Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांनो हीच ‘ती’ योग्य वेळ, रब्बी हंगामाबाबत महत्वपूर्ण सल्ला

आता जो अंदाज वर्तवण्यात आला आहे तो शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. 8 नोव्हेंबरपासून हवामान हे कोरडे राहणार असून या दरम्यान शेतकऱ्यांना चाढ्यावर मूठ धरायला पोषक वातावरण राहणार आहे. त्यामुळे या आठवड्यात रब्बी हंगामाच्या रखडलेल्या पेरणी कामाला वेग येणार आहे. शिवाय दिवाळी सणही संपला असून आता बळीराजाची लगबग ही सुरु झाली आहे.

शेतकऱ्यांनो हीच 'ती' योग्य वेळ, रब्बी हंगामाबाबत महत्वपूर्ण सल्ला
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 11:01 AM

लातूर : हवामान विभागाने (weather experts advise farmers) अंदाज वर्तवला आणि तो ‘फेल’ ठरला असे या वर्षी घडलेच नाही. विशेष: पावसाबाबतचे अंदाज हे खरे ठरलेले आहेत. त्यामुळे शेतकरी हे सतर्क राहिले आणि होणारे नुकसानही टळले आहे. (sowing conducive environment) आता दिवाळीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली तर मराठवाड्यासह उत्तर महराष्ट्रात पावसाने हजेरी लावली होती. पण आता जो अंदाज वर्तवण्यात आला आहे तो शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. 8 नोव्हेंबरपासून हवामान हे कोरडे ( Weather dry) राहणार असून या दरम्यान शेतकऱ्यांना चाढ्यावर मूठ धरायला पोषक वातावरण राहणार आहे. त्यामुळे या आठवड्यात रब्बी हंगामाच्या रखडलेल्या पेरणी कामाला वेग येणार आहे. शिवाय दिवाळी सणही संपला असून आता बळीराजाची लगबग ही सुरु झाली आहे.

खरिपात झालेल्या पावसामुळे यंदा रब्बीचा हंगाम हा तब्बल महिन्याने लांबणीवर पडलेला आहे. शिवाय ऐन दिवाळीतच अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या समस्येच भरच पडली होती. पण आजपासून (सोमवार) हवामान हे कोरडे राहणार असून वाफसा झालेल्या क्षेत्रावर पेरणी करण्याची हीच योग्य वेळ असल्याचा सल्ला हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिला आहे. शिवाय गेल्या वर्षभरापासून डख यांनी वर्तवलेल्या अंदाजाचा फायदा केवळ मराठवाड्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना झालेला आहे.

12 टक्केच रब्बीच्या पेरण्या

यंदा अधिकच्या पावसाचा परिणाम हा दुरगामी पाहवयास मिळालेला आहे. या पावसामुळे खरिपातील पिकांचे तर नुकसान झालेच पण रब्बी हंगामातील कामेही वेळेत आटोपता आलेली नाहीत. पावसामुळे शेत जमिनी ह्या चिभडलेल्या होत्या तर मशागत करुन पेरणीच्या तयारीत असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे आतापर्यंत राज्यात सरासरीच्या केवळ 12 टक्के पेरण्या झालेल्या आहेत. ज्या भागात पेरणीनंतर पाऊस झाला त्या मराठवाड्यात आता दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. कारण अपेक्षेपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने पेरलेली ज्वारी ही जळून जाते व तिच्या वाढीवर परिणाम होतो म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात रब्बीच्या दुबार पेरणीचा निर्णय शेतकऱ्यांना घ्यावा लागत आहे.

हरभरा, गव्हासाठी पोषक वातावरण

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात आता कोरडे वातावरण राहणार असून थंडीत वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आतापर्यंत गव्हाचा सर्वात कमी पेरा झाला आहे. अवकाळी पाऊस आणि चिभडलेली शेतजमिन यामुळे शेतकरी पोषक वातावरणाची वाट पाहत होते. अखेर आता पेरणीसाठी पोषक वातावरण झाले असून पेरणीचा टक्का वाढेल अशी अपेक्षा कृषी विभाग बाळगत आहे. हरभरा आणि गव्हाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या थंडीतही वाढ होणार आहे. त्यामुळे या आठवड्यात वेगळेच चित्र निर्माण होईल असा अंदाज आहे.

पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांना सल्ला

8 नोव्हेंबरपासून कोरडे वातावरण राहणार आहे. त्यामुळे रब्बीच्या रखडलेल्या पेरण्यांसाठी हेच पोषक वातावरण आहे. 12 नोव्हेंबरपर्यंत असेच कोरडे वातावरण राहणार असल्याने शेतकऱ्यांनी वेळ खर्ची न करता चाढ्यावर मूठ ठेवणे आवश्यक आहे. सोमवारपासून 5 दिवस वातावरण कोरडे राहणार आहे. त्यानंतर मात्र, पुन्हा चक्रीवादळाचा धोका कायम आहे. यंदा दर 10 ते 15 दिवसांनी चक्रीवादळाचा धोका राहणार असल्याने शेतकऱ्यांनी वेळेत कामे उरकणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

बीजप्रक्रिया महत्वाचीच

बीजप्रक्रिया केल्याशिवाय पेरणीच करु नये दरवर्षी शेतकरी हे पारंपारिक पध्दतीने पेरणीला सुरवात करतात. पण यंदा बीजप्रक्रिया करुनच पेरणी करावी लागणार आहे. म्हणेज रासायनिक खताची मिसळण किंवा जैविक पध्दतीने ही बीजप्रक्रिया करावी लागणार आहे.यामुळे हरभऱ्याला जो मर रोगाचा धोका असतो तो कमी होतो. शिवाय यंदा अधिकच्या पावसामुळे जमिनीत पाणी आहे. त्यामुळे जमिनीत बुरशीचेही प्रमाण असणार आहे. यापासून पेरणी केलेल्या बियाला धोका होऊ नये म्हणून ही बीजप्रक्रिया महत्वाची आहे.

संबंधित बातम्या :

औषधी वनस्पतीची शेती, 10 हजार रुपये क्विंटल असलेल्या वनस्पतीची भारतातून जगभरात निर्यात

आणेवारी सुधारली, शेतकऱ्यांची चिंता वाढली, यवतमाळ जिल्ह्याबाबत महसूल विभागाचा अहवाल

दुष्काळात तेरावा ; अवकाळी पावसामुळे लागवडीपूर्वीच कांद्याचा ‘वांदा’

दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?.
वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे - संसदीय मंत्री किरेन रिजिजू
वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे - संसदीय मंत्री किरेन रिजिजू.
गंगाजल शुद्धच पण.., शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचल
गंगाजल शुद्धच पण.., शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचल.
लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की नाही? दादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा
लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की नाही? दादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा.
वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना
वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना.
मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार.., दादांचं मिश्कील वक्तव्य
मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार.., दादांचं मिश्कील वक्तव्य.
"औरंगजेब इथं गाडलाय...", राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसेकडून बॅनरबाजी
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट.
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?.
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?.