Gondia : पाऊस आला धाऊन, पिकं गेली वाहून, गोंदियात 208 हेक्टरातील पिकांवर पाणी, कृषी विभागाचे धोरण काय?

खरीप हंगामातील काही क्षेत्रावर धान पिकांची लागवड करताच पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे पिकांची पाहणी करणेही शक्य नव्हते. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने कृषी विभाग कामाला लागला आहे. जिल्ह्यात नुकसान झालेल्या क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे करण्यास सुरवात झाली आहे. कृषी विभागाचे अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचत आहेत.

Gondia : पाऊस आला धाऊन, पिकं गेली वाहून, गोंदियात 208 हेक्टरातील पिकांवर पाणी, कृषी विभागाचे धोरण काय?
पावसाचे पाणी शेतमजमिनीत साचल्याने धान पिकांचे नुकसान झाले आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 11:02 AM

गोंदिया : जुलैच्या पहिल्या दिवसापासून राज्यात पावसाने हाहाकार घातला आहे. (Vidarbha Farmer) विदर्भावर पावसाची कधी नव्हे ती अधिकची कृपादृष्टी राहिलेली आहे. त्यामुळे हा पाऊस नुकसानीचा ठरलेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून काही प्रमाणात पावसाने उसंत घेतली असली तरी ढगाळ वातावरण रिमझिम पाऊस हा सुरुच आहे. यामुळे धोका अद्यापही टळलेला नाही. मध्यंतरी सलग 15 ते 20 दिवस झालेल्या पावसामुळे (Kharif Season) खरिपातील पिके तर वाहून गेलीच आहेत पण शेत जमिनीही खरडून गेल्याचे चित्र गोंदिया जिल्ह्यात आहे. कृषी विभागाकडून आता पीक पाहणी आणि पंचनाम्याला सुरवात झाली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये तब्बल 208 हेक्टरावरील (Paddy Crop) धान पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शिवाय 8 दिवसांमध्ये या संदर्भातला अहवाल तयार होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पंचानाम्याला सुरवात

खरीप हंगामातील काही क्षेत्रावर धान पिकांची लागवड करताच पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे पिकांची पाहणी करणेही शक्य नव्हते. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने कृषी विभाग कामाला लागला आहे. जिल्ह्यात नुकसान झालेल्या क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे करण्यास सुरवात झाली आहे. कृषी विभागाचे अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचत आहेत. आतापर्यंतच्या पाहणीतून धान पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. आता प्रत्यक्ष पंचनाम्याला सुरवात झाली असून आर्थिक मदत मिळे असा आशावाद शेतकऱ्यांना आहे.

सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस

विदर्भात दरवर्षी कमी पावसामुळे धान पिकाची लागवड होत नाही. पण यंदा चित्र बदलले आहे. हंगामाच्या सुरवातीलाच पावसाने असे काय थैमान घातले आहे त्यामुळे लागवड झालेल्या क्षेत्रातील पिकांवर पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे वाढ तर खुंटलीच आहे पण सततच्या पावसामुळे पाण्याचा निचराही होत नाही. हंगामाच्या सुरवातीलाच सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने उत्पादन घटण्याचा धोका कायम आहे. पंचनाम्यांना सुरवात झाली असून मदतीबाबत शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

धान पिकाचे सर्वाधिक नुकसान

धान पीक हेच खरिपातील मुख्य पीक आहे. अल्पशा पावसावर शेतकऱ्यांनी लागवड केली मात्र, काही क्षेत्रात लागवड होताच सुरु झालेला पाऊस हा सलग 20 दिवस कायम राहिला. त्यामुळे जिल्ह्यातील 208 हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. शिवाय आणखी वाढ होईल असाही अंदाज कृषी विभागाचा आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदा विदर्भातील शेतकऱ्यांनाही बसलेला आहे. शेतकऱ्यांना आता आर्थिक मदतीची प्रतिक्षा आहे.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.