Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan : मनात मोर नाचेल थुईथुई! पीएम किसान योजनेत बदलाचे वारे

PM Kisan : पीएम किसान योजनेत आता महत्वाचा बदल होणार आहे. त्याचा भारतातील कोट्यवधी शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरेल. काय आहे हा बदल..

PM Kisan : मनात मोर नाचेल थुईथुई! पीएम किसान योजनेत बदलाचे वारे
Follow us
| Updated on: Jul 30, 2023 | 6:19 PM

नवी दिल्ली | 30 जुलै 2023 : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेने (PM Kisan Installment) शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. 27 जुलै रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. देशातील 8 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा झाला. DBT माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. 8.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट 17,000 कोटी रुपयांची धनराशी जमा करण्यात आली. पण आता या योजनेत महत्वाचा बदल होणार आहे. . त्याचा भारतातील कोट्यवधी शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरेल. काय आहे हा बदल..

काय होणार बदल

पुढील वर्षात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यावर्षी 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा जागर होत आहे. केंद्र सरकार या योजनेत मोठा बदल करणार आहे. Money9 च्या सूत्रानुसार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत बदल होण्याची शक्यता आहे. प्रत्येक वर्षी या योजनेत 2000 हजार रुपयांची वाढ होणार आहे.

हे सुद्धा वाचा

इतकी होईल रक्कम

सध्या या योजनेत दरवर्षी जवळपास साडे आठ कोटी शेतकऱ्यांना निधी देण्यात येतो. वार्षिक 6000 रुपये देण्यात येतात. 2000 हजार रुपयांच्या तीन हप्त्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. या योजनेत एक हप्ता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक 8000 रुपये जमा होतील.

यापूर्वी पण चर्चा

यावर्षी जानेवारी महिन्यात पण याविषयी चर्चा रंगली होती. केंद्र सरकार फेब्रुवारी 2023 पासून जादा हप्त्याची तरतूद करेल असा दावा करण्यात येत होता. केंद्रीय अर्थसंकल्पात याविषयी घोषणा करण्यात येणार होती. पण आता निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

बजेट पण तयार?

या योजनेत आणखी एक हप्ता वाढविण्यासाठी केंद्र सरकारने निधीची तरतूद केल्याचा दावा करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने योजनेचा 14 वा हप्ता जमा केला. केंद्र सरकारने जवळपास 17 हजार कोटी रुपये खर्च केले.

योजनेला झाले पाच वर्षे

केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना डिसेंबर 2018 मध्ये सुरु केली होती. त्यावेळी ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांपुरती मर्यादीत होती. पण आता या योजनेचा विस्तार झाला आहे. सगळ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो.

या शेतकऱ्यांना नाही लाभ

ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असतील वा सेवानिवृत्त असतील त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही. 10 हजार रुपये मासिक पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृत्तांना या योजनेचा फायदा मिळत नाही. इनकम टॅक्स जमा करणाऱ्यांना या योजनेच्या बाहेर ठेवण्यात आले आहे.

कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.