Monsoon : खूशखबर.. देशात 10 दिवस आधी धडकणार मान्सून, 21 मेला केरळच्या किनाऱ्यांवर धडकू शकतो, इतर भागातही लवकर पाऊस येण्याची शक्यता

अरबी समुद्रात एन्टसायक्लोन क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सून लवकर केरळमध्ये पोहचण्याची शक्यता आहे. याच्या प्रभावामुळे पश्चिमी तटांवर आणि इतर भागातही लवकर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Monsoon : खूशखबर.. देशात 10 दिवस आधी धडकणार मान्सून, 21 मेला केरळच्या किनाऱ्यांवर धडकू शकतो, इतर भागातही लवकर पाऊस येण्याची शक्यता
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 10:36 PM

नवी दिल्लीउन्हाळ्याने त्रस्त झालेल्या सगळ्यांसाठीच एक आनंदाची बातमी आहे. देशात यावर्षी मान्सून 10 दिवस (Monsoon) आधीच धडकण्याची आनंदवार्ता मिळाली आहे. युरोपियन सेंटर फॉर मिडीयम रेंज् वेदर फोरकास्ट (Weather Forcast) या संस्थेने हा अंदाज वर्तवला आहे. केरळच्या समुद्रकिनाऱ्यांवर (Keral) 20 किंवा 21 मे रोजीच मान्सून धडकण्याची शक्यता आहे. इतर वेळी जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून देशात येतो, यावेळी मात्र तो 10 दिवस आधी येण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो देशात इतर भागात पोहचेल. सध्या बंगालच्या खाडीत हवामानातील बदलांचे संकेत मिळत आहेत, त्यानुसार अरबी समुद्रात एन्टसायक्लोन क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सून लवकर केरळमध्ये पोहचण्याची शक्यता आहे. याच्या प्रभावामुळे पश्चिमी तटांवर आणि इतर भागातही लवकर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वेळेवरच मान्सून येईल-हवामान खाते

तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने वेळेवरच मान्सून येईल, असे सांगितले आहे. सध्याच्या सॅटेलाईट इमेजेसवरुन मान्सून वेळेवर दाखल होईल, त्यात उशीर होणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामानव खात्यानुसार केरळमध्ये मान्सून १ जूनला पोहचेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. भूमध्य रेषेजवळ ढगांचा एक समूह तयार झाला आहे, जो बराच सक्रिय आहे. मान्सूनची प्रक्रिया लवकरच सुरु होील याचे हे संकेत असल्याचेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. स्कायमेट वेदर सर्व्हिसेसनेही मान्सून अपेक्षित वेळेच्या आसपास योईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

देशात 70 टक्के पर्जन्यमान दक्षिण पश्चिम मान्सूनमधून

केरळमध्ये १जूनला मान्सून धड़कल्यानंतर तो देशात सर्वदूर पसरतो. यात देशातील ७० टक्के भागावर पडणारा पाऊस हा दक्षिण-पश्चिम म्हणजेच नैऋत्येतून येणाऱ्या मान्सूनद्वारेच होतो. भारतातील रब्बी पिकांचे भवितव्य याच मान्सूनवर अवलंबून असते. देशात यंदा चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. युक्रेन युद्धाच्या काळात जगभरात महागाईचा भडका उडालेला असताना, देशात चांगला पाऊस होणे आणि वेळेवर मान्सून .येणे हे अत्यंत सुखकारक वृत्त म्हणावे लागेल.

हे सुद्धा वाचा

देशातील 40 टक्के शेतकरी मान्सूनवर अवलंबून

देशातील एकूण शेतकऱ्यांच्या संख्येच्या 40 टक्के शेतकरी हे पेरणीसाठी पावसावर अवलंबून आहेत. भात, कापूस, ऊस, सरस यांचे उत्पादन घेणाऱा शेतकरीवर्ग या मान्सूनकडे डोळे लावून बसलेला असतो. यापूर्वी देशाच्या हवामान विभागाने सलग चौथ्या वर्षी यंदा मान्सून वेळेवर आणि सुरळीत पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. दरम्यानच्या काळात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटकाही अनेक राज्यांना सहन करावा लागला आहे. राज्यातही काही भागात अवकाळी पावसामुळे काही भागात शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.