भांडगावच्या गाजराची चवच न्यारी, शेतकऱ्यांना कळाले ‘झिरो बजेट’ शेतीचे महत्व

उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील भांडगावची ओळख ही गाजराचे गाव म्हणून पंचक्रोशीत आहे. गेल्या अनेक वर्षापासून येथील शेतकऱ्यांनी ही ओळख कायम ठेवलेली आहे. 2 हजार लोकवस्ती असलेल्या या गावात तब्बल 750 एकरावर गाजराचेच पीक घेतले जाते.

भांडगावच्या गाजराची चवच न्यारी, शेतकऱ्यांना कळाले 'झिरो बजेट' शेतीचे महत्व
Carrot Crop
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 12:59 PM

उस्मानाबाद : एखाद्या गावाचे वेगळेपण ही त्याची ओळख होऊन जाते. (Osmanabad) उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील भांडगावची ओळख ही गाजराचे गाव म्हणून पंचक्रोशीत आहे. गेल्या अनेक वर्षापासून येथील शेतकऱ्यांनी ही ओळख कायम ठेवलेली आहे. 2 हजार लोकवस्ती असलेल्या या गावात तब्बल 750 एकरावर (Carrot Crop) गाजराचेच पीक घेतले जाते. तीन महिन्यांमध्ये एकरी लाखोंचे उत्पन्न घेण्याचा फॉर्म्युला या गावातील शेतकऱ्यांना अवगत झाला आहे. त्यामुळे रब्बी-खरिपात नुकसान अथवा नफा झाला तरी गाजराचे पीक हे घेतलेच जाते. शिवाय येथील गाजराची चवच न्यारी असल्याने बाजारात याला मोठी मागणी आहे. काळाच्या ओघात आता पुन्हा (Organic Farm) सेंद्रीय शेतीचे महत्व वाढत आहे. पण याचे महत्व भांडगावच्या शेतकऱ्यांना यापूर्वीच अवगत झालेले असावे म्हणूनच कोणत्याही रासायनिक खतांची मात्रा न देता सेंद्रीय पध्दतीने हे पीक घेतले जात आहे. कमी खर्चात अधिकचे उत्पादन म्हणूनच भांडगावच्या शेतकऱ्यांना इतर पिकांपेक्षा गाजराचे पिकाचा अधिक गोडवा आहे.

रब्बी हंगामातील मुख्य पीक

यंदा वातावरणातील बदलामुळे शेती पिकांमध्ये मोठा बदल झाला आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार ज्वारी या मुख्य पिकाची जागा आता हरभऱ्याने घेतली आहे. राज्यात, मराठवाड्यात काहीही असो मात्र, येथील रब्बी हंगामातील पीक हे गाजरच राहिलेले आहे. गेल्या अनेक वर्षापासून याची लागवड शेतकरी करीत असल्याने लागवडीपासून घ्यावयाची काळजी, काढणी आणि बाजारपेठ याची माहीती शेतकऱ्यांना झाली आहे. यंदाही 700 हून अधिक एकरामध्ये लागवड करण्यात आली आहे. एकरी 12 ते 13 किलो बियाणे आणि तेही शेतकरी स्वत: तयार करतात. त्यामुळे बियाणाचा खर्च नाही आणि रासायनिक खतांची फवारणी नाही. त्यामुळे अधिकचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरी पडते.

3 महिन्यात एकरी 1 लाख रुपये

वातावरणातील बदलाचा परिणाम यंदा मुख्य पिकावर झालेला आहे. मात्र, गाजर हे तीन महिन्याचे पीक असून यंदाही याला पोषक वातावरण आहे. पिकाला कमी पाणी आणि कुठलीही फवारणी अथवा रासायनिक खतांची गरज भासत नाही,शंभर टक्के सेंद्रिय असल्यामुळे त्याची गोडी चांगली असल्याने बाजारात या गाजराना मागणी वाढत आहे. शून्य खर्च असलेल्या या पिकातून 3 महिन्यात 1 लाखाचे उत्पन्न घेतले जाते. शिवाय याची काढणी होताच इतर पिकांसाठी या जमिनीचा वापर केला जातो. गाजराच्या पाल्याचा जनावरांसाठी चारा म्हणून वापर केला जात असल्यामुळे चाऱ्यावरचा खर्चही कमी झाला असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

संबंधित बातम्या :

आठवडी बाजार बंद, भाजीपाल्याला मागणीच नसल्याने शेतकऱ्याने मेथीच्या जुड्या हवेतच भिरकावल्या

Rabi Season: वातावरण निवळले, शेतकऱ्यांना आता खतांची चिंता, चढ्या दराने होतेय विक्री

ऊसशेती करणाऱ्या सदाशिवनं शेतात थेट गांजा पिकवला! पोलिसांनी त्यावर नांगर फिरवला

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.