साखर कारखान्यांच्या कारभारात ‘गोडवा’ वाढवणारा राज्य बॅंकेचा निर्णय, कारभारात तत्परता अन् शेतकऱ्यांचेही हीत, वाचा सविस्तर

राज्यातील साखर कारखान्यांच्या कारभाराबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जातात. असे असले तरी दुसऱ्या बाजूचा विचार करीत राज्य बॅंकेने असा एक निर्णय घेतला आहे ज्यामुळे काही साखर कारखान्यांना दिलासा तर मिळणारच आहे पण शेतकऱ्यांचेही हीत जोपासले जाणार आहे. साखर कारखान्यांच्या माल तारण कर्जावरील मार्जिन 15 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य बँकेने घेतला आहे.

साखर कारखान्यांच्या कारभारात 'गोडवा' वाढवणारा राज्य बॅंकेचा निर्णय, कारभारात तत्परता अन् शेतकऱ्यांचेही हीत, वाचा सविस्तर
यंदा ऊसाचे गाळप विक्रमी झाले असून सर्वाधिक साखरेचे उत्पादनही महाराष्ट्रातून होत आहे.
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 12:36 PM

पुणे : राज्यातील (Sugar factories) साखर कारखान्यांच्या कारभाराबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जातात. असे असले तरी दुसऱ्या बाजूचा विचार करीत (State Bank) राज्य बॅंकेने असा एक निर्णय घेतला आहे ज्यामुळे काही साखर कारखान्यांना दिलासा तर मिळणारच आहे पण शेतकऱ्यांचेही हीत जोपासले जाणार आहे. साखर कारखान्यांच्या माल तारण कर्जावरील मार्जिन 15 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य बँकेने घेतला आहे. त्यामुळे 5 टक्केची रक्कम साखर कारखान्यांना ही एफआरपी किंवा इतर बाबींसाठी वापरता येणार आहे. वाढते (sugarcane sludge) गाळप आणि यामुळे पेमेंट अदा करताना कारखान्यांना उद्भवणाऱ्या समस्यांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य बॅंकेच्या निर्णयाचा काय होणार फायदा?

राज्य बॅंकेने एकूण कर्जपुरवठ्यापैकी 40 टक्के कर्ज हे केवळ साखर कारखान्यांना वितरीत केले आहे. चालू हंगामातील उत्पादनाचा विचार केला तर यंदा उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पेमेंट करताना साखर कारखान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ज्या कारखान्यांची एफआरपी ही 3 हजारापेक्षा अधिक आहे त्यांना पेमेंट करण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे कारखान्यांची अडचण सोडवण्याच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य बॅंकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी पत्राद्वारे सांगितले आहे. त्यामुले कारखानदारांना तर दिलासा मिळणारच आहे पण शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळण्यासही मदत होणार आहे.

या काखानदारांनाच होणार लाभ

राज्य बॅंकेकडून अधिकतर कर्ज हे कारखान्यांनीच घेतलेले आहे. ज्या साखर कारखान्यांचा सरासरी उतारा हा 10 टक्केपेक्षा अधिक आहे. शिवाय जे साखर कारखाने हे सुरवातीपासून कर्जाची नियमित परतफेड करीत आहेत त्यांना प्राधान्य दिले जात आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुनच राज्य बॅंकेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांकडील वसुलीही होणार आहे शिवाय शेतकऱ्यांना याचा अप्रत्यक्ष फायदाच होणार आहे.

कसा राहतो उत्पादित साठ्यावर दर?

कर्जाच्या बदल्यात राज्य बॅंक ही साखर कारखान्याच्या उत्पादित मालावर 15 टक्के मार्जिन लादत असते. त्यामुळे कारखान्याचे नुकसान नाही पण अधिकचे पैसे गुंतवूण राहतात. यातच यंदा साखर उत्पादनात वाढ झालेली आहे. त्यामुळे कारखान्यांना दिलासा मिळेल अन् त्याचा फायदा शेतकऱ्यांनाही होईल या दृष्टीकोनातून 15 टक्के वरील मार्जिन थेट 10 टक्यांवर केले आहे. यासंबंधीची माहिती बॅंकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

अतिरिक्त ऊसाच्या प्रश्नावर ‘एक घाव दोन तुकडे’, सहसंचालकांच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमबजावणी गरजेची

15 दिवसांपासून सोयाबीनचे दर स्थिर, काय आहेत कारणे? शेतकऱ्यांची भूमिका निर्णायक

Grape Rate : दर निश्चित होऊनही द्राक्ष उत्पादकांची कोंडी, काय आहेत निर्यातदारांच्या मागण्या?

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.