Grape : द्राक्षे विक्रीपेक्षा बेदाणा निर्मितीवरच शेतकऱ्यांचा भर, कशामुळे झाला हा बदल?

. बागायतदार हे द्राक्ष बाजारपेठेत नाही तर बेदाणा तयार करण्यासाठी वेगवेगळ्या शेडवर पाठवताना दिसत आहेत. यंदा द्राक्ष घड पोसण्यासाठी पोषक वातावरण नव्हते. त्याचा परिणाम आता काढणी झाल्यावर प्रकर्षाने जाणवू लागला आहे. दरम्यानच्या काळात घडकूज, मणीगळ एवढेच नाही डाऊनी सारख्या रोगामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकासान झाले होते.

Grape : द्राक्षे विक्रीपेक्षा बेदाणा निर्मितीवरच शेतकऱ्यांचा भर, कशामुळे झाला हा बदल?
बेदाणा संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 7:30 AM

सांगली : गेल्या वर्षभरातील वातावरण बदलाचा परिणाम काय होतो हे आता (Vineyards) द्राक्ष बागायतदाराची अवस्था पाहून लक्षात येत आहे. दरवर्षी द्राक्षांची काढणी झाली की लगबग असते ती माल बाजारपेठेत पोहचवण्याची मात्र, यंदाची स्थिती ही वेगळीच आहे. बागायतदार हे द्राक्ष बाजारपेठेत नाही तर बेदाणा तयार करण्यासाठी वेगवेगळ्या शेडवर पाठवताना दिसत आहेत. यंदा (Grape Pot) द्राक्ष घड पोसण्यासाठी पोषक वातावरण नव्हते. त्याचा परिणाम आता काढणी झाल्यावर प्रकर्षाने जाणवू लागला आहे. दरम्यानच्या काळात घडकूज, मणीगळ एवढेच नाही डाऊनी सारख्या रोगामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकासान झाले होते. हे कमी म्हणून की काय (Increasing cold) वाढत्या थंडीमुळे द्राक्षांच्या मागणीत घटही झाली आहे. सर्वकाही नुकसानीचे होत असल्याने शेतकरी आता बाजारपेठेतील विक्रीपेक्षा बेदाणा तयार करण्यावरच भर देत आहे. त्यामुळे यंदा झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी मुख्य बाजारपेठीची तमा न करता बेदाण्यातून का होईना झालेला खर्च काढण्याचे प्रयत्न करीत आहे.

बेदाणा निर्मीतीमध्येही अडचणी

वातावरणातील लहरीपणामुळे द्राक्षांचे तर नुकसान झालेच आहे पण आता बेदाणा बनवण्यासाठीही पोषक वातावरण नाही. बेदाणा निर्मीतीचा हंगाम जानेवारी महिन्यातच असतो. प्रतिकूल परस्थितीमध्ये ज्यांच्या बागा साधलेल्या आहेत ते शेतकरी आता विक्री बरोबर बेदाणा निर्मीतीवरही भर देत आहेत. बेदाणा निर्मीतीसाठी स्वच्छ सूर्यप्रकाश आवश्यक असतो. पण गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण तर आहेच पण धुक्याचेही सावट आहे. त्यामुळे बेदाणा निर्मिती तर लांबणीवर पडणारच आहे पण या वातावरणाचा परिणाम बेदाण्यावर होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वी द्राक्षांचे नुकसान झाले आहे आता बेदाणा निर्मितीसाठी अनुकूल वातावरण नसल्याने द्राक्ष उत्पादकांबाबत सर्वकाही नुकसानीचे ठरत आहे.

वाढलेल्या थंडीमुळे घडकूज

द्राक्ष बागा जोपासण्यासाठी शेतकऱ्यांना एक ना अनेक शर्थीचे प्रयत्न करावे लागले आहेत. शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करुन मध्यंतरीच्या गारठ्यात द्राक्ष बागांना ऊब मिळावी म्हणून बागेमध्ये शेकोट्या पेटवाव्या लागल्या होत्या. सर्व काही करुनही शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका ही कायमच आहे. द्राक्षातून नाही किमान बेदाण्यातून का होईना उत्पन्न पदरी पडेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. पण त्याकरिताही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सांगली जिल्ह्यात 400 ते 500 शेटवर बेदाण्याची निर्मीती

बाजारपेठेत विक्री न झालेल्या द्राक्षांचा बेदाणा केला जातो. याची एक स्वतंत्र यंत्रणा असते. जिल्ह्यात जवळपास 400 ते 500 शेडवर बेदाण्याची निर्मीती केली जाते. पण यंदा ना द्राक्षाचा दर्जा सुधारण्यासाठी पोषक वातावरण आहे ना बेदाणा निर्मितीसाठी. गेल्या वर्षभरापासून द्राक्ष बागांची जोपासना करुनही आता ना द्राक्षातून ना बेदाण्यातून उत्पन्न पदरी पडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.

संबंधित बातम्या :

Papaya: दर निश्चिती होऊनही अंमलबजावणी नाही, बाजार समितीच्या निर्णयाला कुणाचा अडसर?

Sugarcane Sludge : क्षेत्र वाढले, गाळप रखडले आता अवघे दोन महिने उरले..!

Soybean Rate: हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांची भूमिका बदलली, आवक वाढली दराचे काय?

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.