कृषीमंत्री आणि अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यात अवकाळी पावसानं बळीराजा दुहेरी संकटात
अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. (Nashik District Grapes Farmers )
नाशिक: राज्यभरात ग्रामपंचायतीच्या निवडणुका जरी शांततेत पार पडल्या आहेत. मात्र, या ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामात तलाठी आणि कृषी अधिकारी अडकले आहेत. अवकाळी पावसाने शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. द्राक्ष पिकांचे नुकसान आणि शेतातील नुकसानाचे पंचनामे होऊ न शकल्यामुळे नुकसान झालेल्या शेतीमालाची विल्हेवाट कशी लावावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. रखडलेले पंचनामे आणि नुकसान अशा दुहेरी संकटात बळीराजा अडकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हे चित्र राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या नाशिक जिल्ह्यातील आणि अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला-लासलगाव विधानसभा मतदार संघातील येवला तालुक्यामध्ये गावोगावी पाहायला मिळते. (Nashik District Grapes Farmers got into trouble due to rain)
अवकाळी पावसाचा फटका
द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यात सह येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, मुखेड, नेऊरगाव, देशमाने, मानोरी खुर्द आदी परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे उत्पादन घेत असतात. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भावामुळे लाखमोलाचे द्राक्ष कवडीमोल भावात देण्याची नामुष्की आली होती. यंदा द्राक्ष उत्पादकांनी मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे उत्पादन घेतल्यानंतर डिसेंबरअखेर द्राक्षांचे दर्जेदार उत्पादन निघेल अशी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, आधी थंडी आणि आता अरबी समुद्रात झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अवकाळी पाऊस, दाट धुके आणि दव पडल्याचा परिणाम द्राक्षबागांवर झाला. तोडणीला आलेल्या निर्यातक्षम द्राक्ष मण्यांना मोठ्या प्रमाणात तडे गेले असून घडांवर बुरशीचा ही प्रादुर्भाव झाल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेला.
धावत्या जगाचं, धावतं बुलेटीन, पाहा न्यूज टॉप 9, दररोज रात्री 9 वा. टीव्ही 9 मराठीवर
तलाठी, कृषी अधिकारी ग्रामपंचायत निवडणुकीत व्यस्त
येवला तालुक्यातील मानोरी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी भानुदास शेळके यांच्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामात तलाठी आणि कृषी अधिकारी व्यस्त आपल्यामुळे पंचनामे करण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. पंचनामे न झाल्यानं द्राक्षांचे नुकसान झालेल्या शेतीमालाची विल्हेवाट लावण्यासाठी अडचणी निर्माण झाल्याचं भानुदास शेळके या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यानं सांगितले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देत भरघोस नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वाल्मिक शेळके या शेतकऱ्यानं केली आहे.
राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्यात जर ही परिस्थिती शेतकऱ्याची असेल तर इतर जिल्ह्यांमध्ये काय असेल?, असा प्रश्न यानिमित्ताने आता उपस्थित होतो.
Photo : साधेपणाची जाणीव करुन देणारे ‘आयएएस सुनिल केंद्रेकर’ यांचे हे फोटोhttps://t.co/RSCuXxm4hs @kendrekarsunil #SunilKendrekar #aurangabad
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 16, 2021
संबंधित बातम्या:
रद्दी देता का रद्दी; रद्दीच्या टंचाईमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल
Weather Update : कोकणासह अनेक जिल्ह्यांत पावसाला सुरुवात, बळीराजा चिंतेत
(Nashik District Grapes Farmers got into trouble due to rain)