शेतकऱ्यांनाही बाजारपेठेचं ‘गणित’ कळलं, सोयाबीनच्या दरात होतेय सुधारणा
शेतकऱ्यांनी एक गोष्ट केली तीच सध्या फायद्याची ठरत आहे. सोयाबीनचे दर घसरले की त्याची विक्रीच बंद केली होती. परिणामी आता कडधान्य साठवणुकीवरील बंदीचा मर्यादाकाळ हा संपलेला आहे. तर आवकही कमी होत असल्याने सोयाबीनचे दर हे 5100 ते 5300 रुपयांपर्यंत स्थिरावले असल्याचे चित्र आहे.
लातूर : सोयाबीनचा हंगाम सुरु झाल्यापासून आतापर्यंत (Soybean rate) दरात कायम उतार राहिलेला आहे. हंगामाच्या सुरवातीला केवळ मुहूर्ताच्या सोयाबीनला चांगला दर मिळाला होता. त्यानंतर मात्र, सुरु झालेली घसरण ही आतापर्यंत कायम होती. (soybean rate stable) पण गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीनचे दर हे स्थिर आहेत. आणि हीच बाब (Farmer) शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. कारण दरात वाढ झाली नाही तरी चालेल पण कमी तरी होऊ नये ही अपेक्षा शेतकरी बाळगत होते. या दरम्यान, शेतकऱ्यांनी एक गोष्ट केली तीच सध्या फायद्याची ठरत आहे. सोयाबीनचे दर घसरले की त्याची विक्रीच बंद केली होती. परिणामी आता कडधान्य साठवणुकीवरील बंदीचा मर्यादाकाळ हा संपलेला आहे. तर आवकही कमी होत असल्याने सोयाबीनचे दर हे 5100 ते 5300 रुपयांपर्यंत स्थिरावले असल्याचे चित्र आहे.
खरिपातील सोयाबीन हे मुख्य पीक असले तरी सुरवातीला पावसामुळे नुकसान झाले होते तर आता योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसलेला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून चित्र हे बदललेले आहे. सोयाबीनच्या दरात नियमित वाढ होत नसली तरी घट होत नाही ही जमेची बाजू आहे. त्यामुळे आता सोयाबीन उत्पादनातून चार पैसे मिळतील अशी आशा निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांनी दिला होता साठवणूकीवर भर
10 दिवसांपूर्वी सोयाबीनच्या दरात दिवसागणिस कमालीची घसरण होत होती. हंगामाच्या सुरवातीला 11 हजार 500 रुपयांवर गेलेले सोयाबीन थेट 4 हजार 600 वर आले होते. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र, अशा परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या साठवणूकीवर भर दिला तर ज्या पीकाला अधिकचा दर आहे असा उडीद बाजारात आणला. आता सोयाबीनची आवक कमी झाली असून मागणीत काहीशी वाढ झाली आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर हे सध्या तरी स्थिर आहेत.
प्रक्रिया प्लॅाट्स आणि स्टॅाकिस्ट यांचाही परिणाम
खाद्य तेलाचे दर नियंत्रणात असावेत म्हणून केद्र सरकारने कडधान्य साठवणूकीवर निर्बंध आणले होते. त्यामुळे सोयाबीनच्या खरेदीवर या निर्णायाचा परिणाम झाला होता. साठा मर्यादेची मुदत आता संपलेली आहे. त्यामुळे साठा करणारे व्यापारी आणि प्रक्रिया करणारे उद्योजक सोयाबीन खरेदीत उतरले आहेत. त्यामुळेही सोयाबीनच्या दरात सुधारणा पाहवयास मिळत आहे. आता दिवाळीनंतर सोयाबीनची आवक वाढली तरी दर टिकून राहतील असा अंदाज वर्तवला जात आहे.
सध्या सोयाबीनचे काय आहेत दर
बाजारपेठेनुसार सोयाबीनच्या दरात कमी-अधिक प्रमाणात फरक हा जाणवून येत असतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनला 5100 ते 5300 चा दर मिळत आहे. मध्यंतरी सोयाबीनचे दर हे 4600 पर्यंत कमी झाले होते. मात्र, आवक कमी आणि प्रक्रिया करणारे प्लॅांट्स सुरु झाल्याने दरात सुधारणा झालेली आहे. त्यामुळे भविष्यात आहे तेच दर कायम राहिले तरी सोयाबीनची आवक वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
संबंधित बातम्या :
रब्बीची पेरणी लांबणीवर ; शेतकऱ्यांनो अशी काळजी अन्यथा उत्पादनात होणार घट
एक विमा कंपनी अन् 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धरले वेठीस, कृषी विभागाची थेट केंद्राकडे तक्रार