कोरफडची एकदा लागवड बारमाही उत्पन्न, शेतकऱ्यांना व्यवसयाचीही संधी, जाणून घ्या सर्वकाही
हंगामी पीक असो की औषधी वनस्पती शेतकरी आता ज्यामधून अधिकचे उत्पन्न अशाच पिकांवर भर देत आहे. कोरफड ही वनस्पती त्यापैकीच एक आहे. केवळ भारतामध्येच नाही जगातील अनेक देशांमध्ये ही वनस्पती सहजरित्या आढळून येते. केवळ उत्पादनासाठीच नाही तर इतर बऱ्याच गोष्टीसाठी कोरफडीचा वापर केला जातो.
मुंबई : हंगामी पीक असो की (Medicinal Plants) औषधी वनस्पती शेतकरी आता ज्यामधून अधिकचे उत्पन्न अशाच पिकांवर भर देत आहे. (Aloe Vera) कोरफड ही वनस्पती त्यापैकीच एक आहे. केवळ भारतामध्येच नाही जगातील अनेक देशांमध्ये ही वनस्पती सहजरित्या आढळून येते. केवळ उत्पादनासाठीच नाही तर इतर बऱ्याच गोष्टीसाठी (Use Of Aloe Vera) कोरफडीचा वापर केला जातो. त्यामुळे कोरफड माहित नाही असा व्यक्ती शोधून सापडणार नाही. काळाच्या ओघात आता उत्पन्नाच्या दृष्टीने शेतकरी याकडे पाहू लागला आहे. शिवाय ज्या भागात पाण्याची सोय आहे अथवा नाही अशा दोन्ही भागातही याची लागवड करता येते. कोरफडीच्या रसापासून अनेक उत्पादने तयार होतात शिवाय सौंदर्य साहित्यामध्ये याचा सर्वाधिक वापर केला जातो. आयुर्वेदिक औषध उपचार म्हणूनही कोरफडचा वापर हा वाढत आहे. शिवाय उत्पादन आणि प्रोसेसिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्यवसाय उभारणीही करता येते.
ही लागवड पध्दती योग्य आहे
कोरफडचे कंद हे पावसळ्यात किंवा पावसाळ्याच्या तोंडावर लावले जातात. दोन वनस्पती आणि दोन रांगामध्ये एक मीटरचे अंतर ठेवले जाते. अशा प्रकारे एक हेक्टरमध्ये सुमारे 40 हजार रोपांची लागवड करता येते. विशेष म्हणजे एकदा लागवड केली की, 4 ते 5 वर्ष यामधून उत्पादन मिळते. शिवाय जोपसणे ही काही मोठी गोष्ट नाही किंवा यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवावी लागत नाही. दर महिन्याला काढणी करुन कमाई करता येते. केवळ लागवडच नाही तर यामाध्यमातून प्रक्रिया उद्योगही शेतकऱ्यांनाच करता येतो. प्रोसेसिंग युनिटची गूंतवणूक शेतकऱ्यांना जोडव्यवसाय म्हणून उभा राहणार आहे. शिवाय उत्पादन तर घरचेच असणार असल्याने दुप्पट नफा होणार आहे. यामधून अनेकांना रोजगाराची संधीही मिळू शकते. सर्वात महत्वाचे म्हणजे उत्पादन विक्रीसाठी व्यापाऱ्यांची वाट पाहक बसण्याची नामुष्की ओढावत नाही.
कोरफडवर प्रक्रिया कशी केली जाते?
* कोरफडवर प्रक्रिया करण्यासाठी प्रथम पाण्यात पोटॅशियम घालून तिला धुतले जाते. नंतर त्याचे लहान-लहान तुकडे केले जातात. हे तुकडे गरम पाण्यात काही काळ ठेवले जातात. या प्रक्रियेनंतर कोरफडीतून जेल काढण्याचे काम केले जाते.
* कोरफड सोलल्यानंतर काढलेले जेल रस काढण्यासाठी ब्लेंडिंग मशीनमध्ये ओतले जाते आणि ते 70 डिग्री तापमानात गरम केले जाते. यानंतर रस गाळून तो थंड करण्यासाठी सोडले जाते. नंतर त्यात प्रिझर्वेटिव्ह टाकून थंड करण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवले जाते.
* एवढी प्रक्रिया केल्यानंतर कोरफडीचा रस तयार होतो. याचा वापर आता सौंदर्यप्रसाधने आणि औषध बनवण्यासाठी केला जातो. प्रोसेसिंग युनिट्स स्थापित करणारे शेतकरी त्याचे विपणन आणि ब्रँडिंग देखील स्वतःच करतात. यासाठी त्यांना पॅकेजिंगकडे विशेष लक्ष द्यावे लागते.
संबंधित बातम्या :
Cotton Crop: कापसाचा दुहेरी फायदा, शेतकऱ्यांना वाढीव दर अन् बाजार समित्यांच्या उत्पादनातही भर..!
महाबळेश्वरचीच स्ट्रॉबेरी पाहिजे, मग आता नाही होणार फसवणूक..! कृषी पणन मंडळाचा रामबाण उपाय
Onion: सोलापुरात कांदा आवक स्थिरावूनही शेतकऱ्यांचा फायदाच, शेतीमालाच्या दरात सुधारणा