संकट कायम : आता कुठे लागला होता आंब्याला मोहर त्यात पुन्हा झाला अवकाळीचा कहर

यंदा अवकाळीचे संकट कायमच आहे. मोहर लागून फळधारणेच्या दरम्यानच्या झालेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. केवळ आंबाच नाही तर रब्बी हंगामातील प्रत्येक पिकासाठी अवकाळी मारक ठरत आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणातून एकतरी पीक पूर्ण क्षमतेने पदरी पडते की नाही अशी स्थिती झाली आहे. अमरावती, रायगड तसेच विदर्भातील काही भागांमध्ये अजून दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकरी धास्तावलेला आहे.

संकट कायम : आता कुठे लागला होता आंब्याला मोहर त्यात पुन्हा झाला अवकाळीचा कहर
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 2:22 PM

रायगड : पावसाने उघडीप देऊन महिन्याभराचाच कालावधी लोटला होता. पण या महिन्यात हजारो रुपये खर्ची करुन पुन्हा आंब्याला मोहर येण्याचे व्यवस्थापन केले होते. यातच वाढलेल्या थंडीमुळे (Mango Crop) आंब्याचा मोहरही वाढला होता. त्यामुळे उशिरा का होईना पीक पदरात पडेल अशी आशा फळ बागायतदारांची झाली होती. पण (Untimely rains) यंदा अवकाळीचे संकट कायमच आहे. मोहर लागून फळधारणेच्या दरम्यानच्या झालेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. केवळ आंबाच नाही तर रब्बी हंगामातील प्रत्येक पिकासाठी अवकाळी मारक ठरत आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणातून एकतरी पीक पूर्ण क्षमतेने पदरी पडते की नाही अशी स्थिती झाली आहे. अमरावती, रायगड तसेच विदर्भातील काही भागांमध्ये अजून दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकरी धास्तावलेला आहे.

ढगाळ वातावरण अन् थंडी गायब

गेल्या काही दिवसांपासून थंडीमध्ये वाढ झाल्यानेच आंबा, काजू यांचा मोहर वाढत होता. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला झालेल्या पावसाचा थेट उत्पादनावर परिणाम होणार नसल्याचे चित्र निर्माण झाले होते. आंब्याचा मोहर वाढला होता तर पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकेही बहरत होती. पण गेल्या दोन दिवसांपासूनचे ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस, गारपिट यामुळे न भरुन निघणारे नुकसान शेतकऱ्यांचे होत आहे.

मोहर लागण्यासाठी हे आहे पोषक वातावरण

आंब्याला मोहोर लागण्यासाठी थंड वातावरण आवश्यक असते. मात्र, आता अवकाळी पाऊस आणि निर्माण झालेल्या वातावरणामुळे मोहर तर नाहीच पण लागलेल्या मोहरही गळून पडत आहे. शिवाय अजून दोन दिवस पावसाचेच असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे अवकाळी नंतर कोरडे वातावरण झाले तर पोटॅशियम नायट्रेटची फवारणी या दरम्यान केली तर एकसारखा मोहोर लागण्यास मदत होणार असल्याचे कोकण कृषी विद्यापीठाचे डॅा. बाळासाहेब सावंत यांनी सांगितले आहे.

कसे करावे लागणार आहे व्यवस्थापन?

*पावसाच्या उघडीपनंतर वातावरण हे कोरडे झाल्यास य़ोग्य ते व्यवस्थापन करावे लागणार आहे. पावसाच्या उघडीपीनंतर तापमानात वाढ झाल्यावर शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. गरजेनुसार छाटणी, खतांचा संतुलित वापर, संजीवकांचा वापर, मोहोर संरक्षण आणि फळांचे व्यवस्थापन ही महत्वाची प्रक्रिया आहे. *आंब्याच्या कैऱ्या ह्या वटाण्याच्या आकाराच्या झाल्या की, प्रत्येक झाडाला 150 ते 200 लिटर पाणी देणे आवश्यक राहणार आहे. अशाच प्रकारे 15 दिवसांच्या अंतराने अंदाजे 3 ते 4 वेळेस अशाप्रकारे पाणी दिल्यास फळगळ ही कमी फळांचा आकार वाढणार आहे. जर फळधारणा होऊन 75 दिवस उलटले असतील तर मात्र, पाणी देण्याची आवश्यकता लागणार नाही.

संबंधित बातम्या :

मांजरा नदीकाठावर पोहचले लातूरचे जिल्हाधिकारी, मात्र त्यापुढचा प्रवास थेट कल्हईतून, नेमके काय कारण?

Grape Exports : अखेर संकटांची शर्यंत पार करीत नाशिकच्या द्राक्षांचा सातासमुद्रापार झेंडा! पहिल्याच टप्प्यात दोन देशात निर्यात

पोखरातून ‘मांजरा’चे पुनरुज्जीवन : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ अन् पर्यावरणाचा समतोलही, काय आहे उपक्रम?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.