टेक्नो बळीराजा: शिवार ते मार्केट; अ‍ॅपच्या एका क्लिकवर माहितीचा खजाना

शेतकरी आणि कृषी बाजारपेठ यासाठी उपयुक्त ठरणारे विविध अ‍ॅप उपलब्ध आहेत. बाजारातील ट्रेंड्स, उपकरणे, तंत्रज्ञान आणि वापराच्या पद्दती यांच्या विषयी सर्वंकष माहिती एका क्लिकवर शेतकऱ्यांना उपलब्ध होते. शेतकरी अँड्रॉईड अ‍ॅप संबंधित सरकारी वेबसाईट किंवा गूगल प्ले स्टोअर वरुन डाउनलोड करू शकतो.

टेक्नो बळीराजा: शिवार ते मार्केट; अ‍ॅपच्या एका क्लिकवर माहितीचा खजाना
देशातील 36 कोटीहून शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ मिळत आहे.
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 11:40 PM

नवी दिल्ली : जगभरातील अद्ययावत माहिती तंत्रज्ञानामुळे (Information Technology) एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. शिक्षण ते अंतराळ सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कृषी क्षेत्रात (Agriculture) तंत्रज्ञानाच्या वापरामुळे माहितीची सुलभा उपलब्धता शक्य ठरली आहे. केंद्र सरकारच्या (Central Government) डिजिटल धोरणांना प्रोत्साहन देण्यामुळे ग्रामीण भागातही इंटरनेट वापराच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ नोंदविली गेली आहे.

शेतकरी आणि कृषी बाजारपेठ यासाठी उपयुक्त ठरणारे विविध अ‍ॅप उपलब्ध आहेत. बाजारातील ट्रेंड्स, उपकरणे, तंत्रज्ञान आणि वापराच्या पद्दती यांच्या विषयी सर्वंकष माहिती एका क्लिकवर शेतकऱ्यांना उपलब्ध होते. शेतकरी अँड्रॉईड अ‍ॅप संबंधित सरकारी वेबसाईट किंवा गूगल प्ले स्टोअर वरुन डाउनलोड करू शकतो. केंद्र सरकार सोबत निम-शासकीय आस्थापनांनी शेतकऱ्यांसाठी लाँच केलेल्या विविध अ‍ॅपची माहिती जाणून घेऊया

क्रॉप इन्श्युरन्स अँड्रॉईड अ‍ॅप (Crop Insurance Android App)

क्रॉप इन्श्युरन्स मोबाईल अ‍ॅपद्वारे शेतकऱ्यांना कृषी विम्याची माहिती उपलब्ध होते. विमा तपशील, हफ्ता, हफ्त्यांचे टप्पे, व्याजाचे दर याविषयीची सर्व माहिती अ‍ॅपद्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध होते.

पुसा कृषी (Pusa Krishi)

कीटक नियंत्रणाचा मोठा परिणाम कृषी उत्पन्नावर जाणवचो. वातावरणातील बदलामुळे पिकांवर विविध प्रकारचे रोग पडतात. पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होतो. कीटक व्यवस्थापनाचे अचूक ज्ञान असल्यास शेतकऱ्यांना खात्रीशीर उपायांची अंमलबजावणी करता येते. पिकांवरील विविध रोग व निर्मूलन उपाययोजना याविषयी माहिती एका क्लिकवर तुम्हाला हमखास उपलब्ध होईल.

किसान सुविधा (Kisan Suvidha)

हवामाचा अंदाच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा ठरतो. पिकाचे नियोजन करताना हवामानाचा अंदाजावर सर्व गणिते ठरतात. वर्तमान दिवस आणि पुढील 5 दिवसांच्या हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांना याद्वारे कळविला जातो. हवामानाच्या माहितीसोबत डीलर्स, बाजारभाव, कृषी सल्लागार, पीक संरक्षण, एकीकृत कीटक व्यवस्थापन याविषयी सर्व माहिती एका क्लिकवर शेतकऱ्यांना अ‍ॅपद्वारे उपलब्ध होते.

शेतकरी मासिक अँड्रॉईड अ‍ॅप (Shetkari Masik Android App)

शेतकरी मासिक डाउनलोड करण्यासाठी या अ‍ॅपचा वापर केला जाऊ शकतो आणि इंटरनेट कनेक्शन शिवाय शेतकरी वाचू शकतात. कृषी क्षेत्रात नावाजलेले “शेतकरी मासिक” प्रसिद्ध आहे. गेल्या साठ वर्षापासून शेतकऱ्यांना अधिकृत माहिती या मासिकाद्वारे उपलब्ध होते. महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाद्वारे मासिक प्रकाशित केले जाते.

एम-किसान अप्लिकेशन (MKisan Application)

अँड्रॉईड अ‍ॅपद्वारे शेतकरी व भागधारकांना संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ व सरकारी अधिकारी यांच्याद्वारे उपलब्ध असलेली माहिती उपलब्ध होते. एम-किसान पोर्टलवर शेतकऱ्यांना विविध माहिती उपलब्ध आहे.

इतर बातम्या :

रुपाली पाटील यांचा मनसेला अखेर ‘जय महाराष्ट्र’! अजित पवारांच्या उपस्थितीत हाती घड्याळ बांधणार

UPA Meeting : ममता बॅनर्जी यांची समजूत काढली जाणार, जबाबदारी शरद पवारांकडे?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.