AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Organic Farm : आता सेंद्रीय शेतीमालाचेही प्रमाणीकरण..! नेमका फायदा काय होणार ?

काळाच्या ओघात पुन्हा सेंद्रीय शेतीमालाच्या मागणीत वाढ होत आहे. मानवी आरोग्याच्या दृष्टीने हे महत्वाचे आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर न केलेला आणि नैसर्गिक पध्दतीने पिकवलेल्या शेतीमालाला मागणी अधिक आहे. पण सेंद्रीय शेतीमालाच्या इतर मालाचीही खरेदी-विक्री होऊ शकते. बोटावर मोजण्या इतपतच शेतकरी याची तपासणी करुन सेंद्रीय पध्दतीने उत्पादन घेतात. पण सर्वजणच या पध्दतीचा अवलंब करतील असे नाही.

Organic Farm : आता सेंद्रीय शेतीमालाचेही प्रमाणीकरण..! नेमका फायदा काय होणार ?
सेंद्रीय पध्दतीने उत्पादित होणाऱ्या शेतीमालाचे आता प्रमाणीकरण केले जाणार आहे. त्यासाठी यंत्रणा उभारली जाणार आहे.
| Updated on: May 05, 2022 | 10:21 AM
Share

पुणे :  (Certification of seeds) बियाणांचे प्रमाणीकरण केल्याशिवाय त्याचा पेरा करु नये याबाबत (Agricultural Department) कृषी विभागाकडून जनजागृती केली जाते. त्यामुळे बियाणांमधील गुणधर्म स्पष्ट होतात आणि उत्पादनवाढीसाठी त्याचा उपयोग केला जातो. बियाणांसाठी अशाप्रकारे महत्व दिले जात असले तरी (Organic Farm) सेंद्रीय शेतीमालाबद्दल अद्यापही उदासिनताच आहे. त्यामुळे सेंद्रीय शेतीमालाची गुणवत्ता तपासणीसाठी आता प्रमाणीकरणाची स्वतंत्र्य यंत्रणेची स्थापना केली जाणार आहे. यासंबंधी यापूर्वीच घोषणा झाली असली तरी अंमलबजावणी मात्र, दिवाळीपासून होणार असल्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. आरोग्याच्या दृष्टीने सेंद्रीय शेतीमालाची मागणी होते पण प्रत्यक्ष तो शेतीमाल सेंद्रीय पध्दतीने पिकवला आहे का? याचे मूल्यमापन होत नाही. त्यामुळेच ही प्रमाणीकरणाची यंत्रणा उभारली जाणार आहे.

नेमका फायदा काय होणार?

काळाच्या ओघात पुन्हा सेंद्रीय शेतीमालाच्या मागणीत वाढ होत आहे. मानवी आरोग्याच्या दृष्टीने हे महत्वाचे आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर न केलेला आणि नैसर्गिक पध्दतीने पिकवलेल्या शेतीमालाला मागणी अधिक आहे. पण सेंद्रीय शेतीमालाच्या इतर मालाचीही खरेदी-विक्री होऊ शकते. बोटावर मोजण्या इतपतच शेतकरी याची तपासणी करुन सेंद्रीय पध्दतीने उत्पादन घेतात. पण सर्वजणच या पध्दतीचा अवलंब करतील असे नाही. त्यामुळे ही प्रमाणीकरणाची पध्दत रुळली तर त्याचा फायदा ग्राहकांना तर होणार आहेच शिवाय दर्जात्मक शेतीमाल नागरिकांना मिळणार आहे.

दिवाळीपासून यंत्रणा उभी राहणार

राज्य सरकारने बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या धर्तीवर सेंद्रीय शेताीमाल प्रमाणीकरणासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची प्रक्रिया पूर्णत्वास गेली आहे. बीज प्रमाणीकरण यंत्रणेप्रमाणेच ही शेतीमाल प्रमाणीकरणाची संस्था नोंदणी करावी लागणार आहे. 11 जणांची कार्यकरणी निश्चित करण्यात आली आहे. 2015-16 पासूनच सेंद्रीय शेतीमाल प्रमाणीकरण उभारण्याच्या हलचाली सुरु होत्या अखेर दिवाळीपर्यंत गही सर्व प्रक्रिया पूर्ण होणार असून याचा शेतकऱ्यांना देखील फायदा होणार आहे.

राज्यात वाढणार सेंद्रीय शेतीमालाचे उत्पादन

अपेडाने सेंद्रीय शेतीमाल प्रमाणीकरणासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याची अट घातली होती. त्यामुळे ह्या यंत्रसामुग्री उभारण्याचे काम रखडले होते. पण आता हा प्रश्न मार्गी लागला असून लवकरच ही प्रणाली उभराली जाणार आहे. शिवाय सेंद्रीय शेतीमालाच्या प्रमाणीकरणमुळे ग्रामस्थांचा चांगल्या दर्जाचा माल मिळणारच आहे पण सेंद्रीय शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढणार आहे

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.