AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उडीदाबरोबर सोयाबीनचेही दर स्थिर, लातूरच्या बाजारात सोयाबीनची आवक वाढली

गेल्या दोन दिवसांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. पण आवकही कमी होती. (Latur) शुक्रवारी मात्र, दरही वाढले आणि आवकही. त्यामुळे (Farmer) शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे उडीदाची आवक सुरु झाल्यापासून उडदाचे दर हे स्थिर राहिलेले आहेत.

उडीदाबरोबर सोयाबीनचेही दर स्थिर, लातूरच्या बाजारात सोयाबीनची आवक वाढली
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 5:38 PM

लातूर : आठवड्याच्या सुरवातीला सोयाबीनचे घसरवलेले दर हळुहळू का होईना सावरु लागले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. पण आवकही कमी होती. (Latur) शुक्रवारी मात्र, दरही वाढले आणि आवकही. त्यामुळे (Farmer) शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे उडीदाची आवक सुरु झाल्यापासून उडदाचे दर हे स्थिर राहिलेले आहेत. मध्यंतरी (Soyabean) सोयाबीन दराच्या चढ-उतारामुळे नेमके बाजारात काय चित्र राहणार याकडे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. पण शुक्रवारी खरीपातील या दोन्ही मुख्य पिकांनी शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे.

शुक्रवारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 7600 क्विंटलचा दर मिळाला तर पोटगीतले दर हे 7000 एवढे होते. त्यामुळे आठवड्याभरातील हा सर्वेत्तम दर मानला जात आहे.

सोयाबीनवरच शेतकऱ्यांची आर्थिक मदार आहे. मात्र, नव्या सोयाबीनची आवक सुरु झाली की, दर घटण्यास सुरवात झाली होती. मुहुर्ताचे दर हे 11 हजारापर्यंत देण्यात आले होते पण ते टीकून राहणारे नव्हते. या दरम्यान, सोयाबीनला खरा दर हा 9600 एवढा होता. मात्र, नव्या सोयाबीनची आवक सुरु झाली की दर हे 5600 वर येऊन ठेपले होते. त्यामुळे शेतकऱ्यांध्ये चिंतेचे वातावरण होते.

यानंतर पावसामुळे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आवक ही कमी झाली होती. आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत असा अंदाज बांधला जात होता. पण शुक्रवारी 8 हजार कट्ट्यांची आवक होऊन देखील 7600 दर हा सौद्यामध्या मिळाला होता. आता पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे बाजारात सोयाबीनची आवक वाढणार का आणि वाढली तरी दर टिकून राहतील का हे पहावे लागणार आहे. सोयाबीन आगोदर बाजारात दाखल झालेल्या उडीदाचे दर आतापर्यंत स्थिर राहिलेले आहेत. उडीदाला क्विंटला 7300 चा भाव शुक्रवारी मिळाला तर गेल्या दोन आठवड्यापासून 7300 ते 7500 या दरम्यानच उडदाला दर मिळालेला आहे.

पावसाने उडीद डागाळलेला असला तरी चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी पैसे पडत आहेत. हंगामाच्या सुरवातीला पेरणी झालेले सोयाबीन बाजारात दाखल होत आहे. तर उशीरा पेरणी झालेले सोयाबीनची काढणी कामे रखडलेली आहेत. मात्र, आता पावसाने उघडीप घेतली असल्याने सोयाबीनची आवक ही वाढणार आहे. मात्र, दर कायम रहावेत हीच अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

आवकही वाढली आणि सोयाबीनचे दरही वाढले

घसरलेले दर आणि मराठवाड्यात सुरु असलेला पाऊस यामुळे लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक घटली होती. शिवाय दरातही वाढ होत नसल्याने 6 हजारपर्यंतच दर राहतात की काय अशी शंका उपस्थित होत होती. मात्र, शुक्रवारी सोयाबीनची आवक वाढली तेव्हा दर घसरतेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण 7600 दर मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शुक्रवारी लाल तूर- 6480 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6450 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6386 रुपये क्विंटल, जानकी चना 5100 रुपये क्विंटल, विजय चणा 5400, चना मिल 4900, सोयाबीन 7651, चमकी मूग 6500 , मिल मूग 6000 तर उडीदाचा दर 7301 एवढा राहिला होता. soyabean-urad-prices-stable-soyabean-arrivals-increase-in-latur-market

संबंधित बातमी :

महाराष्ट्र – बिहार दरम्यान किसान रेल्वेची सेवा ; शेतकऱ्यांना 50% पर्यंत अनुदान

सामूहिक सातबाऱ्यावरील प्लॅाट विक्रीला बंदी ; मग काय पर्याय आहे, जाणून घ्या

ऊसतोड कामगारांना मिळणार ओळखपत्र, ग्रासेवकामार्फत होणार पूर्तता

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.