Cotton Crop: इतिहासात पहिल्यांदाच पांढऱ्या सोन्यानं कात टाकली, व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा, शेतकऱ्याला आनंदाचं भरतं!

शेतीमालाचे केवळ उत्पादन घ्यायचे आणि दराचे सर्व गणिते व्यापाऱ्यांच्या स्वाधीन करुन माल बाजारात घेऊन जायचं असंच असतं दरवर्षीचे शेतकऱ्याचं. गेल्या अनेक वर्षापासून हीच परंपरा कायम आहे. पण यंदाचे चित्र काही वेगळेच आहे. कापूस बाजारपेठेची सुत्रच जणू शेतकऱ्यांनेच हाती घेतली आहेत. योग्य दर मिळाला तरच विक्री अन्यथा साठवणूक हा निर्णय घेतल्यामुळे कापसाला गेल्या 50 वर्षात जो दर मिळाला नाही त्यापेक्षा अधिकचा दर यंदा मिळाला आहे.

Cotton Crop: इतिहासात पहिल्यांदाच पांढऱ्या सोन्यानं कात टाकली, व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा, शेतकऱ्याला आनंदाचं भरतं!
यंदा कापसाला विक्रमी दर मिळाला आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 10:57 AM

औरंगाबाद : शेतीमालाचे केवळ उत्पादन घ्यायचे आणि दराचे सर्व गणिते व्यापाऱ्यांच्या स्वाधीन करुन माल बाजारात घेऊन जायचं असंच असतं दरवर्षीचे शेतकऱ्याचं. गेल्या अनेक वर्षापासून हीच परंपरा कायम आहे. पण यंदाचे चित्र काही वेगळेच आहे. (Cotton Market) कापूस बाजारपेठेची सुत्रच जणू शेतकऱ्यांनेच हाती घेतली आहेत. योग्य दर मिळाला तरच विक्री अन्यथा (Cotton Stock) साठवणूक हा निर्णय घेतल्यामुळे कापसाला गेल्या 50 वर्षात जो दर मिळाला नाही त्यापेक्षा अधिकचा दर यंदा मिळाला आहे. शिवाय दिवसेंदिवस मागणीत वाढ ही ठरलेलीच आहे. (Cotton Sale) कापूस खरेदीसाठी व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा लागत असून त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कापूस हा 10 हजार 500 रुपयांवर स्थिरावलेला आहे. त्यामुळे उत्पादनात झालेली घट ही वाढीव दरातून शेतकऱ्यांच्या पदरात पडत आहे. खरीपातील केवळ कापसाने शेतकऱ्यांना यंदा तारलेले आहे. असे असूनही भविष्यात वाढीव दर मिळेल या आशेने साठवणूक ही सुरुच आहे.

यामुळे वाढत आहेत कापसाचे दर

केवळ घटलेले उत्पादन हेच एकमेव दरवाढीमागचे कारण आहे. त्यामुळेच हंगामाच्या सुरवातीपासून हमीभावापेक्षा अधिकचा दर कापसाला राहिलेला आहे. शिवाय दुसरीकडे सरकीचे दर वाढले की कापसाची मागणीत वाढ होत आहे. घटलेले उत्पादन, प्रक्रिया उद्योगासाठी वाढत असलेली मागणी यामुळे स्थानिक पातळीवर व्यापाऱ्यांमध्ये कापसू खरेदीसाठी स्पर्धा होत असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे.

कापूस वेचणी संपली, फरदडही वावराबाहेर

शेतकऱ्यांना जेवढी पिकाची काळजी नाही त्यापेक्षा अधिक व्यापारी हे तत्पर राहत आहेत. खरेदी आवक होताच वाढीव दराने कापसाची खरेदी केली जात आहे. राष्ट्रीय पातळीवर मागणी वाढत असल्यानेच व्यापारी हे अधिकच्या दराने खरेदी करीत आहे. सध्या कापसू वेचणी संपलेली आहे एवढेच नाही तर फरदडचेही उत्पादन घेऊन संपले असतानाही खरेदी केंद्रावर कमी प्रमाणातच आवक सुरु झाली आहे. यंदा प्रथमच व्यापाऱ्यांनी गावोगावी जाऊन कापसाची खरेदी केली आहे. तर दुसरीकडे खरिपात मोठे नुकसान झाले आहे. ते भरुन काढण्यासाठी केवळ कापूस हे एकच पीक हाती असून वाढीव दराची अपेक्षा असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

वाढत्या दरातही कापूस महामंडळाचा हस्तक्षेप नाही

कापूस गाठींचा तुटवडा भासत असतानाही यंदा कापूस महामंडळाने दराबाबत कोणताही हस्कक्षेप केलेला नाही. सरकारनेही यामध्ये हस्तक्षेप करुन वाढत्या दराला ब्रेक लावण्याचे काम केलेले नाही. उलट 17 हजार कोटी हे हमीभावाने कापूस खरेदी केलेला तोटा भरुन काढण्यासाठी दिले होते. त्यामुळे वाढत्या दराला कायम सरकारचाही पाठिंबा राहिल्यामुळे आज विक्रमी दर मिळत आहे. वाढत्या मागणीमुळे यंदा कापसाने 10 हजाराचा टप्पा पार केलेला आहे.

संबंधित बातम्या :

देर आए… दुरुस्त आए..: ज्वारी पिकाला मिळणार गतवैभव, स्थानिक पातळीवर काय होणार प्रयत्न ? वाचा सविस्तर

FRP : ज्याची धास्ती शेतकऱ्यांना ‘तोच’ निर्णय राज्य सरकारचा, ‘एफआरपी’ बाबत नेमके काय झाले?

बुडत्याला काडीचा आधार, आठ फळपिकांसाठी विमा योजना, राज्य सरकारचे एक पाऊल पुढे..!

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.