AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टोचन यंत्रामुळे शेतकरी आनंदीत, दिवसभरात पाच एकर कापसाची लागवड

पाच एकर कापूस लागवडीसाठी दहा ते पंधरा मजुरांची गरज भासत होती. त्यासाठी दिवसाला तीन हजार रुपयापर्यंत मजुरी मजुरांना द्यावी लागत होती.

टोचन यंत्रामुळे शेतकरी आनंदीत, दिवसभरात पाच एकर कापसाची लागवड
nandurbar newsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 11, 2023 | 12:18 PM
Share

जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : नंदुरबार (nandurbar) जिल्ह्यात बागायतदार शेतकऱ्यांकडून (farmer news) मान्सूनपूर्व कापूस लागवड सुरू झाली असली, तरी मजुरांच्या टंचाईमुळे कापूस लागवडीवर परिणाम होत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी टोकन यंत्रद्वारे कापूस लागवडीला प्राधान्य दिले असून, एका मजुराच्या साह्याने दिवसभरात पाच एकर कापसाचे लागवड (cotton crop cultivation) करता येते. यामुळे मजुरीचा खर्च, बियाण्याचाही खर्च आणि वेळेची ही बचत होण्यास मदत होत आहे. जमिनीत योग्य खोलीवर आणि योग्य अंतरावर लागवड होत असल्याने उगवण क्षमता ही चांगले असल्याचे दिसून आले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी एक लाख 40 हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर कापूस लागवडीची शक्यता आहे. मात्र मजूर मिळत नसल्यामुळे कापूस लागवडीसाठी शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या उभी राहिली होती. शेतकऱ्यांनी मार्ग काढत कृषी विज्ञान केंद्राचा मार्गदर्शनाखाली हरभरा आणि मका लागवडीसाठी असलेल्या टोचन यंत्राचा साह्याने कापूस लागवड सुरू केली आहे. यातून कमी बियाण्यात आणि समान अंतरावर कापसाची लागवड होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे अशी माहिती शेतकरी लालसिंग राजपूत यांनी दिली.

पाच एकर कापूस लागवडीसाठी दहा ते पंधरा मजुरांची गरज भासत होती. त्यासाठी दिवसाला तीन हजार रुपयापर्यंत मजुरी मजुरांना द्यावी लागत होती. तसेच कापसाचे बियाणेही जास्त लागायचे आणि कापसाच्या दोन झाडातील अंतर कमी जास्त होत असल्याने त्याचा परिणाम उत्पन्नावरही होत होता. मात्र या मशीनच्या सहाय्याने कापूस लागवड केल्यास मजुरीच्या पैशात आणि बियाण्याच्या पैशातही बचत होत असल्याचे शेतकरी सांगतात.

कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने कापूस लागवडीचे प्रात्यक्षिक केल्यानंतर या मशीनद्वारे कापूस लागवडीचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला. त्यानुसार शेतकऱ्यांनी या यंत्रणाच्या उपयोग केला असून, यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असून मनुष्यबळ उपलब्ध नसतानाही वेळेत कापसाची लागवड पूर्ण होत असल्याने ते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. बाजारात विविध कंपनीद्वारा मका आणि हरभरा लागवडीसाठी हे मशीन उपलब्ध होते. मात्र आता त्याचा वापर कापूस लागवडीसाठी होत आहे.

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.