PM Kisan Scheme : शेतकऱ्यांना दिलासा, केंद्र सरकारडून ‘ई-केवायसी’ करीता पुन्हा मुदतवाढ

पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना किमान शेती व्यवसायासाठी आर्थिक मदत मिळावी हा उद्देश या योजने मागचा आहे. असे असताना जे अपात्र आहेत ते देखील योजनेचा लाभ घेत होते. ही बाब तीन वर्षानंतर सरकारच्या निदर्शनास आली आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या आदेशाने आता जे शेतकरी ई-केवायसी ही प्रक्रिया पूर्ण करतील त्यांनाच योजनेचा 12 हप्ता मिळणार आहे.

PM Kisan Scheme : शेतकऱ्यांना दिलासा, केंद्र सरकारडून 'ई-केवायसी' करीता पुन्हा मुदतवाढ
पीएम किसानImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 5:21 PM

मुंबई :  (PM Kisan Scheme) पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या अनुशंगाने पुन्हा एकदा मोठा बदल करण्यात आला आहे. या योजनेचा 12 वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना (e-KYC) ‘ई-केवायसी’ हे बंधनकारक राहणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाली तरच शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याचे 2 हजार रुपये मिळणार नाहीत. याकरिता 30 जून 2022 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा म्हणून या मुदतीमध्ये वेळोवेळी वाढ करण्यात आली आहे. त्याचा फायदाही (Farmer) शेतकऱ्यांना झालेला आहे. 12 हप्ता हा सप्टेंबर ते ऑक्टोंबर पर्यंत मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता 31 ऑगस्टपर्यंत बँक खात्याचे ई केवायसी करता येणार आहे.

कशामुळे ‘ई-केवायसी’ अट?

पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना किमान शेती व्यवसायासाठी आर्थिक मदत मिळावी हा उद्देश या योजने मागचा आहे. असे असताना जे अपात्र आहेत ते देखील योजनेचा लाभ घेत होते. ही बाब तीन वर्षानंतर सरकारच्या निदर्शनास आली आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या आदेशाने आता जे शेतकरी ई-केवायसी ही प्रक्रिया पूर्ण करतील त्यांनाच योजनेचा 12 हप्ता मिळणार आहे. योजनेपासून शेतकरी वंचित राहू नये म्हणून मुदतीमध्ये वाढ केली जात आहे. पण आता शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केंद्राने केले आहे.

अशी करा प्रक्रिया पूर्ण

*आता केवायसी करण्यासाठी दोन पर्याय आहेत एक म्हणजे तुमचा फोन नंबर आधार कार्ड से लिंक असेल तर तुम्ही आधार बेस्ट केवायसी करू शकता त्यासाठी फार्मर कॉर्नर मध्येही केवायसी ला क्लिक करायचे आहे मोबाईल नंबर आधार कार्ड सिलिंग नसेल तर सीएससी केंद्रावर जाऊन कागद पत्र देऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे

* आधारकार्ड वापरून eKYC कसे करायचे? फार्मर कॉर्नर वरती eKYC ला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आधार केवायसी नावाचे एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये सुरुवातीला आधार कार्ड क्रमांक त्यानंतर समोरच्या बॉक्समधील अक्षरे आणि अंक आहेत तशी टाकायची आहेत. त्यानंतर search या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये सुरुवातीला आधार नंबर दिसेल त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे तोच येथे टाकायचा आहे…त्यानंतर Get Otp यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मोबाईलवर OTP नंबर येईल तो OTP येथे submit करायचा आहे. त्यानंतर submit for Auth यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर EKYC is successful submitted असा sms दिसेल. याचाच अर्थ ekyc submitted यशस्वी झाला आहे. यादरम्यान invalid असा पर्याय समोर येत असेल तर काही दिवसांनी ekyc करायचे किंवा CSC केंद्रावर जाऊन कागदपत्रे जमा करून ekyc करून घ्यावे लागणार आहे.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....