Bhandara : धक्कादायक..! मुबलक पाणी असतानाही उन्हाळी पिकांनी माना टाकल्या, जमिनीलाही भेगा पडल्या, कारण काय?

विदर्भात दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढत आहेत. पाऱ्याने चाळीशी पार केली आहे. त्यामुळे एक दिवसआड उन्हाळी पिकांना पाणी दिले तरच अपेक्षित उत्पादन मिळणार आहे. भंडारा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. सध्याच्या रखरखत्या उन्हामध्ये एकवेळ पाणी देण्याची प्रक्रिया विस्कळीत झाली तरी पिके माना टाकतात. हे सर्व माहिती असतानाही जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दिवसाकाठी केवळ 2 तास विद्युत पुरवठा करण्याची आडमुठी भूमिका प्रशासनाने घेतली आहे.

Bhandara : धक्कादायक..! मुबलक पाणी असतानाही उन्हाळी पिकांनी माना टाकल्या, जमिनीलाही भेगा पडल्या, कारण काय?
भंडारा जिल्ह्यात कृषीपंपासाठी केवळ 2 तास विद्युत पुरवठा केला जात असल्याने शेतमजमिनीला अशा भेगा पडल्या आहेत.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 10:05 AM

भंडारा : विदर्भात दिवसेंदिवस (Temperature Increase) उन्हाच्या झळा वाढत आहेत. पाऱ्याने चाळीशी पार केली आहे. त्यामुळे एक दिवसआड  उन्हाळी पिकांना पाणी दिले तरच अपेक्षित उत्पादन मिळणार आहे. भंडारा जिल्हा (Paddy Crop) धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. सध्याच्या रखरखत्या उन्हामध्ये एकवेळ पाणी देण्याची प्रक्रिया विस्कळीत झाली तरी पिके माना टाकतात. हे सर्व माहिती असतानाही जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दिवसाकाठी केवळ 2 तास (Agricultural Pump) विद्युत पुरवठा करण्याची आडमुठी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. मोहडी तालुक्यात गेल्या 4 दिवसांपासून अशी परस्थिती ओढावली आहे. खरिपातील पिके अवकाळीने हिरावली आणि आता महावितरणचा कारभार शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. दोन तासांमध्ये पाठतले पाणी पिकांपर्यंत पोहचेपर्यंत विद्युत पुरवठा खंडीत केला जात आहे.

शेती पिकाचे नुकसान, शेत जमिनीलाही भेगा

भंडारा जिल्ह्या हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. मोहाडी तालुक्यातील मुढरी येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात धान पीक, भाजीपाला, ऊस लागवड केली आहे. सध्या उन्हाचा पारा 40 अंशाच्या पार झाल्याने शेतीला मुबलक पाणी पाहिजे. अशा परस्थितीमध्येच विद्युत विभागाच्या गलथान कारभारामुळे कृषी पंपासाठी केवळ 2 तास वीज दिली जात आहे. आधीच उन्हामुळे जमिनीवर भेगा पडल्या असल्याने 2 तासात अर्धी बांधी देखील ओली होत नाही. यामुळे पाणी मुबलक असतानाही लागवड केलेलं पीक करपू लागले आहे. शेतात भेगा पडल्या आहेत.

विजबील भरणा करुनही महावितरणचा ‘शॉक’

मध्यंतरी कृषी पंपाच्या वाढत्या थकबाकीमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. उत्पादनात घट आणि निसर्गाचा लहरीपणा यामध्ये शेतकरी त्रस्त असतानाही शेतकऱ्यांनी थकीत विजबील भरणा केला. त्यामुळे किमान 8 तास तरी सुरळीत विद्युत पुरवठा होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पण मोहाडी तालुक्यात केवळ दोन तास विद्युत पुरवठा करुन प्रशासनाने जगाचा पोशिंद्याचे चेष्टाच लावली आहे. या गलथान कारभाराचा परिणाम थेट उत्पादनावर होणार आहे.

मुबलक पाणी असतानाही उत्पादनात घट

एकीकडे शेती उत्पादन वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे. पण अजूनही शेतकऱ्यांना मुलभूत सुविधा देखील मिळाल्या नाहीत. शेतीसाठी नियमित वीज दिली जात नाही तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शिवाराला लागूनच असलेल्या साखर कारखान्यांना मात्र, 24 तास विद्युत पुरवठा केला जात आहे. त्यामुळे सरकारची धोरणे नेमकी कुणासाठी असा सवाल उपस्थित आहे. उन्हाळी हंगामातील उत्पादन घटण्यामागे प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

संबंधित बातम्या :

Onion Crop : आवक घटूनही कांद्याचा वांदाच, खरिपात साधले उन्हाळी कांद्याचे गणितच बिघडले

Income Tax | श्रीमंत शेतकरी प्राप्तीकर विभागाच्या रडारवर; उत्पन्न जास्त असेल तर कर भरावा लागणार?

State Government: आता मागूनही मिळणार नाही शेततळे, राज्य सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.