Letter War : सोयापेंड आयातीवरुन पुन्हा राजकारण तापले, नेत्यांचाही आयातीला विरोध

सोयाबीनच्या दरात वाढ होत असताना पुन्हा सोयापेंड आयातीचा मुद्दा चर्चेत आला आहे. आता यामध्ये केंद्रीय पशूसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनीच सोयापेंड आयातीबाबत थेट विदेश व्यापार महासंचालक यांनाच पत्र लिहून सोयापेंड आयातीसाठी मुदतवाढीची मागणी केली आहे. त्यामुळे सोयापेंडची आयात होणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते.

Letter War : सोयापेंड आयातीवरुन पुन्हा राजकारण तापले, नेत्यांचाही आयातीला विरोध
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 2:49 PM

मुंबई : सोयाबीनच्या दरात वाढ होत असताना पुन्हा सोयापेंड आयातीचा मुद्दा चर्चेत आला आहे. आता यामध्ये केंद्रीय पशूसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनीच सोयापेंड आयातीबाबत थेट विदेश व्यापार महासंचालक यांनाच पत्र लिहून सोयापेंड आयातीसाठी मुदतवाढीची मागणी केली आहे. त्यामुळे सोयापेंडची आयात होणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्याचा परिणाम थेट सोयाबीनच्या दरावर होऊ लागला आहे. त्याच्या भूमिकेला आता खासदार डॅा. अमोल कोल्हे आणि खासदार प्रतापराव जाधव यांनी विरोध केला असून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना पत्र दिले आहे.

सोयापेंड आणि सोयाबीन काय आहे समीकरण ?

सोयापेंडच्या आयातीवरच सोयाबीनचे दर आहेत. मध्यंतरी ऑगस्टच्या दरम्यान, केंद्र सरकारने 12 लाख सोयापेंडच्या आयातीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सोयाबीनचे दर हे हंगामाच्या सुरवातीला घसरले होते. तर काळ्याच्या ओघात सोयापेंड कमी होताच सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचे चित्र सबंध देशात निर्माण झाले होते. आता सोयाबीनचे दर वाढताच पुन्हा सोयापेंड आयातीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. यावेळी मात्र, केंद्रीय पशूसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनीच सोयापेंड आयातीचे महत्व पटवून सांगितले आहे. त्यामुळे भविष्यात सोयापेंडची आयात झाली तर सोयाबीनच्या दरावर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्र्याच्या या भूमिकेला आता राज्यातील खासदार यांच्याकडूनही विरोध होऊ लागला आहे.

सोयापेंडच्या आयातीबाबत राज्यसरकारची भूमिका

सोयाबीनचे दर स्थिर ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर सोयाबीनचा उठाव होणे गरजेचे आहे. यातच सोयापेंडची आयात झाली तर मात्र, त्याचा परिणाम हा सोयाबीनच्या दरावर होणार आहे. त्यामुळेच मध्यंतरी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलन उभारले होते. दरम्यान, राज्य सरकार हे सोयापेंडच्या आयातीला परवानगी देणार नसल्याची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली होती. आता केंद्रीय पशूसंवर्धन मंत्र्यांनीच सोयापेंडच्या आयातीसंदर्भात विदेश व्यापार महासंचालक यांनाच पत्र लिहल्याने राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्याला विरोध दर्शवत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषिमंत्री तोमर यांना सोयापेंडची आयात करु नये अशी मागणी केली आहे.

सोयाबीनचे वाढलेले दर स्थिरावले

दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात कमालीची वाढ झाली होती. 4 हजार 500 वरील सोयाबीन थेट 6 हजार 600 वर येऊन ठेपले होते. पण सोयापेंडच्या आयातीचा मुद्दा समोर येताच दरात घसरण पाहायला मिळाली आहे. कारण 31 मार्च 2022 पर्यंत सोयापेंड आयातीची मुदत वाढवावी आणि उर्वरीत 5 लाख 50 हजार टन सोयापेंडची आयात करण्याची मागणी पोल्ट्री फार्म धारकांनी केली होती. त्यामुळेच सध्या 6 हजारावर सोयाबीनचे दर स्थिरावले आहेत.

संबंधित बातम्या :

ह्रदय पिळवटून टाकणारं चित्रं, महाराष्ट्रातला गारठा मुक्या प्राण्यांच्या जीवावर, कोकरांच्याही शेवटच्या घटका

पश्चिम महाराष्ट्रात अवकाळीमुळे रब्बी पिकांसह फळबागाही उध्वस्त, नुकसानभरपाईच्या मागणीचा जोर

सहा महिने साठवूनही उन्हाळी कांद्याच्या दरात घसरणच, काय आहेत कारणे?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.