अतिवृष्टीच्या मदतीमध्ये वाढ करावी, अन्यथा सरकारला हादरवणारे आंदोलन करु, स्वाभिमानीचा इशारा

राज्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, राज्यसरकारने केवळ 10 हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले ते पुरेसे नसून शेतकऱ्यांना अतिरिक्त पॅकेज घोषित करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. (Ravikant Tupkar demanded government should increase compensation amount which announced for farmers)

अतिवृष्टीच्या मदतीमध्ये वाढ करावी, अन्यथा सरकारला हादरवणारे आंदोलन करु, स्वाभिमानीचा इशारा
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 8:02 PM

अमरावती : राज्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, राज्य सरकारने केवळ 10 हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले  आहे ते पुरेसे नसून शेतकऱ्यांसाठीअतिरिक्त पॅकेज घोषित करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. मदतीच्या रकमेत वाढ न केल्यास  आंदोलन करण्याचा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे. (Ravikant Tupkar demanded government should increase compensation amount which announced for farmers)

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून देण्यात आलेल्या रकमेत वाढ करावी. सोयाबीन आणि कापूस खरेदी केंद्रांच्या प्रश्नी तालुकास्तरावर स्वतंत्रपणे आंदोलन केली जाणार नाहीत.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आता विदर्भ आणि मराठवाड्यात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. तुपकर यांनी आज अमरावती येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करणार आहे. ऊस आणि दुधाच्या प्रश्वावर जसं आक्रमक आंदोलन केलं जाते.त्याच धर्तीवर सोयीबन आणि कापूसप्रश्नी आंदोलन केले जाईल, या आंदोलनाची सरकारला दखल घ्यावी लागेल, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.

केंद्र व राज्य सरकारच्या बेपर्वा धोरणांमुळे शेतकरी भरडला जातो आहे, असा आरोप तुपकर यांनी केला. केंद्राने सुद्धा मोठं मन केलं पाहिजे,त्यामुळे ही जबाबदारी कोणावर ढकलून चालणार नाही. आता दिवाळी आली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, नाहीतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या पुन्हा वाढतील, असं तुपकर म्हणाले आहेत.

राज्य सरकारने अतिवृष्टी झाल्यानंतर मदत म्हणून जाहीर केलेले 10 हजार कोटींची मदत पुरेशी नाही. त्यामुळे आगामी काळात सरकारने वाढीव मदत जाहीर करावी. सरकारने वाढीव मदत न दिल्यास पुढील आठवड्यात जनआंदोलन करण्याचा इशारा तुपकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

राज्यातील सरकारने शेतकऱ्यांना मदत केली आहे. केंद्र सरकारनेही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे, असं रविकांत तुपकर म्हणाले.

राज्य सरकाचे 10 हजार कोटींचे पॅकेज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 23 ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानातून सावरण्यासाठी 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. या 10 हजार कोटींमधील 5500 कोटी रुपयांची मदत कृषी विभागाला करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम इतर विभागांना देण्यात आले आहेत.

संंबंधित बातम्या :

रविकांत तुपकरांच्या शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग; लाखोंचे नुकसान

video | मुख्यमंत्र्यांकडून नुकसानग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर

(Ravikant Tupkar demanded government should increase compensation amount which announced for farmers)

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.