Video | बळीराजाला अवकाळीचा पुन्हा तडाखा , काढणीला आलेली पिकं मातीमोल

अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या गहू, हळद, हरभरा, ज्वारी,भाजीपाला या पिकांचं नुकसान झालंय. crops lost unseasonal rains

Video | बळीराजाला अवकाळीचा पुन्हा  तडाखा , काढणीला आलेली पिकं मातीमोल
अवकाळी पावसानं शेतीचं नुकसान
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 6:10 PM

मुंबई: शेतकऱ्यांवरील संकट काही थांबत नसल्याचं चित्र आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. त्यासोबतच खरीप हंगाम काढणीला आलेला असताना अतिवृष्टी, महापूर यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. आज राज्यातील नाशिक, बुलडाणा, वाशिम, अमरावतीमध्ये  वर्धा परभणी, चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. ( Nashik Buldana Washim Wardha Parbhani and Chandrapur Farmers lost crops due to unseasonal rains)

नाशिकच्या निफाडमध्ये द्राक्ष उत्पादकांचं नुकसान

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने द्राक्षांना बाजार भाव मिळत नसल्यामुळे आधीच चिंताग्रस्त असलेल्या द्राक्ष उत्पादकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत, आहेरगाव पालखेड या गावातील परिसरातील जोरदार हजेरी लावली. काढणीला आलेल्या द्राक्ष, गहू व कांदा पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडला.

परभणीच्या सोनपेठ तालुक्याला गारपीटीचा तडाखा

परभणीच्या सोनपेठ तालुक्यात गारपीटीचा तडाखा बसलाय. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या गहू, हळद, हरभरा, ज्वारी,भाजीपाला या पिकांचं नुकसान झालंय. हवामान विभागाने राज्यात तीन दिवस अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर परभणी जिल्ह्यातील पालम,पूर्णा, गंगाखेड भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सोनपेठ तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा वर्षाव झालाय. निळा वंदन आणि उखळी गाव परिसरात बोराच्या आकाराच्या गारा कोसळलेल्या, यामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय,परिसरातील शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी सरकारकडे केलीय.

वर्धा जिल्ह्यात आर्वी तालुक्यात मोठ नुकसान

वर्धा जिल्ह्यात दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि वादळानं मोठं नुकसान झालंय. यात संत्रा, गहू, चणा, भाजीपाला, फळ पिकांच अतोनात नुकसान झालंय.आर्वी तालुक्यात वीज पडून एका जनावराचा मृत्यू झालाय. गुरुवारी, शुक्रवारी वर्धा जिल्ह्यात आर्वी, कारंजा भागाला वादळाचा जोरदार तडाखा बसला. शुक्रवारी रात्रीदेखील जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात विजांचा कडकडाट, वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. प्राथमिक माहितीनुसार वादळामुळे आर्वी तालुक्यात ५ घरे, २ गोठ्यांचे, कारंजा तालुक्यात एका घराचे नुकसान झालंय.

शासकीय यंत्रणेकडून नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. अनेकांचा गहू, चणा काढणीला आला असून अचानक आलेल्या पाऊस आणि वादळात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळामुळे काही भागात वीज पुरवठा तात्पुरता खंडित झाला होता.

वाशिममध्येही गहू, हरभऱ्याचं मोठं नुकसान

वाशिम जिल्ह्यात काल रात्री झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीने शिरपूर, चिखली सह अनेक गावात गहू,हरभरा, कांदाबीज,पपई,टरबूज, केळी सह भाजीपाला पिकांच प्रचंड नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे.त्यामुळं जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

वाशिम जिल्ह्यात खरिपातील सोयाबीन नंतर रब्बीत मोठ्या प्रमाणात कांदाबीज लागवड करतात. कांदाबीज काढणीला आला असताना काल रात्री गारपीट सह अवकाळी पावसामुळे 100 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळं गारपिटीने झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून भरीव मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

संबंधित बातम्या:

Special Report: महाराष्ट्रावर लॉकडॉऊनचे ढग? चांद्यापासून ते बांद्यापर्यंत 15 शहरं अ‍ॅलर्टवर; वाचा सविस्तर!

मरावाड्यात कोरोनाता वाढता धोका, औरंगाबाद आणि परभणीत प्रशासनाकडून महत्वाचे निर्णय

( Nashik Buldana Washim Wardha Parbhani and Chandrapur Farmers lost crops due to unseasonal rains)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.