Weather Report : विदर्भात उन्हाच्या झळा कायम, 4 दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ मराठवाडाही होरपळतोय

गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट ही कायम आहे. या दरम्यानच्या काळात नागपूरचे तापमान 44.3 अंश सेल्सिअस, यवतमाळ 44.7 अंश सेल्सिअस तर अमरावती 44.4 अंश सेल्सिअस अशी नोंद झाली होती. शिवाय आगामी चार ते पाच दिवस अशी स्थिती राहिल असा अंदाज आहे.

Weather Report : विदर्भात उन्हाच्या झळा कायम, 4 दिवस 'ऑरेंज अलर्ट' मराठवाडाही होरपळतोय
विदर्भात उष्णतेची लाटImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 10:54 AM

नागपूर :  (Meteorological Department) हवामान विभागाचा अंदाज अगदी तंतोतंत खरा उतरत आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात जणू काही सूर्य आग ओकतोय अशीच स्थिती झाली आहे. या (Vidarbh) विभागातील अकोला, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये तर पारा 45 अंशापेक्षा वर गेला होता. पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातले असतानाच विदर्भात आणि (Marathwada) मराठवाड्यात उन्हाच्या झळा ह्या दिवसेंदिवस वाढत आहेत. एकीकडे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे तर दुसरीकडे विदर्भात उन्हामुळे घराबाहेर डोकावणेही मुश्किल झाले आहे. राज्यात चंद्रपूर येथे सर्वाधिक 45.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. शिवाय 2 मे पर्यंत विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’ चा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

उष्णतेची लाट कायम, मुख्य जिल्ह्यामध्ये असा हा उन्हाचा पारा

गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील तापमानात वाढ झाली आहे. तर हवामान विभागाचा अंदाज हा खरा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट ही कायम आहे. या दरम्यानच्या काळात नागपूरचे तापमान 44.3 अंश सेल्सिअस, यवतमाळ 44.7 अंश सेल्सिअस तर अमरावती 44.4 अंश सेल्सिअस अशी नोंद झाली होती. शिवाय आगामी चार ते पाच दिवस अशी स्थिती राहिल असा अंदाज आहे.

2 मे पर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’

सध्या उन्हाचा पारा हा 45 अंशापर्यंत गेला असला तरी अशीच परस्थिती आणखीन काही दिवस राहणार आहे. शिवाय शुक्रवारसाठी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला होता. आता शनिवारपासून 2 मे पर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही-लाही होत आहे. विभागातील प्रामुख्याने अकोला, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ येथे तापमानात आणखीन वाढ होईल असा अंदाज आहे. अकोला-45.4, अमरावती 44.4, बुलडाणा-42. 3, ब्रम्हपूरी-45.2, गडचिरोली 42.8 अशा प्रकारे वाढ झाली आहे.

मराठवाड्यातही तापमानात वाढ

विदर्भाप्रमाणेच मराठवाड्यात तापमानात कमालीची वाढ झाली आहे. उस्मानाबाद, लातूर, परभणी या जिल्ह्यांध्ये तापमानात वाढ झाली आहे. सध्या रब्बी हंगामाती पिकांची काढणी कामे झाले असली तरी आता मशागतीच्या कामांना देखील अडथळा निर्माण होत आहे. एप्रिल महिन्याचा शेवट आणि मे महिन्याच्या सुरवातीलाही असेच वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.