सोयाबीनला विक्रमी झळाळी, क्विंटलचा दर 9 हजारांच्या पार, उच्चांकी दराचा फायदा नेमका कुणाला?

सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजार सातशे दर मिळत आहे. या वाढीव दराचा फायदा काय? अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटत आहेत.

सोयाबीनला विक्रमी झळाळी, क्विंटलचा दर 9 हजारांच्या पार, उच्चांकी दराचा फायदा नेमका कुणाला?
सोयाबीन दरवाढ
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 11:22 PM

वाशिम: जवळपास 95 टक्के शेतकऱ्यांच्या घरातील सोयाबीन संपले आहे. बाजार समित्यांमधील आवकही घटली आहे. अशा परिस्थितीत आता सोयाबीनला झळाळी मिळत असून, सोमवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजार सातशे दर मिळत आहे. या वाढीव दराचा फायदा काय? अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटत आहेत.

शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपल्यावर दरवाढ

शेतकऱ्यांना दरवर्षीच विविध संकटातून जावे लागते. शेतमाल घरी आल्यानंतर विविध आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी शेतमाल विक्री करावा लागतो. अल्प भूधारक शेतकरी तर शेतमाल तयार झाला की बाजार समितीत विक्रीसाठी आणतो. मध्यम व श्रीमंत वर्गातील काही शेतकरी भाववाढ होईल या अपेक्षेने पाच ते सहा महिने सोयाबीनची विक्री थांबवू शकतात ऐन हंगामात सोयाबीनला 2600 ते 3600 या दरम्यान प्रती क्विंटल दर असतात. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी बहुतांश शेतकऱ्याच्या अल्पदरात सोयाबीनची विक्री करण्याशिवाय दुसरा पर्यायही नसतो. सोयाबीनचा हंगाम संपल्यानंतर 7 ते 8 महिन्याने बाजारभाव वाढतात, याचा अनुभव दरवर्षीच शेतकऱ्याना येतो.

सोयाबीनच्या ऐन हंगामात बाजारभाव गडगडतात, याचा अनुभव दरवर्षीच शेतकऱ्यांना येतो. दर वाढले असले तरी सध्या बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन नाही. त्यामुळे या वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच अधिक होत आहे.

दरवाढ कायम राहावी

वाशिम जिल्ह्यात खरिपात एकूण क्षेत्रापैकी 80 टक्के सोयाबीन ची शेती केली जाते. मात्र सोयाबीन ला पाहिजे तसा दर मिळत नव्हता यंदा मात्र सोयाबीन ला उच्चांकी दर मिळत असून, नऊ हजार 700 रुपये दर मिळत आहे.पश्चिम विदर्भातील सोयाबीन ची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन दिवसापासून चांगले दर मिळत आहेत.शासकीय आधारभूत किंमत 3 हजार 880 रुपये असताना प्रत्यक्षात मात्र दर नऊ हजार पार गेले आहेत.हेच दर कायम राहिल्यास सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील.

जिल्ह्यात सोयाबीनचा हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो. मात्र त्यावेळी सोयाबीन ला 3 हजार 500 ते 4 हजार पर्यंत दर होता.आता सोयाबीन ला इतिहासात पहिल्यादांचं 9 हजार पार दर मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहे.मात्र हे दर 2021 चा हंगामात ही कायम राहावे अशी अशा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

इतर बातम्या:

बुलडाण्यात सोयाबीनला 9675 रुपये भाव, हमीभावाच्या दुप्पटीपेक्षा जास्त भाव, खामगाव बाजार समितीत उच्चांकी दर

लातूरमध्ये सोयाबीनला उच्चांकी भाव, क्विंटलला 9600 रुपयांचा दर, दरवाढीचा फायदा नेमका कुणाला?

Soybean rates hike in washim apmc price reach to nine thousand and above

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.