अभिमानास्पद..! अकोला कृषी विद्यापीठाच्या संशोधनाची केंद्रीय समितीलाही घ्यावी लागली दखल, शेतकऱ्यांनाही दुहेरी फायदा
कृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून विविध बाबींमध्ये संशोधन होऊन त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होणे गरजेचे आहे. सरकारचा हाच उद्देश साध्य केला आहे तो डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या भाजीपाला शास्त्र विभागातील शास्त्र विभागातील तज्ञांनी. या विभागातील तज्ञांनी एका भाजीपाला वाणाची निर्मिती केली असून त्याची दखल आता केंद्रीय वाण प्रसारण समितीनेही घेतली आहे.
अकोला : कृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून विविध बाबींमध्ये संशोधन होऊन त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होणे गरजेचे आहे. सरकारचा हाच उद्देश साध्य केला आहे तो (Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (Vegetable Science) भाजीपाला शास्त्र विभागातील शास्त्र विभागातील तज्ञांनी. या विभागातील तज्ञांनी एका भाजीपाला वाणाची निर्मिती केली असून त्याची दखल आता केंद्रीय वाण प्रसारण समितीनेही घेतली आहे. भाजीपाल्यामध्ये ‘पीडीकेव्ही ऋतुजा’ या नवीन वाणाची निर्मिती केली आहे. हे चवळीचे वाण असून हे प्रसारित झाल्यानंतर आता (Central Committee) केंद्रीय समितीनेही राज्यासाठी हे अधिसूचित केले आहे. त्यामुळे अकोला विद्यापीठासाठी ही अभिमानाची गोष्ट असून आता या वाणाचा वापर शेतकऱ्यांना रब्बी आणि खरीप हंगामातही करता येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून यावर संशोधन सुरु होते. अखेर तज्ञांच्या या अभिनव उपक्रमाला यश मिळाले आहे.
रब्बी आणि खरिपातही करता येणार लागवड
उत्पादन वाढीसाठी जो प्रयत्न केला जात आहे तो उद्देश या ‘पीडीकेव्ही ऋतुजा’ या वाणातून साध्य होणार आहे. कमी वेळेत अधिकचे चवळीचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार आहे. शिवाय रब्बी आणि खरीप अशा दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना याचे उत्पन्न घेता येणार आहे. रोग व किडीला हे बळी पडत नसल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. गेल्या 9 वर्षापासून याच्या वेगवेगळ्या चाचण्या घेतल्या जात होत्या. ऑक्टोंबर 2020 मध्ये राज्यातील चारही कृषी विद्यापीठाने या वाणाची उन्हाळी आणि खरीप हंगामात लागवड करण्याची शिफारस केली असल्याचे तज्ञ डॉ. विजय काळे यांनी सांगितले होते.
‘पीडीकेव्ही ऋतुजा’ या चवळीच्या शेंगाच्या वाणाची वैशिष्टे
कमी कालावधीमध्ये अधिकचे उत्पन्न याचे वैशिष्टे असून हे वाण 55 ते 60 दिवसांमध्ये फुलोऱ्यात येते. 90 दिवसांमध्ये पीक शेतकऱ्यांच्या पदरात पडते आणि याच्या शेंगाही आकर्षक असतात. शेंगाची लांबी 15 ते 20 सेंटीमिटर असून एका शेंगामध्ये 10 ते 12 बिया असतात. कोवळ्या शेंगा भाजीसाठीही वापरल्या जातात. शिवाय ही बुटकी जात असल्याने त्याला कोणताही आधार देण्याची गरज नाही. एका हेक्टरामध्ये 80 ते 90 क्विंटल उत्पादन मिळेल असा दावा करण्यात आला आहे.
लागवडीसाठी योग्य जमिन
चवळीची लागवड करण्यासाठी मध्यम ते भारी शेतजमिन गरजेची आहे. पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीवरच लागवड केल्यावर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. क्षारयुक्त व पाणथळ जमिनीवर याची लागवड करुच नये. शेत जमिनीची नांगरट केल्यावर त्यामध्ये शेणखत आणि कंपोस्ट खत मिसळूनच लागवडीची प्रक्रीया करावी लागणार आहे. प्रति हेक्टरी 15 ते 20 किलो बियाणे वापरुन सरी ओरंब्यावर टोकण पध्दतीने लागवड केल्यास उत्पादनात वाढ होणार आहे.
संबंधित बातम्या :
देर आए दुरुस्त आए..! सोयाबीन बाबतचा शेतकऱ्यांचा ‘तो’ एकच निर्णय ठरला ‘टर्निंग पॉईंट’
सरकारला दूधापेक्षा दारू महत्वाची, मद्य निर्णयाबद्दल काय आहे दूध संघाचे धोरण?
Untimely Rain : धोका कायम, भंडाऱ्यात पुन्हा अवकाळीची शक्यता! पिकांची घ्यावी लागणार काळजी