Agricultural Department : ठरलं त मग, खरिपात खताचा पुरवठा होणार पण कृषी विभागाच्या धोरणांचाही अवलंब करवाा लागणार..!

रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच खरिपाचे नियोजन केले जाते. यंदा तर खत पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याने कृषी विभागाकडून योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. यंदा शेतकऱ्यांनी केवळ रासायनिक खतावर अवलंबून न त्याला सेंद्रीय तसेच इतर खतांची जोड देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम रासायनिक खत पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खताचा वापर मोजकाच आणि आवश्यक तेवढा करणे गरजेचे आहे.

Agricultural Department : ठरलं त मग, खरिपात खताचा पुरवठा होणार पण कृषी विभागाच्या धोरणांचाही अवलंब करवाा लागणार..!
रासायनिक खत
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 1:17 PM

पुणे : रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच (Kharif Season) खरिपाचे नियोजन केले जाते. यंदा तर खत पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याने (Agricultural Department) कृषी विभागाकडून योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. यंदा शेतकऱ्यांनी केवळ रासायनिक खतावर अवलंबून न त्याला सेंद्रीय तसेच इतर खतांची जोड देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (War) रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम रासायनिक खत पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खताचा वापर मोजकाच आणि आवश्यक तेवढा करणे गरजेचे आहे. असे असतानाही कृषी विभागाने यंदा खरिपाचे नियोजन केले असून राज्यासाठी 45 लाख टन खताचे नियोजन केले आहे. यामध्ये युरिया, डीएपी, पोटॅश, सयुक्त खते आणि सिंगल सुपर फॉस्फेट यांचा समावेश आहे. केंद्राने आयोजित केलेल्या खत परिषदेतून उमटलेल्या सूरातून या खतसाठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल आणि रासायनिक खतांचा वापरही कमी होईल अशा पध्दतीने कृषी विभागाने हे धोरण ठरवले आहे.

नेमका कसा ठरवला जातो खत साठा?

खताचे नियोजन करण्यापूर्वी केंद्र स्तरावर बैठकीचे आयोजन केले जाते. या खत परिषदेमध्ये सबंध कृषी विभागाकडून आढावा घेतला जातो. त्यामुळे जिल्हानिहाय आणि महिनानिहाय खत मंजूरीसाठी मागील तीन खरीप हंगामातील खताची विक्री ही विचारात घेतली जाते. जिल्हा निहाय खत साठा मंजूर करताना खरीप हंगाम 2019 ते 21 मधील खताचा वापर कसा होता ? याचा अभ्यास केला जातो. ज्या वर्षी अधिकचा वापर आहे आणि राज्याला मंजूर साठा किती आहे यानुसार जिल्हानिहाय खतसाठा मंजूल केला जातो.

सर्वच खताचा करावा लागणार वापर

एका शेतकऱ्यांने खताचा आग्रह केला की इतर शेतकरीही तेच खत मागणार आहे. सर्व गावातले शेतकरी केवळ एकाच खताची मागणी करतात त्यामुळे लागलीच टंचाई भासण्यास सुरवात होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्वच खतांचा घालून देलेल्या मर्यादेप्रमाणे वापर करणे हेच गरजेचे आहे. शिवाय अशा वापरामुळे कमी अधिकची तफावत राहणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पादनवाढीसाठी आणि खताच्या योग्य वापरासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय तसेच जिल्हा परिषदेतील कृषी विभागाने जनजागृती करण्याच्या सूचना थेट कृषी आयुक्तांनीच दिल्या आहेत.

या खतांचा करावा लागणार उपयोग

केवळ एकाच खतावर भर न देता शेतकऱ्यांनी नत्र, स्फुरद, पालाश याचे प्रमाण लक्षात घेऊन खताचा वापर करावा लागणार आहे. खरीप म्हणजे एप्रिल ते जानेवारी दरम्यानच्या काळात किती खत लागणार याची आकडेवारी कृषी विभागाने काढण्यात आली असून त्याच पध्दतीने पुरवठाही होणार आहे. महिनानिहाय कसा वापर होतो त्यावरुन साठा मर्यादा ठरवली जाते.

संबंधित बातम्या :

Photo Gallery : हौसेला नाही मोल, डोहाळं जेवण गायीचे अन् कौतुक अख्ख्या गावाला

Rabi Season : सुगीवर चिंतेचे ढग, खरिपाप्रमाणेच रब्बीचीही अवस्था, काय आहे शेतशिवारातले चित्र?

Onion Market :आता उलटी गणती सुरु, महिन्यातच बदलले कांदा Market, उन्हाळी कांदा काढणीला पण करायचे काय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.