रब्बीची पेरणी लांबणीवर ; शेतकऱ्यांनो अशी काळजी अन्यथा उत्पादनात होणार घट
अधिकच्या पावसामुळे शेतजमिनी ह्या सुपिक राहिल्या नाहीत तर आवळून आल्या होत्या. चिभडेलेल्या जमिनीमध्ये अद्यापही वापसे नाहीत. त्यामुळे पाणीसाठा असूनही त्याचा योग्य वापर होणार की नाही ही शंका आता उपस्थित होऊ लागली आहे. कारण नोव्हेंबर उजाडला तरी राज्यात केवळ 9 टक्के क्षेत्रावरच पेरणी झालेली होती.
लातूर : अतिवृष्टीचा ( rain affect sowing) परिणाम केवळ खरिपातील पिकांवरच नाही तर (Rabi season) रब्बीच्या पेरणीवरही पाहवयास मिळत आहे. सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने सिंचनाचा प्रश्न मिटलेला आहे पण पिक पेऱ्यातच अडचणी निर्माण होत आहेत. अधिकच्या पावसामुळे शेतजमिनी ह्या सुपिक राहिल्या नाहीत तर आवळून आल्या होत्या. ( percentage of sowing decreased) चिभडेलेल्या जमिनीमध्ये अद्यापही वापसे नाहीत. त्यामुळे पाणीसाठा असूनही त्याचा योग्य वापर होणार की नाही ही शंका आता उपस्थित होऊ लागली आहे. कारण नोव्हेंबर उजाडला तरी राज्यात केवळ 9 टक्के क्षेत्रावरच पेरणी झालेली होती.
खरिपात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. हे नुकसान रब्बी हंगामातून भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांचे अथक परीश्रम सुरु आहेत मात्र, याला निसर्गाचीही साथ गरजेची आहे. कारण रब्बी हंगामाबाबत शेतकरीच नाही तर कृषी विभागही मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. परंतू पेरण्या लांबणीवर पडल्या तर ज्वारी आणि करडईच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा हंगामात झालेला बदल लक्षात घेऊनच पेरणी करणे आवश्यक आहे.
कशामुळे होत आहे पेरणीला विलंब?
रब्बी हंगामातील पेरण्या ह्या ऑक्टोंबर अखेरीसच अंतिम टप्प्यात असतात. यंदा मात्र, नोव्हेंबर उजाडला तरी केवळ सरासरीच्या 9 टक्के क्षेत्रावर पेरा झाला आहे. पावसामुळे पेरणीला उशीर होणार हे अपेक्षित होते. शेतजमिनीत वाफसेच नसल्याने मशागत आणि पेरणीला उशिर झाला आहे. मात्र, अधिकचा विलंब झाला तर रब्बीतील मुख्य दोन पिकावर याचा परिणाम होणार आहे. ज्वारी हे रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. यंदा ज्वारीसाठी पोषक वातावरणही नाही आणि परेण्या उशिराने झाल्या तर याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे ज्वारी आणि करडईची पेरणी करताना शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिलेला आहे.
नोव्हेंबरपर्यंत केवळ सरासरीच्या 9 टक्के पेरण्या
दरवर्षी ऑक्टोंबर अखेरपर्यंत रब्बी हंगामातील सरासरीच्या क्षेत्रावर पेरण्या झालेल्या असतात. यंदा मात्र, पेरणीला उशिर होत आहे. 1 नोव्हेंबर पर्यंत केवळ 9 टक्के रब्बीतील पेरण्या झाल्या होत्या. यामध्येच चार दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने मराठवाड्यात हजेरी लावल्याने पेरण्या अणखिन लांबणीवर पडलेल्या आहेत. रब्बीत हरभरा आणि गव्हाचे क्षेत्र वाढणार असा अंदाज कृषिविभागाने व्यक्त केला होता. मात्र, आतापर्यंत हरभऱ्याचा पेरा 5 टक्के क्षेत्रावर झालेला आहे. हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र हे 17 लाख 34 हजार हेक्टर असून केवळ 88 हजार हेक्टरावर पेरणी झालेली आहे. मात्र, मुख्य पीक असलेल्या ज्वारीचा पेरा 18 टक्क्यांवर झालेला आहे.
कोणत्या पिकावर काय परिणाम होणार
खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने आता रब्बी हंगामाला अधिकचे महत्व आले आहे. यंदा पोषक वातावरणामुळे हरभरा आणि गव्हाचे क्षेत्र वाढणार असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. मात्र, बांधावरची स्थिती ही वेगळीच असून अद्यापपर्यंत एकुण रब्बीचा पेराच वाढलेला नाही. तर गव्हाच्या पेरणीचा श्रीगणेशाही झालेला नाही. ज्वारी आणि करडईच्या पेरणीला अधिक उशिर झाला तर याचे उत्पादन घटणार आहे. तर हरभरा आणि गहू हे थंडीमध्ये अधिक बहरतात त्यामुळे या पिकांच्या उत्पादनात घट होणार नसल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे. मात्र, ज्वारीपेक्षा इतर पिकांवर शेतकऱ्यांनी भर दिल्यावर उत्पादनात वाढ होणार आहे.
संबंधित बातम्या :
एक विमा कंपनी अन् 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धरले वेठीस, कृषी विभागाची थेट केंद्राकडे तक्रार
विमा कंपन्याची मुजोरी, फळबागायतदार वाऱ्यावर, कृषी विभागाची केंद्र सरकारकडे तक्रार