Onion Price Today: शेतकऱ्यांच्या मागणीला यश, आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजार समिती सुरु

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे गेल्या 13 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात बंद असलेल्या 15 बाजारसमित्या सुरु झाल्या आहेत. Nashik Lasalgaon onion auction

Onion Price Today: शेतकऱ्यांच्या मागणीला यश, आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजार समिती सुरु
लासलगांव बाजार समिती
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 1:22 PM

नाशिक: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे गेल्या 13 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात बंद असलेल्या 15 बाजार समित्या सुरु झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर आशियातील कांद्याची सर्वात मोठी बाजार समिती लासलगावमध्ये कांद्याचे लिलाव सुरु झालेत. बाजार समित्यांमध्ये आजपासून कांद्याचे लिलाव पुर्ववत सुरू झाल्याने आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. (Nashik Lasalgaon and other apmc resume auction of onion from today)

कोरोना रोखण्यासाठी बाजारसमित्या 12 मे पासून बंद

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्यामुळे लासलगावसह जिल्ह्यातील कांद्याच्या प्रमुख 15 बाजार समित्या 12 मेपासून बंद ठेवण्यात आल्या होत्या. आज पासून लासलगावसह सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा व धान्यचे लिलाव पूर्ववत सुरू झाले आहेत. लिलावला येताना शेतकऱ्यांनी कोरोनाची चाचणी करून येणे तसेच वाहन नोंदणी करणे बंधनकारक केली आहे. त्यानंतर बाजार समिती आवारात शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालासह प्रवेश दिला जाणार आहे,अशी माहिती लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली.

लासलगाव बाजारसमितीत 500 गाड्या दाखल

लासलगाव बाजार समितीमध्ये 500 वाहनातून आलेल्या कांद्याला कमाल 1571 रुपये, किमान 700 रुपये तर सर्वसाधारण 1400 रुपये इतका बाजार भाव मिळाल्याचे बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगतिलं आहे.

शासनाच्या नियमांचं पालन करु, बाजारसमित्या सुरु ठेवा

गेल्या 13 दिवसांपासून बाजार समितीमध्ये कांदा लिलाव हे बंद होते व ते आज सुरु झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण बघायला मिळाले. बाजार समितीमध्ये येताना आम्ही शासनाचे नियमांचे पालन करू शासनानं बाजार समिती सुरू ठेवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

गेल्या 13 दिवसांपासून लासलगावसह जिल्ह्यातील प्रमुख 15 बाजार समित्या बंद होत्या. आज कांदा लिलाव पूर्ववत सुरू करण्याअगोदर शेतकऱ्यांची कोरोना तपासणी लासलगाव प्रवेशद्वारावर करण्यात आली. बाजार समिती आवारात आलेले कांदा वाहन तपासणीनंतर सोडण्यात आले.

संबंधित बातम्या:

दर महिन्याच्या अमावस्येला लासलगाव बाजार समिती असते बंद, कारण….!

सरकारने 39.55 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले 75 हजार कोटी, नेमकं कारण काय?

(Nashik Lasalgaon and other apmc resume auction of onion from today)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.