प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना नेमकी काय? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किती लाभ झाला?

सन 2019-20 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ महाराष्ट्रातील 1 लाख 64 हजार 692 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला.Pradhan Mantri Krishi Sinchan Yojana

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना नेमकी काय? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किती लाभ झाला?
ठिबक सिंचन योजना
Follow us
| Updated on: Apr 18, 2021 | 2:06 PM

मुंबई: महाराष्ट्रात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2015-16 पासून राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनामध्ये आधुनिक पद्धतींचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा योजनेचा उद्देश आहे. ही योजना प्रति थेंब अधिक पीक हे ब्रीद वाक्य घेऊन राबवली जाते. या योजनेचा लाभ अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्यानं दिला जातो. (Pradhan Mantri Krishi Sinchan Yojana Know full details how many farmers get benefit in Maharashtra )

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना नेमकी काय?

सिंचनाखालील लागवडीयोग्य क्षेत्र वाढवणे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासह जलवापर क्षमतेमध्ये वाढ करणे. अचूक सिंचन आणि तुषार व ठिबक सिंचन अशा पाणी वाचवणाऱ्या सिंचन पद्धतींच्या वापरात वाढ करणे, हा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा उद्देश आहे. महाराष्ट्रात या योजनेची अंमलबजावणी 2015-16 पासून करण्या आली आहे.

या योजनेचा लाभ कुणाला?

प्रधानमंक्षी कृषी सिंचन योजनेचा लाभ देताना अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के तर इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अंशदान द्यावे, असा निकष आहे. 5 हेक्टरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत किती लाभ मिळाला?

सन 2019-20 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ महाराष्ट्रातील 1 लाख 64 हजार 692 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. याद्वारे 1 लाख 23 हजार 300 हेक्टर क्षेत्र नव्यानं सूक्ष्म सिंचनाखाली आणलं गेले आहे. राज्यातील या शेतकऱ्यांच्या खात्यावर 402.14 कोटी रुपयांचं अनुदान वर्ग करण्यात आलं आहे. तर, सन 2017-18 मध्ये 687.84 कोटी तर 2018-19 मध्ये 415.95 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान रुपात वर्ग करण्यात आले. सन 2019-20 मध्ये 67 हजार 531 तुषार सिंचन संच तर 97 हजार 161 ठिबक सिंचन संचासाठी अनुदान वितरीत करण्यात आलं आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचं आधार कार्ड, ओळखपत्र, शेतकऱ्याच्या जमिनीचं कागदपत्र. बँक पासबूक, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर आवश्यक आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी एक पोर्टल तयार करण्यात आलं आहे. त्या पोर्टलवर संपूर्ण माहिती दिलेली आहे. मात्र, प्रत्येक राज्य सरकारची या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज, लाभार्थी निवड प्रक्रिया करण्याची पद्धत वेगळी आहे. महाराष्ट्रात आपले सरकार महाडीबीटी पोर्टलद्वारे या योजनेसाठी अर्ज करता येतात.

संबंधित बातम्या:

शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी, यंदा कापसाच्या पिकातून अधिक उत्पन्नाची संधी

ऐन कोरोना काळात गूड न्यूज! यावर्षी चांंगला पाऊसकाळ, सामान्य मान्सूनचा हवामान विभागाचा पहिला अंदाज

Pradhan Mantri Krishi Sinchan Yojana Know full details how many farmers get benefit in Maharashtra

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.