Special News : महावितरणचा ‘शॉक’: वीज जोडणीविनाच हजारोंचे वीजबिल, महिला दिनादिवशीच विधवेची क्रुरचेष्टा
सध्या जे वीजबिलावरुन सबंध राज्यात रणकंदन सुरु आहे ना त्याला पार्श्वभूमीही तशीच आहे. हा संताप एका रात्रीतून वीज ग्राहकांमध्ये अवतरलेला नाही तर यामागे बराच इतिहासही आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण महावितरण या विभागात काहीही होऊ शकतं? याचे उदाहरण आम्ही तुम्हाला देणार आहोत.
कोल्हापूर : सध्या जे (Electricity Bill) वीजबिलावरुन सबंध राज्यात रणकंदन सुरु आहे ना त्याला पार्श्वभूमीही तशीच आहे. हा संताप एका रात्रीतून वीज ग्राहकांमध्ये अवतरलेला नाही तर यामागे बराच इतिहासही आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण महावितरण या विभागात काहीही होऊ शकतं? याचे उदाहरण आम्ही तुम्हाला देणार आहोत. सध्या कुठं (MSEB) महावितरण कार्यालय पेटवले जातयं तर कुठे अधिकाऱ्यांच्या कार्यालयात साप सोडले जात आहेत. यामागे महावितरणचा प्रतापही तसाच आहे. जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एका विधवेला (Electricity connection) वीजकनेक्शन न देताच गेल्या वर्षभराचे बिल तेही तब्बल 30 हजार रुपये देऊ करण्याचा पराक्रम महावितरण कंपनीने केला आहे. विशेष म्हणजे गतवर्षी महिला दिनाचे औचित्य साधून या महिलेला शेती पंपाचे कनेक्शन दिल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले होते. वर्षभरानंतर काय स्थिती याची पाहणी केली असता हे भयाण वास्तव समोर आले आहे. त्यामुळे वीज कनेक्शनच नाही तर वीजबिल कुठून आले हा प्रश्न आहे. आणि जर वीजबिलच महिलेच्या नावे नसेल तर प्रमाणपत्र कसे आले असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे महावितरणचा कारभार कसा अधांरात लपंडाव खेळल्यासारखा आहे याचा प्रत्यय येतो.
नेमके प्रकरण काय ?
कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी मधल्या विजयमाला हावळे यांनी शेतामध्ये बोअर घेतले होते. बोअर ला शेती पंपाचे कनेक्शन मिळावा यासाठी त्यांनी 2018 ला महावितरणकडे अर्ज केला होता. यानंतर तीन वर्षांनी त्यांना वीज कनेक्शन दिले असल्याचे प्रमाणपत्र ते ही महिला तहसीलदार यांच्या हस्ते गतवर्षी महिला दिनाचे ओचित्य साधून देण्यात आले होते. कनेक्शन कागदोपत्री मिळाले त्याला वर्ष झाले आहे पण शेतातली स्थिती काय आहे? याची पाहणी tv9 मराठीने केली असता वेगळेच वास्तव समोर आले आहे. हावळे यांच्या शेतात ना शेती पंपाचे कनेक्शन आहे ना विजेचा खांब आहे ना कोणते मीटर. आश्चर्याची बाब म्हणजे अशा परिस्थितीतही गेल्या वर्षभरात त्यांना महावितरणकडून दोन बिल आलेले आहेत तेही जवळपास तीस हजारापर्यंतची. आता कनेक्शन्स दिलं नाही तर वीज बिल कशाचं आणि कुठून भरायचं हा मोठा प्रश्न आहे.
महावितरणचा कारभार रामभरोसे
आतापर्यंत कमी- अधिकच्या वीजबिलातील तक्रारी केल्या जात होत्या. मात्र, थेट वीज कनेक्शन न देताच वीज जोडणीचे प्रमाणपत्र म्हणजे ही निव्वळ फसवणूकच झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात ज्या शेतामध्ये कनेक्शनच नाही तिथे 30 हजारापर्यंतची वीजबिले कशी असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे वीजबिल वाटपापासून ते वीज जोडणीपर्यंतची प्रक्रिया ही संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यामुळेच महावितरणने वितरीत केलेल्या बिलावर सर्वसामान्य ग्राहकांना विश्वासच बसत नाही. आणि हेच कारण असू शकते महावितरणच्या वाढीव थकबाकीचे
महिला दिनादिवशीच विधवेची क्रुरचेष्टा
कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील वियमाला हावळे यांनी शेतामध्ये बोअर घेऊन आता तीन वर्ष उलटली आहेत. असे असतानाही त्यांना वीजजोडणीसाठी प्रयत्नांची पराकष्टा करावी लागलेली आहे. एक महिला शेतकरी असून शेती व्यवसयातूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनाही अशाप्रकरच्या सामोरे जावे लागत असल्याने महावितरणचा कारभार किती मनमानी आहे याचे उत्तम उदाहरण समोर आले आहे. महावितरणकडून ही चूक झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी कबूल केले म्हणजे हे देखील नशिबच म्हणावे लागेल.
संबंधित बातम्या :
Cotton : कापूस दरवाढीला ‘ब्रेक’, आता साठवणूक की विक्री..! शेतकऱ्यांनी नेमके करावे काय ?
कलिंगड उत्पादकांसाठी ‘अच्छे दिन’, दोन वर्ष नुकसानीचे, यंदा दोन महिन्यांमध्ये शेतकरी मालामाल