खरिपातील सोयाबीनचा असा झाला उपयोग, शेतकऱ्यांना मिळाले नाही उत्पन्न पण मार्गी लागला जनावरांच्या..
खरिपातील असे एक पीक आहे ज्याच्या उत्पादनातून फायदा झाला नाही पण आता चारा म्हणून होत आहे. होय, खरिपातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनच्या बुस्कटाचा वापर आता चारा म्हणून वाढत आहे. सोयाबीनची मळणी केल्यानंतर जे बुस्कट मशिनद्वारे बाहेर फकले जाते त्याचाच आधार शेतकरी चारा म्हणून करीत आहेत.
लातूर : खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे केवळ पिकांचेच नुकसना झाले असे नाही तर चारा पीकही पाण्यातच होते. त्यामुळे भर हिवाळ्यात आता (Cattle feed) वैरणीचा टंचाई निर्माण झाली आहे. पण (Kharif Season) खरिपातील असे एक पीक आहे ज्याच्या उत्पादनातून फायदा झाला नाही पण आता चारा म्हणून होत आहे. होय, खरिपातील मुख्य पीक असलेल्या (Soybean crop) सोयाबीनच्या बुस्कटाचा वापर आता चारा म्हणून वाढत आहे. सोयाबीनची मळणी केल्यानंतर जे बुस्कट मशिनद्वारे बाहेर फकले जाते त्याचाच आधार शेतकरी चारा म्हणून करीत आहेत. सोयाबीनमधून भरीव उत्पन्न मिळाले नसले तरी चारा म्हणून का होईना त्याचा वापर होऊ लागला आहे.
40 रुपयांना बुस्कटाचा कट्टा
सोयाबीनची मळणी होत असताना जे बुस्कट बाहेर पडते त्यावर जनावरांची गुजरान होत असते. मात्र, यंदा खरीप हंगामापासून अवकाळी आणि अतिवृष्टीचे संकट कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे बुस्कटाची साठवणूक केली होती. आता ऐन गरजेच्या प्रसंगी हे बुस्कटच जनावरांना चारा म्हणून वापरले जात आहे. सध्या सोयाबीन बुस्कटाच्या 1 कट्ट्यासाठी 40 रुपये मोजावे लागत आहेत. दरही नियंत्रणात असल्यामुळे ज्या शेतकऱ्याकडे अधिकची दुभती जनावरे आहेत त्यांच्यासाठी या बुस्कटाची देखील खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. पावसात न भिजलेले बुस्कट जनावरेही मोठ्या चवीने खातात शिवाय यामुळे दूध उत्पादनातही वाढ होते.
रब्बीतील चारा पिकेही धोक्यात
जनावरांसाठी चारा म्हणून ज्वारीचा पेरा केला जातो. मात्र, यंदा शेतकऱ्यांनी नगदी पिकांवरच भर दिला आहे. रब्बी हंगामातील सर्वात मुख्य पीक असलेल्या ज्वारीचा सर्वात कमी पेरा मराठवाड्यात झाला आहे. शिवाय अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ज्वारीची पडझड झाली आहे. आता पावसळ्याशिवाय चाराच उपलब्ध होणार नाही म्हणून शेतकरी सोयाबीनचे बुस्कट घेऊन त्याची साठणूक करीत आहेत.
बुस्कटापासून कंपोस्ट खत निर्मिती
काही दिवसांपूर्वीच सोयाबीन मळणीची कामे पार पडलेली आहेत. त्यामुळे शेतशिवारात आजही बुस्कटाचे ढिगारे पाहवयास मिळतात. आता हे ढिगारे एक तर चारा म्हणून जनावरांच्या दावणीला जाणार किंवा मशरूम उगवण्यासाठी तर काही ठिकाणी भट्टीमध्ये जाळण्यासाठी सोयाबीन कुटार वापरात आणले जाते. याकरिता एका ट्रॅक्टरला तीनशे ते पाचशे रुपये मिळतात तर काही शेतकरी हा कुटार पेटवून देतात. ज्यामुळे संपर्कात आलेली जमीन निर्जीव होते.
संबंधित बातम्या :
कापूस दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना का व्यापाऱ्यांना? साठवणूक केली मात्र विक्रीचे टायमिंग चुकले..!
Orange fruit: नागपूरी संत्रीची फळगळ रोखण्यासाठी कृषी विभागाचा काय आहे ‘मेगा प्लॅन’, वाचा सविस्तर
Grape : द्राक्ष बागांमध्येच कशामुळे पेटत आहेत शेकोट्या ? लागवडीपासून तोडणीपर्यंत जीवघेणी कसरत