सोयाबीन दरवाढीच्या आशेचा आता एकच किरण, शेतकऱ्यांनी पुन्हा घेतला साठवणूकीचा निर्णय
या हंगामात सातत्याने सोयाबीनच्या दरात चढ-उतार हे झाले आहेत. पण शेतकऱ्यांनी घेतलेल्या सावध भूमिकेमुळे नुकसान टळले आहे. सध्या सोयाबीन सरासरी 6 हजारावर येऊन ठेपले आहे. आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना केवळ खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली तरच दर वधारतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
लातूर : जानेवारी महिन्याच्या सुरवातीला हळुहळु का होईना सोयाबीनच्या दरात वाढ होत होती. त्याचा परिणाम आवकवरही झाला होता. शेतकऱ्यांनी साठवणूकीतील सोयाबीन विक्रीसाठी काढले होते. शिवाय गेल्या तीन आठवड्यापासून 6 हजार 400 पर्यंत दरही स्थिरावले होते. मात्र, आता पुन्हा दरात घसरण सुरु झाली आहे. त्यामुळे (Sale of soybean) सोयाबीनची विक्री की साठवणूक हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. या हंगामात सातत्याने सोयाबीनच्या दरात चढ-उतार हे झाले आहेत. पण शेतकऱ्यांनी घेतलेल्या सावध भूमिकेमुळे नुकसान टळले आहे. सध्या सोयाबीन सरासरी 6 हजारावर येऊन ठेपले आहे. आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना केवळ (Edible Oil) खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली तरच दर वधारतील असा अंदाज (Trader) व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या आठवड्याभरात रिफाईंड सोयाबीन तेलाचे दर सुधारले आहेत. खाद्यतेलाच्या दरात अशीच तेजी राहिली तर सोयाबीनलाही आधार मिळेल असा आशावाद व्यापारी व्यक्त करीत आहेत.
सोयाबीन तेलाच्या मागणीत वाढ
सध्या खाद्यतेलाचे दर हे तेजीत आहेत. त्यामुळे सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात वाढली आहे. तर दुसरीकडे देशांतर्गत पामतेलाचा तुटवडा भासत आहे. या अशा प्रतिकूल परस्थितीमध्येच सोयाबीन तेलाचा उठाव होत आहे. याचाच परिणाम सोयाबीन दरावर होणार असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे. गतआठवड्याच्या तुलनेत सोयाबीनची आवक ही घटलेली आहे. कारण सोयाबीनच्या दरात 200 रुपायांची घसरण झाल्याने पुन्हा शेतकरी हे साठवणूकीवरच भर देणार आहेत.
प्लांटधारकांकडूनही वाढणार मागणी
आतापर्यंत सोयाबीनच्या आवकवरच दर हे अवलंबून राहिलेले होते. अधिकचा दर असतानाही शेतकऱ्यांनी आवक ही प्रमाणातच ठेवल्याने त्याचा अधिकचा फायदा शेतकऱ्यांना झाला होता. सध्या पुन्हा दरात घसरण झाली असली तरी रिफाईंड सोयाबीन तेलाच्या मागणीत वाढ झाल्याचा परिणाम सोयाबीनच्या दरावर होणार आहे. शिवाय प्लांटधारकांकडूनही सोयाबीनची मागणी होत आहे. त्यामुळे सध्याच्या प्रतिकूल परस्थितीमध्ये सोयाबीन तेलाच्या वाढत्या दराचा आधार सोयाबीनला मिळतो का हेच पहावे लागणार आहे.
संबंधित बातम्या :
निसर्गाचा लहरीपणा त्यात महावितरणची अवकृपा, सांगा शेती करायची कशी ?
…म्हणून जानेवारी महिन्यातच खोदल्या जातात अधिकतर विहीरी, काय आहेत कारणे? वाचा सविस्तर