति हेक्टरी 6800 रुपयांची मदत केली जात होती. वाढती महागाई लक्षात घेता किमान 12ooo हजार नुकसान भरपाई देण्याची मागणी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्राकडे केली आहे. त्यामुळे निकष बदलण्यात आले तर शेतकऱ्यांना त्याचा अधिकचा फायदा होणार आहे.

13 लाख 50 हजार हेक्टरावरील पंचनामे पूर्ण

मराठवाड्यातील खरीप पिकाचे वाढते नुकसान पाहता सरसकट पंचनामे करण्य़ाचे आदेश राज्य कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. गेल्या 10 दिवसांपासून पंचनामे करण्याची प्रक्रीया सुरु असून उस्मानाबा, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले आहे. दिवसेंदिवस नुकसानी क्षेत्राचा आकडा हा वाढत आहे. त्यामुळे वेळ लागला तरी चालेल पण शेतकरी मदतीपासून दूर राहू नये याची काळजी घेण्याचे आदेश मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. आता पर्यंत मराठवाड्यातील 13 लाख 50 हजार हेक्टरावरील पंचनामे पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले.

लातूर जिल्ह्यातही पावसाचे थैमान, सरसकट मदतीची मागणी

लातूर जिल्ह्यात आता पर्यंत 805.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत अधिकचा पाऊस झाला असून मांजरा धरणही पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. 18 दरवाजे हे उघडण्याता आले असून पाण्याचा मोठ्या प्रमाणास विसर्ग सुरु आहे. शिवाय नदी लगतच्या गावांचा संपर्क तुटलेला आहे. नदीलगतच्या शेत जमिनीमध्ये पाणी शिरल्याने शिरुरअनंपाळ तालुक्यातील सोयाबीन हे पाण्यात आहे. शिवाय सोमवारी रात्रभर पावसाची बॅटींग ही सुरुच होती तर मंगळवारी सकाळीही पाऊस सुरुच होता.

उस्मानाबादमध्ये शेतजमिन खरडून गेली

गेल्या दोन दिवसांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, वाशी या तालुक्यांध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे. अनेक लहान-मोठ्या प्रकल्पांचे सांडवे सोडण्यात आले आहेत. तर पावसामुळे सर्वाधिक सोयाबीनचे नुकसान झाले आहे. भूम- वाशी तालुक्यात अनेत शेतकऱ्यांची शेतजमिनही खरडून गेली आहे. शिवाय अणखीन पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने सोयाबीनची काढणी होणार की नाही हा शेतकऱ्यांसमोरील प्रश्न आहे. (Marathwada: Crop loss area increased by 6 lakh hectares in six days)

संबंधित बातम्या :

उभा कापूस आडवा, सोयाबीनला कोंब फुटले ; शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे

यंदा पेरणी दुबार, पंचनामेही दुबार अन् पाऊस सरासरी पार

खाद्य तेलावरील आयातशुल्क कमी करुनही दर तेजीतच

देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश.
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल.
भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती
भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती.
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?.
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला.
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी.
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती.
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग.