महावितरणचा ‘शॉक’ फळबागांनाही, अस्मानी संकटानंतर आता सुल्तानी संकटाशी सामना

कृषीपंपाकडील वाढत्या थकबाकीमुळे विद्युत पुरवठा खंडीत करण्याची मोहीम राज्यभरात सुरु आहे. आतापर्यंत या कारवाईमुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. शिवाय कारवाई बंद करण्यासाठी राज्यभर आंदोलने केली जात आहेत. मात्र, आता या कारवाईचा परिणाम थेट द्राक्ष बागांवरही होत आहे. आतापर्यंत अवकाळीमुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले होते तर आता पाणी मिळत नसल्याने होत आहे. सध्या निफाड तालुक्यात द्राक्ष काढणी सुरु आहे.

महावितरणचा 'शॉक' फळबागांनाही, अस्मानी संकटानंतर आता सुल्तानी संकटाशी सामना
पाण्याअभावी द्राक्षाचे होणारे नुकसान दाखवण्यासाठी शेतकरी थेच विद्युत उपकेंद्रावर पोहचले होते.
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 12:42 PM

लासलगाव : (Agricultural Pump) कृषीपंपाकडील वाढत्या थकबाकीमुळे विद्युत पुरवठा खंडीत करण्याची मोहीम राज्यभरात सुरु आहे. आतापर्यंत या कारवाईमुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. शिवाय कारवाई बंद करण्यासाठी राज्यभर आंदोलने केली जात आहेत. मात्र, आता या कारवाईचा परिणाम थेट (Vineyard) द्राक्ष बागांवरही होत आहे. आतापर्यंत अवकाळीमुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले होते तर आता पाणी मिळत नसल्याने होत आहे. सध्या निफाड तालुक्यात (Grape Harvesting) द्राक्ष काढणी सुरु आहे. शिवाय द्राक्ष तोड झाली की लागलीच द्राक्ष बागांना पाणी देणे गरजेचे असते. अन्यथा बागांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. असे असले तरी दुसरीकडे कृषीपंपच बंद असल्याने पिकांना पाणी द्यावे कसे असा प्रश्न उपस्थित झाल्याने या भागातील दावचीवाडी, पंचकेश्वर गावच्या शेतकऱ्यांनी थेट उपकेंद्रावरच आंदोलन केले आहे. त्यामुळे आता विद्युत पुरवठा सुरळीत केला जाणार का हे देखील पहावे लागणार आहे.

नेमके बागांचे नुकसान काय?

द्राक्ष बागा जोपासण्यासाठी पाण्याचे आणि कीटकनाशकांचे व्यवस्थापन महत्वाचे आहे. यंदा अगोदरच निसर्गाच्या लहरीपणामुळे बागांचे नुकसान झाले आहे. अशा परस्थितीमध्येही निफाड तालुक्यात द्राक्ष तोडणीला सुरवात झाली होती. आता तोडणी होताच बागांना पाणी दिले तरच योग्य प्रकारे वाढ होणार आहे. याचे नियोजन दरवर्षी शेतकऱ्यांकडून केले जाते. यंदा मात्र, महावितरणच्या कारवाईमुळे अडचणी निर्माण होत आहेत. पाणी असतानाही बागांना पाणी देणे मुश्किल होणार आहे. त्यामुळे बागांची योग्य प्रकारे वाढ होणार नाही तर पुन्हा त्याचा उत्पादनावर परिणाम होईल याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये आहे.

आतापर्यंत अस्मानी संकट अन् आता सुल्तानी

हंगामाच्या सुरवातीपासून शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाशी सामना करावा लागला आहे. अवकाळीमुळे कायम द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकचाशी शेतकऱ्यांनी दोन हात केले पण सध्या मुबलक पाणी आणि वातावरण निवळले असताना गरजेच्या वेळी पाणी बागांना मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हताश आहे. द्राक्षाची तोडणी थांबवली तर द्राक्ष दर्जावर परिणाम होणार नाही तोडणी करुनही बागांना पाणी दिले नाही तर उत्पादनावर परिणाम होणार आहे.

उपकेंद्रावरच शेतकऱ्यांचे आंदोलन

कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करु नये तसेच नियमित वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी थेट वीज कंपनीच्या उपकेंद्रावरच आंदोलन केले आहे. डोळ्यादेखत बागांचे असे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी ही आक्रमक भूमिका घेतलेली आहे. मात्र, एवढे होऊनही विद्युत पुरवठा केला जाणार का नाही हा प्रश्न आहे.

संबंधित बातम्या :

सोयापेंड, सोयाबीन नंतर पोल्ट्रीधारकांचे लक्ष आता गहू – तांदळावर, काय आहे नेमके कारण?

अवकाळीचा कहर त्यात महावितरणची भर, शॉर्टसर्किटने ऊस जळून खाक, अशी मिळवा आर्थिक मदत..!

Grape Export : सांगलीतून 8 हजार टन द्राक्षाची निर्यात, हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांच्या काय आहेत अपेक्षा?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.