भविष्यातील धोका टाळण्यासाठी माफक दरात सोयाबीनची विक्री
शेतकऱ्यांना आता वाढीव दराची अपेक्षा नाही. किमान यापेक्षा दर कमी होऊ नयेत यामुळे सोयाबीन विक्रीवर शेतकरी भर देत आहेत. गेल्या चार दिवसांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 40 ते 45 हजार क्विंटलची आवक सुरु आहे. असे असताना दर हे स्थिर असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. गत आठवड्यात दर हे 4 हजार 800 वर आले होते.
लातूर : यंदाच्या हंगामात (Soyabean) सोयाबीनचे दर हे निम्म्याने घटलेले आहेत. (Latur Market) सध्या सोयाबीनला 5 हजाराचा दर मिळत आहे. (Soyabean Rate) शेतकऱ्यांना आता वाढीव दराची अपेक्षा नाही. किमान यापेक्षा दर कमी होऊ नयेत यामुळे सोयाबीन विक्रीवर शेतकरी भर देत आहेत. गेल्या चार दिवसांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 40 ते 45 हजार क्विंटलची आवक सुरु आहे. असे असताना दर हे स्थिर असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. गत आठवड्यात दर हे 4 हजार 800 वर आले होते.
त्यामुळे सोयाबीनची विक्री करावी की साठवणूक असा प्रश्न निर्माण झाला होता. आता मात्र, दर स्थिर झाले आहेत. सोयाबीनच्या दर्जानुसार दर मिळत आहेत. कारण पावसामुळे सोयाबीन हे डागाळलेले आहे. दर्जात्मक धानाला 5 हजाराचा दर आहे. शिवाय दिवाळीपर्यंत हेच दर कायम राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
काढणी-मळणी अंतिम टप्प्यात
गत आवठड्यापर्यंत पावसाचे थैमान आणि जागोजागी पाणी साचल्याने पीक काढणीला अडथळा निर्माण होत होता. मात्र, चार दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली आहे. शिवाय ऑक्टोंबर हीट जाणवू लागली आहे. त्यामुळे काढणी बरोबरच मळणीची कामेही वेगात सुरु आहेत. चांगल्या प्रतिच्या सोयाबीनची शेतकरी साठवणूक करीत आहेत तर डागाळलेले सोयाबीन विक्रीसाठी घेऊन येत आहेत. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाकाठी 40 ते 45 हजार क्विंटल सोयाबीनची आवक सुरु आहे. यंदा प्रथमच सोयाबीनच्या उत्पादनातून शेतकऱ्यांची निराशा झालेली आहे.
मुख्य बाजारपेठ म्हणून लातूरालाच पसंती
मराठवाड्यात सर्वाधिक सोयाबीनची आवक ही लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत आहे. कारण बीड उस्मानाबाद, सोलापूर, लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भात तसेच कर्नाटकातूनही या ठिकाणी सोयाबीन आणले जाते. शिवाय येथील तेल कंपन्याही थेट शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी करतात. यंदा उशीराने आवक वाढलेली आहे. हंगामाच्या सुरवातीला ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली आहे. त्यांना समाधानकारक दर मिळालेला आहे.
उडदाने दिला मोठा आधार
खरीपात मूग हा कमी प्रमाणात घेतला जातो. शेतकऱ्यांचा भर हा सोयाबीन, कापूस आणि तुरीवर असतो. उडदाची काढणी ही पावसाला सुरवात होण्यापूर्वीच झाली होती. त्यामुळे त्याचा दर्जाही चांगला होता. सुरवातीपासूनच उडदाला 7 हजार ते 7 हजार 500 चा दर राहिलेला होता. त्यामुळे उडदातून शेतकऱ्यांच्या पदरी पैसे पडलेले आहेत. शिवाय रब्बीची पेरणी आणि आगामा काळातील सणालाही उडदामुळे आधार मिळाला आहे.
इतर शेतीमालाचे कसे आहेत दर
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शुक्रवारी लाल तूर- 6214 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6260 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6050 रुपये क्विंटल, जानकी चना 5000 रुपये क्विंटल, विजय चणा 5000, चना मिल 4850, सोयाबीन 5250, चमकी मूग 7100, मिल मूग 6300 तर उडीदाचा दर 7350 एवढा राहिला होता. (Soyabean prices remain stable, farmers also relieved as sales continue to grow)
संबंधित बातम्या :
विमा अर्ज ऊसाच्या फडात आज केंद्रातील अधिकारी थेट नांदेडात
शेतकऱ्यांनो गारपीट, वादळाचा विमा हप्ता बॅंकेतच जमा करा अन्यथा….
जनावरांची ऑनलाईल खरेदी-विक्री, शेतकऱ्याला लाखोंचा गंडा ; अशी घ्या काळजी