Nashik : शेतकरी नातेवाईकाच्या लग्न समारंभात, शेतात अग्नितांडवाने होत्याचे नव्हते झालं
निफाड तालुक्यातील काथरगाव येथील राजाराम जगन्नाथ वाघ, डॉ. किरण जगन्नाथ वाघ यांनी शेतात कांद्याची लागवड केली होती. यातून त्यांना 500 ते 600 क्विंटल कांद्याचे उत्पादन झाले. मात्र, आज रोजी कांद्याला मिळणाऱ्या बाजार भावातून उत्पादन खर्च ही निघणार नसल्यामुळे भविष्यात चांगला बाजार भाव मिळेल या अपेक्षेने आपल्या शेतात बांधलेल्या चाळीमध्ये (गोडाउन) कांदा साठवून ठेवला होता.
लासलगाव : कधी निसर्गाचा लहरीपणा तर नियतीचा खेळ यामध्ये भरडला जातोय तो शेतकरी. उत्पादनवाढीसाठी अहोरात्र परिश्रम करुनही पदरी निराशाच पडत आहे. अशीच घटना निफाड तालुक्यातील काथरगाव येथे घडली आहे. कधी नव्हे ते नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यासाठी राजाराम वाघ हे गेले असता इकडे शेतात झालेल्या (Fire Incident) अग्नितांडवाने अवघ्या काही वेळात होत्याचे नव्हते झाले. सध्या (Onion Damage) कांद्याला कवडीमोल दर आहे. त्यामुळे (Onion Mill) कांदाचाळीत त्याची साठवणूक करुन ठेवली असता चाळीलाच आग लागल्याने कांद्याचे नुकसान तर झालेच आहे पण दोन दुचाकीही जळून खाक झाल्या आहेत. ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे बांधलेली जनावरे वाचली मात्र, या घटनेत वाघ यांचे 20 लाखाचे नुकसान झाले आहे.
दरवाढीच्या प्रतिक्षेत साठवणूक
निफाड तालुक्यातील काथरगाव येथील राजाराम जगन्नाथ वाघ, डॉ. किरण जगन्नाथ वाघ यांनी शेतात कांद्याची लागवड केली होती. यातून त्यांना 500 ते 600 क्विंटल कांद्याचे उत्पादन झाले. मात्र, आज रोजी कांद्याला मिळणाऱ्या बाजार भावातून उत्पादन खर्च ही निघणार नसल्यामुळे भविष्यात चांगला बाजार भाव मिळेल या अपेक्षेने आपल्या शेतात बांधलेल्या चाळीमध्ये (गोडाउन) कांदा साठवून ठेवला होता. नातेवाईकाकडे लग्न असल्याने निफाड तालुक्यातील पिंपळस येथे लग्नासाठी संपूर्ण कुटुंब गेलेला असताना दुसरीकडे कांदाचाळीला आग लागल्याची घटना घडली.
आगीच्या घटनेत लाखोंचे नुकसान
चार महिने पोटच्या पोराप्रमाणे कांद्याचा जोपासणा केली होती. आगीच्या घटनेत 25 ट्रॅक्टर भर म्हणजे 500 ते 600 क्विंटल कांदा तसेच दोन मोटर सायकल जळून खाक झाले आहे ही आग लागल्याचे दिसल्याने आजू बाजू कडील ग्रामस्थांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत संपूर्ण नुकसान झाले होते याठिकाणी सावलीमध्ये चार ते पाच जनावरेही बांधण्यात आली होती ती ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे ही जनावरे वाचली आहे मात्र या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे या आगीत अंदाजे वीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
पंचनामा झाला आता मदतीची अपेक्षा
सदरील घटनेनंतर गावचे तलाठी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. आगीचे नेमके कारण अद्यापही समोर आले नाही. राजाराम वाघ हे परगावी गेले असतानाच ही घटना झाल्याने कोणीतरी मुद्दाहून आग लावल्याची चर्चा आहे. यासंबंधी योग्य ती कारवाई करुन मदत करण्याची अपेक्षा शेतकरी यांनी व्यक्त केली आहे.