AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संशोधकांची किमया : शेळ्यांमध्येही आता ‘टेस्ट ट्यूब बेबी’ या तंत्राचा वापर

टेस्ट ट्यूब बेबी या तंत्राचा वापर करून शेळीमध्ये शरीरबाह्य फलन आणि भ्रूण निर्मितीबाबत यशस्वी संशोधन करण्यात आले. संस्थेच्या परीसरात एका शेळीने तीन करडांना जन्म दिला. त्यामुळे या संशोधनाचा लाभ आता इतर व्यवसायिकांनाही घेता येणार आहे.

संशोधकांची किमया : शेळ्यांमध्येही आता 'टेस्ट ट्यूब बेबी' या तंत्राचा वापर
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 5:37 PM

अकोला : व्यवसायात कमी कालावधीत अधिकची प्रगती करायची असेल तर उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रीत केले जाते. शेतीसह त्याच्या जोडव्यवसयात तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. शेळीपालन हा व व्यवसाय सामान्य शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक आहे. शेती व्यवसाशी निगडीत असल्याने आता (Marathwada) मराठवाडा, विदर्भ या भागात व्यवसयाचे प्रमाण हे वाढत आहे. (Veterinary and Veterinary Institute, Akola) पण पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला येथील पशुप्रजनन, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाने जी किमया केली आहे त्यामुळे व्यवसायाला अधिक मोठे स्वरुप मिळणार आहे.

टेस्ट ट्यूब बेबी या तंत्राचा वापर करून शेळीमध्ये शरीरबाह्य फलन आणि भ्रूण निर्मितीबाबत यशस्वी संशोधन करण्यात आले. संस्थेच्या परीसरात एका शेळीने तीन करडांना जन्म दिला. त्यामुळे या संशोधनाचा लाभ आता इतर व्यवसायिकांनाही घेता येणार आहे. शेळ्यांची उत्पादकता तशी सहा महिन्यांनी होतेच पण व्यवसायिकांना याचे उत्पादन वाढवून अधिकचा फायदा कसा करुन देती येईल त्याअनुशंगाने या संस्थेने घेतलेला पुढाकार नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.

टेस्ट ट्यूब बेबी तंत्राद्वारे कसे केले संशोधन

या माध्यमातून गर्भधारणा तशी धोक्याची होती. पण पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था येथील संशोधकांनी ही प्रयोग यशस्वी करुन दाखवली आहे. संशोधनाबाबत प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. चैतन्य पावशे यांनी सांगितले, की शरीरबाह्य फलन आणि भ्रूणनिर्मिती प्रयोगासाठी कत्तलखान्यातून शेळ्यांची बिजांडे आणली. त्यातील स्त्रीबीजकोषातून स्त्रीबीजे बाहेर काढली. त्यांना प्रयोगशाळेत योग्य माध्यमात परिपक्व करून फलन माध्यमात शुक्राणू सोबत फळवली गेले. फलन माध्यमात शुक्राणू टाकण्याआधी वीर्यातील नको असलेले घटक काढून त्यावर उपचार केले. योग्य तेच शुक्राणू फलन माध्यमात स्त्रीबीजासोबत सोडण्यात आले. भ्रूण प्रत्यारोपणक्षम होईपर्यंत दोन ते तीन दिवस प्रयोगशाळेत योग्य माध्यमात इन्क्यूबेटरमध्ये ठेवण्यात आले. 60 ते 72 तासांनंतर 4 ते 8 पेशी असलेले भ्रूण शस्त्रक्रिया करून प्रत्यारोपणक्षम भ्रूण दाई शेळीमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. यासाठी दाई शेळ्यांची निवड पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरून करण्यात आली. प्रत्यारोपित केलेल्या शेळ्यांची गर्भ तपासणी करण्यात आली. यामध्ये सहापैकी एका शेळीने 150 दिवसानंतर तीन करडांना यामध्ये 2 नर व 1 मादी जन्म दिला आहे.

प्रक्रिया किचकट पण व्यवसायिकांच्या फायद्याची

टेस्ट ट्यूब बेबी तंत्राद्वारे हा प्रयोग तसा किचकट आहे पण या करिता पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था येथील संशोधकांनी अथक परीश्रम आणि संशोधन केले होते. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे शेळीपालन व्यवसयातून अधिकचे उत्पादन तर होणारच आहे शिवाय यामध्ये नर करडे जन्माला येतील यासाठी अधिकचे प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेळ्यावर हा प्रयोग करण्यात आला नसला तरी भविष्यात नक्कीच व्यवसायिकदारांना याचा फायदा होणार आहे. (Researchers’ Alchemy: Even in goats, test tube baby technique is now used)

संबंधित बातम्या :

आस्मानी संकट त्यात चोरट्यांचा धुमाकूळ, हताश 65 वर्षीय शेतकऱ्याची कहाणीच निराळी

खरीपातील विमा परताव्यानंतर रब्बीच्या पीकविमा योजनेसाठी ‘अशी’ आहे प्रक्रिया

मत्स्यपालनाच्या सर्वोत्तम 5 टीप्स अन् जाणून घ्या सापळा लावण्याचे महत्वही

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.