आता शेतकऱ्यांची चिंता वाढली, सर्वकाही पोषक असतानाही सोयाबीनचे दर…

सध्या बाजारपेठेतले चित्र हे शेतकऱ्यांची चिंता वाढवणारे आहे, कारण, सोयापेंड आयातीला पूर्णविराम देण्यात आला आहे. एवढेच नाही तर आता प्रक्रिया उद्योजक आणि व्यापाऱ्यांवरील साठा मर्यादेची अटही शिथिल करण्यात आली आहे. असे असतानाही सोयाबीनचे दर हे घसरतच आहेत. गेल्या तीन दिवसांपासून 6 हजार 200 स्थिर असलेले दर गुरुवारी मात्र, अणखीन 200 रुपायांनी घसरले आहेत.

आता शेतकऱ्यांची चिंता वाढली, सर्वकाही पोषक असतानाही सोयाबीनचे दर...
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमालाची आवक वाढली आहे.
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 3:33 PM

लातूर : आतापर्यंत शेतकऱ्यांच्या मनात आले तरच (arrivals increase) सोयाबीनची आवक होत होती. कारण भविष्यात (Soybean rates) सोयाबीनचे दर वाढणार हा विश्वास शेतकऱ्यांना होता. त्यानुसार दिवाळीनंतर झाले ही तसेच. सोयाबीनच्या दरात 2 हजार रुपयांनी वाढही झाली. मात्र, (farmers) शेतकऱ्यांच्याही अपेक्षा ह्या वाढत गेल्या. पण सध्या बाजारपेठेतले चित्र हे शेतकऱ्यांची चिंता वाढवणारे आहे, कारण, सोयापेंड आयातीला पूर्णविराम देण्यात आला आहे. एवढेच नाही तर आता प्रक्रिया उद्योजक आणि व्यापाऱ्यांवरील साठा मर्यादेची अटही शिथिल करण्यात आली आहे. असे असतानाही सोयाबीनचे दर हे घसरतच आहेत. गेल्या तीन दिवसांपासून 6 हजार 200 स्थिर असलेले दर गुरुवारी मात्र, अणखीन 200 रुपायांनी घसरले आहेत. त्यामुळे भविष्यात सोयाबीनचे काय होणार हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

काय असणार सोयाबीनचे भवितव्य ?

आतापर्यंत शेतकऱ्यांना आत्मविश्वास होता की, सोयाबीनच्या दरात ही वाढ होणार मात्र, आता सोयापेंड आयातीला स्थगिती देऊनही त्याचा परिणाम दरावर झालेला नाही. उलट सोयाबीनचे दर हे दिवसेंदिवस घटत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6 हजार 200 वर सोयाबीन हे स्थिरावले होते पण गुरुवारी 200 रुपयांची घसरण झाली आहे. सोयापेंड आयातीच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर दरात वाढ होईल असे चित्र होते. पण वाढ तर सोडाच आता दर हे स्थिरही राहत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता ही वाढलेली आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये 600 रुपयांची घसरण झाली आहे. सध्याचा दर भविष्यातही राहतो की नाही त्यामुळे आता शेतकरी सोयाबीन विक्रीवर भर देत आहेत.

उन्हाळी हंगामातील वाढते क्षेत्र अन् घटलेली मागणी

यंदा उन्हाळी हंगामातही सोयाबीनचे उत्पादन घेतले जात आहे. आतापर्यंत केवळ बिजोत्पादनाचा प्रयोग उन्हाळी हंगामात केला जात होता. यंदा मात्र, पाण्याची उपलब्धता आणि रब्बी हंगामातील लांबलेल्या पेरण्या यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनवर भर दिलेला आहे. शिवाय मध्यंतरी दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादनाची अपेक्षा आहे. यंदा कधी नव्हे तेच उन्हाळी हंगामातील पेरा हा वाढलेला आहे. त्यामुळे उन्हाळी सोयाबीनची बाजारात आवक सुरु झाली तर मात्र, सोयाबीनचे दर अणखीन घसरणार याची धास्ती शेतकऱ्यांना आहेच. आता सोयाबीनची आवक वाढली असतानाही मागणी घटली आहे. मध्यंतरी शेतकरी हे साठवणूकीवर भर देत होते. पण आता घटत्या दरामुळे सोयाबीनचे भवितव्य काय राहणार यामुळे विक्रीवर भर दिला जात आहे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. बुधवारी लाल तूर- 6170 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6126 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6100 रुपये क्विंटल, जानकी चना 4928 रुपये क्विंटल, विजय चणा 4900, चना मिल 4800, सोयाबीन 7400, चमकी मूग 7200, मिल मूग 6150 तर उडीदाचा दर 7503 एवढा राहिला होता.

संबंधित बातम्या :

दुग्धोत्पादन वाढीसाठी देशी गायींवर कृत्रिम गर्भधारणा, राज्यात संकरीत गायींची संख्या वाढली

पोषक वातावरण असतानाही ऊस लागवड रखडली, काय आहेत कारणे?

तुम्हाला मिळाले का पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाचे निमंत्रण..?

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.