सोयाबीनच्या दर वाढणारच शेतकऱ्यांनी केवळ ‘या’ गोष्टींचे पालन करावे, शेतकऱ्यांना कृषितज्ञांचा काय आहे सल्ला?

सोयाबीनच्या आवकमध्ये चढ-उतार आढळून येईल मात्र, दरात कायम वाढ होत आहे. केवळ राज्यातच नाही तर आंतराष्ट्रीय बाजारपेठेतही मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. आगामी काही काळापर्यंत अशीच स्थिती राहणार असल्याने गतवर्षीचा विक्रमी दरही यंदा शेतकऱ्यांना मिळू शकतो. केवळ अजून महिनाभर तर सोयाबीन विक्रीची गडबड करु नये असा सल्ला कृषितज्ञांकडून दिला जात आहे.

सोयाबीनच्या दर वाढणारच शेतकऱ्यांनी केवळ 'या' गोष्टींचे पालन करावे, शेतकऱ्यांना कृषितज्ञांचा काय आहे सल्ला?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 27, 2021 | 3:23 PM

लातूर : सोयाबीनच्या आवकमध्ये चढ-उतार आढळून येईल मात्र, दरात कायम वाढ होत आहे. केवळ राज्यातच नाही तर आंतराष्ट्रीय बाजारपेठेतही मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने (Soybean Rate) सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. आगामी काही काळापर्यंत अशीच स्थिती राहणार असल्याने गतवर्षीचा विक्रमी दरही यंदा शेतकऱ्यांना मिळू शकतो. केवळ अजून महिनाभर तर सोयाबीन विक्रीची गडबड करु नये असा सल्ला कृषितज्ञांकडून दिला जात आहे.

कृषी बाजार समित्यांमध्ये एकतर सोयाबीनच्या दरात दिवसाकाठी 100 ते 150 रुपयांची वाढ होत आहे किंवा आहे तो दर स्थिर राहत आहे. त्यामुळे आता दर कमी होतील असे बाजारपेठेतले वातावरणच नाही. शिवाय सोयाबीनची आवक कमी होत असल्याने मागणी वाढत आहे. शनिवारी (Latur Agricultural Produce Market Committee) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ 10 हजार पोत्यांची आवक झाली होती तर सरासरी दर हा 6 हजार 500 एवढा होता. गेल्या काही दिवसांपासून दर स्थिर असले तरी आवक कमी जास्त होत आहे.

प्रक्रिया उद्योजकाकंडून अधिकची मागणी

लातूर जिल्ह्यात खाद्यतेल प्रक्रिया करणारे उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. या प्रक्रिया उद्योजकांकडूनच सोयाबीनची अधिक खरेदी होत आहे. केवळ कृषी उत्पन्न बाजार समितीच नाही तर मुख्य गावांचा ठिकाणी खरेदी केंद्राच्या माध्यमातून सोयाबीन घेतले जात आहे. मात्र, अशा खरेदी केंद्रावर अधिकचा दर असतनाही शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी आणत नाही तर साठवणूकीवर भर देत आहे. 4 हजार 600 दर असताना बाजार समितीमध्ये 15 ते 18 हजार पोत्यांची आवक होती. आता दर हे 6 हजार 500 वर गेले आहेत. असे असताना शनिवारी केवळ 10 हजार पोत्यांची आवक झाली होती. शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की, सोयाबीनला यंदा विक्रमी दर मिळेल याची.

भाववाढ सुरुच, आवक जेमतेम

दिवसाकाठी सोयाबीनच्या दरात 100 ते 150 रुपयांची वाढ होत आहे. असे असताना आवक मात्र, 10 हजार पोत्यांची. आतार्यंत दर वाढले की आवक मोठ्या प्रमाणात होत होती. यामुळे दुसऱ्याच दिवशी दर हे कमी होत होते. बाजारातील हेच सुत्र शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे एक शेतकरी सगळेच सोयाबीन विक्री करीत नाही तर गरजेप्रमाणेच विक्री करीत आहे. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उस्मानाबाद, बीड, कर्नाटक, बिदर या ठिकाणांहून आवक होत असते. यंदा मात्र, अधिकतर आवक केवळ जिल्हाभरातूनच सुरु आहे. अद्यापही इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणलेले नाही. त्यामुळे शेतकरीही विक्रमी दर मिळाल्याशिवाय सोयाबीन विक्रीच्या मानसिकतेमध्ये आहेत असे वाटत नाही.

सोयापेंडच्या आयातीला विरोध

मध्यंतरी सोयापेंड आयातीचा मुद्दा मोठा चर्चेत होता. त्यामुळे पुन्हा सोयापेंडची आयात झाली तर याचा थेट परिणाम हा सोयाबीन दरावर होणार होता. मात्र, सोयापेंड आयातीला शेतकऱ्यांमधून तर विरोध होतच आहे पण राज्य सरकारनेही आता सोयापेंड आयातीला विरोध दर्शविला आहे. तर दुसरीकडे कडधान्य साठवणूकीवरील मर्यादा हटविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता व्यापारी, उद्योजक हे मोठ्या प्रमाणात साठवणूक करु लागले आहेत. त्यामुळे दरही वाढत आहेत. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गहू, ज्वारी, हरभरा, तूर, उडीद या शेतीमालाची जेमतेम आवक सुरु आहे.

संबंधित बातम्या :

तुम्हाला माहिती आहे का झाडे अचानक का सुकतात? हवामान बदलाचा परिणाम की अणखीन काही…!

विज तोडणीवरुन मनसे आक्रमक, तर अधिकाऱ्यांना झाडाला बांधूनच..!

पिक विमा कंपन्यांच वागणं बरं नव्हं..! थेट केंद्र सरकारच्या योजनेवरच परिणाम

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.