Puntamba : आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांना नोटीसा, काय आहे शेतकऱ्यांचा आरोप?

राज्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन पुणतांबा येथे शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरवात केली आहे. शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले होते. एवढेच नाही तर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यावर आंदोलन छेडले जाणार असल्याचे निवेदनात नमूद करण्याता आले होते. असे असताना देखील शेतकऱ्यांच्या मागणीकडे तर सरकराने दुर्लक्ष केलेच आहे शिवाय आंदोलकांनाच नोटीसा बजावल्या आहेत.

Puntamba : आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांना नोटीसा, काय आहे शेतकऱ्यांचा आरोप?
पुणतांबा शेतकरी आंदोलन
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 2:32 PM

शिर्डी : अहमदनगर जिल्ह्यातील (Puntamba) पुणतांबा येथे 1 जून रोजी 5 वर्षानंतर पुन्हा शेतकरी आंदोलनाला सुरवात झाली आहे. 5 दिवस हे (Dharna movement) धरणे आंदोलन होणार असताना पहिल्याच दिवशी हे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे समोर आले आहे. कारण बुधवारी सकाळी बळीराजाला दुग्धाभिषेक घालून आंदोलनाला सुरवात होताच अवघ्या काळात वेळात आंदोलनाचे नेते आणि पुणतांबा गावचे सरपंच धनंजय धनवटे यांच्यासह इतरांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे (Farmer) शेतकऱ्यांचे आंदोलन हे मोडीत काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप आता शेतकऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे आगामी पाच दिवसांमध्ये आणखीन काय घडामोडी घडणार हे पहावे लागणार आहे.

आंदोलनावर शेतकरी ठाम

राज्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन पुणतांबा येथे शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरवात केली आहे. शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले होते. एवढेच नाही तर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यावर आंदोलन छेडले जाणार असल्याचे निवेदनात नमूद करण्याता आले होते. असे असताना देखील शेतकऱ्यांच्या मागणीकडे तर सरकराने दुर्लक्ष केलेच आहे शिवाय आंदोलकांनाच नोटीसा बजावल्या आहेत. असे असले तरी 5 दिवस धरणे आंदोलन पारच पडणार असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी भूमिका घेतली आहे.

पुणतांब्याच्या आंदोलनाला वेगेळेच महत्व

शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या घेऊन पुणतांबा ग्रामपंचायतीसमोर मोठ्या सभामंडपात शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरु झाले आहे. आज आंदोलनाचा पहिला दिवस असला तरी पुढील काळात या ठिकाणी राज्यभरातून शेतकरी येणार आहेत. शिवाय 2017 साली येथूनच सुरु झालेले आंदोलन राज्यभऱ पसरले होते आणि या आंदोलनानंतर राज्य सरकारलाही शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे येथील आंदोलनाला यश मिळतेच अशी धारणा झाली असून आता पहिल्याच दिवशी पोलीस प्रशासनाने कारवाईच्यान अनुशंगाने पावले उचलली आहेत.

हे सुद्धा वाचा

या आंदोलकांना नोटीसा

पुणतांबा ग्रामपंचायतीच समोर बुधवारी सकाळी 11 वाजता आंदोलनाला सुरवात झाली होती. दरम्यान, दोन तासाचा आवधी जाताच गावचे सरपंच धनंजय धनवटे , सुहास वहाडणे , धनंजय जाधव , बाळासाहेब चव्हाण , सुभाष कुलकर्णी , सभाष वहाडणे या नेत्यांना सीआरपीसी १४९ अन्वये नोटीस बजावली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नसल्याचे कारण नोटीसीत नमुद करण्यात आले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये आम्ही आंदोलनावर ठाम असल्याची भुमिका आंदोलकांनी व्यक्त केलीय .

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.