PM Kisan: पीएम किसान सन्मान योजनेचे 30 महिने पूर्ण, 9 व्या हप्त्याची तयारी सुरु

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये पाठवले जातात. PM Kisan Scheme

PM Kisan: पीएम किसान सन्मान योजनेचे 30 महिने पूर्ण,  9 व्या हप्त्याची तयारी सुरु
पीएम किसान योजना
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 12:52 PM

नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये पाठवले जातात. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेला आतापर्यंत 30 महिने पूर्ण झाले आहेत. योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात 31 जुलैपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. आता पीएम किसान योजनेच्या नवव्या हप्त्याची तयारी सुरू झाली आहे. आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 लाख 37 हजार 354 कोटी रुपये पाठविण्यात आले आहेत. शेतकरी संघटनांकडून या मदतीची रक्कम वाढवण्याची मागणी केली जाते आहे. (PM Kisan Samman Nidhi Scheme 30 months completed farmers can register for the 9th instalment )

पीएम किसान सन्मान योजनेचा नवव्या हप्त्याची तयारी सुरु

पीएम किसान सन्मान योजनेच्या नवव्या हप्त्याची रक्कम देण्याची प्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरु केली जाणार आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी अद्याप या योजनेमध्ये नोंदणी केली नाही, त्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन देखील करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी केली आणि त्यांच्या अर्जाची पडताळणी झाल्यास त्यांना आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये देखील मिळू शकतात पीएम किसान सन्मान योजनेसाठी ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येते. गेल्या दोन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर 21 हजार कोटी रुपये पाठवण्यात आले आहे.

मोदी सरकारची यशस्वी योजना

मोदी सरकारने शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार पीएम किसान सन्मान योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये पाठवले जातात. शेतकरी संघटनेचे नेत्यांनी ही मदत वाढवून वार्षिक 24000 करावी अशी मागणी केली आहे.

तुमचं रेकॉर्ड कसं तपासणार?

स्टेप 1: सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. स्टेप 2:तिथे गेल्यावर तम्हाला पीएम किसान सन्मान निधीचं होमपेज दिसेल. स्टेप 3:होमपेजवर किसान कॉर्नवर जा. स्टेप 4:जर तुम्ही यापूर्वी अर्ज केला असेल आणि आधार व्यवस्थित अपलोड झाले नसेल तर आधार नंबर चुकीचा असल्याची माहिती तिथे मिळेल. स्टेप 5: फार्मर किंवा किसान कॉर्नरवर जाऊन शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजनेसाठी नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आली आहे. स्टेप 6: पीएम किसान पोर्टलवर सरकारनं शेतकऱ्यांची यादी अपलोड केलेली आहे. तिथे अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार नंबर, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर याचा वापर करता येईल. स्टेप 7:ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देण्यात आला आहे, त्यांची यादी राज्य, जिल्हा तालुका, गाव, कॅटेगरी सिलेक्ट करुन पाहू शकता.

संबंधित बातम्या:

PM Kisan: पीएम किसान योजनेतून अपात्र शेतकऱ्यांची नाव वगळली, तुमचं रेकॉर्ड तपासलं का?

PM Kisan : या शेतकर्‍यांच्या खात्यात येणार नाहीत 2 हजार रुपये, योजनेत बसत नसल्यास त्वरीत काढा नाव, अन्यथा होईल कारवाई

PM Kisan Samman Nidhi Scheme 30 months completed farmers can register for the 9th instalment

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.