Rabi Season | अवकाळीनंतर आता ढगाळ वातावरणाचा धोका, काय आहे उपाययोजना ?

दोन दिवसांच्या अवकाळीनंतर आता सर्वकाही सुरळीत असे वाटत असेल तर हा मोठा गैरसमज आहे. कारण शेतकऱ्यांसमोरील संकटाची मालिका कायम सुरुच आहे. अवकाळी नंतर आता मराठवाड्यासह विदर्भात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय रब्बी हंगामातील पिकांना पोषक असणारी थंडीही कमी होत आहे.

Rabi Season | अवकाळीनंतर आता ढगाळ वातावरणाचा धोका, काय आहे उपाययोजना ?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 12:16 PM

लातूर : दोन दिवसांच्या अवकाळीनंतर आता सर्वकाही सुरळीत असे वाटत असेल तर हा मोठा गैरसमज आहे. कारण शेतकऱ्यांसमोरील संकटाची मालिका कायम सुरुच आहे. अवकाळी नंतर आता मराठवाड्यासह विदर्भात (Cloudy weather) ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय (Rabi Season) रब्बी हंगामातील पिकांना पोषक असणारी थंडीही कमी होत आहे. त्यामुळे पिकांवर कीड-रोगराई वाढण्यास पोषक वातावरण झाल्याने पीक वाढीला धोका निर्माण झाला आहे. विशेषत: हरभारा पिकावर घाटीअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे पेरणीपासून धोक्यात असलेल्या पिकांना जोपासण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकचा खर्च करावा लागणार आहे. आता घाटे लागवडीच्या अवस्थेतच हरभरा असताना ढगाळ वातावरणामुळे धोका वाढला आहे.

हरभऱ्याची विक्रमी लागवड

यंदा रब्बीचा पेरा हा महिन्याभर उशिराने झालेला आहे. अधिकच्या पावसामुळे वेळेत वाफसा झाला नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत रब्बी हंगामातील पेरण्या सुरु होत्या. यातच यंदा अधिकच्या पावसामुळे हरभरा पिकाला पोषक वातावरण असल्याचे कृषी विभागाने सांगतिले होते. एवढेच नाही तर हरभऱ्याचे क्षेत्र वाढावे यासाठी कृषि विभागाकडून अनुदानावर हरभरा बियाणांचे वाटप करण्यात आले होते. त्यामुळे ज्वारीला बाजूला सारत शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीवर अधिकचा भर दिला होता. आता क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे पण अवकाळी, गारपीट आणि आता ढगाळ वातावरणामुळे उत्पादनावर परिणाम होणार की काय अशी शंका आता उपस्थित होत आहे.

काय काळजी घ्यावी लागणार?

शेतकऱ्यांनी इमॅामेक्टीन बेंजाईन, फिनॅाल फॅासची फवारणी करावी, तसेच पक्षी थांबे तयार करुन पिकांचे संरक्षण करावे लागणार आहे. पक्षी थांबे बांधण्यासाठी उभे लाकूड रोवून त्यावर आडवे लाकूड बांधून अॅटेनाप्रमाणे आकार दिल्यास त्यावर पक्षी बसतात व त्यांना पिकांवरील अळी सहजपणे दिसू शकतात असे कृषी तंज्ञांनी सांगितले आहे. लहान आळ्या सुरुवातीला कवळी पाने, कळ्या, फुले, कुरतडून खातात घाटे भरल्यानंतर आणि घाट्यात डोके खुपसून दाणे फस्त करतात. साधारण एक आळी ही 30 ते 40 झाड्यांचे नुकसान करते त्यामुळे उत्पादनात घट होते

आळीचा प्रादुर्भाव हरभरा पिकासाठी धोकादायक

पाने पोखरणारी आळी ही 3 मी लांब असते ही आळी पानांमध्ये शिरून नागमोडी वळणाची पोखरण करते आणि पानाचा हिरवा भाग खाऊन उपजिवीका करते. अळीचा अधिकचा प्रादुर्भाव झाल्यास पानगळीला सुरवात होते. त्यामुळे पिकाची वाढ तर खुंटतेच पण उत्पादनावरही याचा परिणाम होतो. घाटे आळी शेळी अमेरिकन बोंड आळी हिरवी बोंडअळी हरभऱ्यातील घाटे आळी व शेंगा पोखरणाऱ्या आळी या नावाने ओळखले जाते. आळीचा प्रादुर्भाव कडधान्यांमध्ये तूर, हरभरा, वाटाणा, उडीद, मूग, मसूर तसेच चवळी व याचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे उत्पादनात घट होते.

संबंधित बातम्या :

Rice : बासमतीच मुंबईकरांच्या पसंतीला, पैशांची कुठे चिंता कुणाला?

नववर्षाचे शेतकऱ्यांना गिफ्ट अन् पंतप्रधान मोदींचा संदेशही, आज जमा होणार 10 हप्ता

PM KISAN : सर्वकाही करुनही ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नाही 10 वा हप्ता !

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.