AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदा ऊसाचा गोडवा अधिक वाढणार, रब्बी पेरणीवरही परिणाम

शेती सिंचनाचा प्रश्न मिटल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आता ऊसाकडे आहे. राज्यात सरासरी 9 लाख हेक्टरावर ऊसाची लागवड केली जाते. यंदा पावसाने खरिपातील पिकांचे नुकसान केले असले तरी आता रब्बी आणि ऊसातून याचे नुकसान भरुन काढले जाईल या उद्देशाने बळीराजा तयारीला लागला आहे.

यंदा ऊसाचा गोडवा अधिक वाढणार, रब्बी पेरणीवरही परिणाम
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 06, 2021 | 1:51 PM

लातूर : गत दोन महिन्यात झालेल्या पावसाचा परिणाम केवळ खरीप, रब्बी हंगामापूरताच मर्यादित न राहता तो  (Sugarcane Area) ऊसाच्या क्षेत्रावरही होणार आहे. सध्या रब्बीच्या पेऱ्यातील घटत्या प्रमाणामुळे यंदा रब्बीपेक्षा शेतकऱ्यांचे लक्ष हे  (Sugarcane cultivation) ऊस लागवडीवर अधिकचे असणार आहे. (nutritious environment) पोषक वातावरणाचा फायदा हा तर रब्बी हंगामात हरभरा आणि गव्हाला होणार आहेच पण शेती सिंचनाचा प्रश्न मिटल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आता ऊसाकडे आहे. राज्यात सरासरी 9 लाख हेक्टरावर ऊसाची लागवड केली जाते. यंदा पावसाने खरिपातील पिकांचे नुकसान केले असले तरी आता रब्बी आणि ऊसातून याचे नुकसान भरुन काढले जाईल या उद्देशाने बळीराजा तयारीला लागला आहे.

आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातच ऊसाचे क्षेत्र अधिकचे होते पण काळाच्या ओघात ऊस लागवडीला मर्यादाच राहिलेल्या नाहीत. मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात असला तरी सिंचनाची सोय झाली की ऊसाचा लागवड केली जात आहे. यंदा तर मराठवाड्यातीलच नव्हे तर राज्यातील जलसाठे हे तुडूंब भरलेले आहेत. त्यामुळे ऊसाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवलेला आहे.

ऊस उत्पादनाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे महत्वाचे राज्य आहे. उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रात अधिकचे उत्पादन घेतले जाते. शिवाय ऊस हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. सध्या 15 ऑक्टोंबरपासून गळीत हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यापासून नविन लागवडीला सुरवात होणार असून यंदा शेतकऱ्यांचा भर हा ऊसावरच असणार आहे.

रब्बी पेरणीची टक्केवारी घटली

खरिपाच्या अंतिम टप्प्यात झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर हरभरा, गहू याचा पेरी वाढणार असा अंदाज वर्तवला जात आहे. पण दुसरीकडे पेरणीची टक्केवारी ही केवळ 9 आहे. ऑक्टोंबरमध्ये सरासरी एवढ्या क्षेत्रावर रब्बीचा पेरा झालेला असतो. मात्र, यंदा नोव्हेंबर उजाडला तरी केवळ 9 टक्के पेरणी झालेली आहे. त्यामुळे शेतकरी हे ऊस लागवडीच्या तयारीत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवाय ऊसासाठी पोषक वातावरण असून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी ही चांगली संधी आहे.

महाराष्ट्रातील ऊसाला साखरेचा उताराही अधिक

ऊस हे नगदी पीक आहे. त्यामुळे पडेल ते कष्ट करुन हे पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी प्रयत्न करतात. शिवाय राज्यातील वातावरणही ऊसासाठी पोषक आहे. येथील ऊसामुळे राज्याच्या सरासरी साखरेचा उतारा हा 11.40 टक्के एवढा आहे. जो राष्ट्रीय उताऱ्यापेक्षाही अधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ऊसाला अधिकची मागणी आहे. आता यंदा तर पोषक वातावरण मुबलक पाणीसाठा यामुळे ऊस लागवडीवर शेतकऱ्यांचा भर राहणार आहे.

अशी करा ऊसाची लागवड

उसाची लागवड करताना मध्यम जमिनीसाठी दोन सऱ्यातील अंतर 100 ते 120 सें.मी व चांगल्या प्रतिच्या जमिनीसाठी 120 ते 150 सें.मी. ठेवून सरीचा लांबी उतारानुसार 20 ते 40 मीटर ठेवावी. पट्टा पध्दतीने लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीसाठी 75-150 सें.मी. व भारी जमिनीसाठी 90-180 सें.मी पध्दतीचा अवलंब करावा. ऊसाची लागवड एक डोळा किंवा दोन डोळ्यांची टिपरी वापरून करावी. एक डोळा पध्दतीने लागण करावयाची असल्यास दोन डोळ्यातील अंतर 30. सें.मी ठेवावे. डोळा वरच्या बाजूस ठेवून मातीने झाकून पाणी द्यावे किंवा ऊस लागणीपूर्वी सरीत हलकेसे पाणी सोडावे व लागण करावी. दोन डोळ्यांची टिपरी वापरायची असल्यास दोन टिपऱ्यांमधील अंतर 15 ते 20 सें.मी. ठेवावी. यासाठी ओल्या पध्दतीने लागण केली तरी चालेल. मात्र टिपरी खोल दाबली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. लागणीसाठी भारी जमिनीसाठी एकरी 10,000 व मध्यम जमिनीसाठी 12,000 टिपरी लागतात.

संबंधित बातम्या :

दिवाळीमुळे हळदीला चढला पिवळा रंग, मागणीत वाढ दरात मोठा बदल

शेतकऱ्यांनाही बाजारपेठेचं ‘गणित’ कळलं, सोयाबीनच्या दरात होतेय सुधारणा

रब्बीची पेरणी लांबणीवर ; शेतकऱ्यांनो अशी काळजी अन्यथा उत्पादनात होणार घट