Kokan Farmer : आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा ‘वाली’ कोण? ना नुकसानीचे पंचनामे ना कोणती मदत?
यंदा तर हंगामाच्या सुरवातीपासूनच आंबा फळबागांवर निसर्गाची अवकृपा राहिलेली आहे. महिन्यातून एकदा ठरलेला अवकाळी आणि ढगाळ वातावरण यामुळे न भरुन निघणारे नुकसान होत आहे. गेल्या चार वर्षांपासून कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांची हीच अवस्था असून मदतीबाबत कोणतीही भूमिका राज्य सरकारने घेतलेली नाही. विदर्भ, मराठवाड्यात जे खरिपात नुकासान झाले त्यापेक्षा अधिकचे नुकसान कोकणातील शेतकऱ्यांचे झाले आहे. यंदा तर केवळ 25 टक्केच आंबा पदरी पडला आहे. यातही दर्जा ढासळल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर नाही.
मुंबई : यंदा तर हंगामाच्या सुरवातीपासूनच (Mango Orchard) आंबा फळबागांवर निसर्गाची अवकृपा राहिलेली आहे. महिन्यातून एकदा ठरलेला (Unseasonal Rain) अवकाळी आणि ढगाळ वातावरण यामुळे न भरुन निघणारे नुकसान होत आहे. गेल्या चार वर्षांपासून कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांची हीच अवस्था असून मदतीबाबत कोणतीही भूमिका (State Government) राज्य सरकारने घेतलेली नाही. विदर्भ, मराठवाड्यात जे खरिपात नुकासान झाले त्यापेक्षा अधिकचे नुकसान कोकणातील शेतकऱ्यांचे झाले आहे. यंदा तर केवळ 25 टक्केच आंबा पदरी पडला आहे. यातही दर्जा ढासळल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर नाही. आंबा उत्पादकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना आर्थिक मदत देऊन यापूर्वीची कर्जमाफी करण्याची मागणी ठाण्याचे आ. संजय केळकर यांनी केली आहे. विधान परिषदेमध्ये आंबा बागायत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना देखील आंबा पिकाचे नुकसान सुरुच होते. यंदा वातावरणातील बदलाचा सर्वाधिक फटका आंबा उत्पादकांना बसलेला आहे.
चार वर्षापासून संकटाची मालिका
यंदाच नाही तर गेल्या चार वर्षापासून आंबा उत्पादकांवर नैसर्गिक संकट ओढावलेले आहे. अवेळी झालेला पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे यंदा तर 25 टक्केच उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले आहे. शिवाय आंब्याचा दर्जाही ढासाळलेला आहे. हे कमी म्हणून की काय गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने फळगळतीचा धोका कायम आहे. ऊन-पावसाच्या खेळात आंबा पिकाचे न भरुन निघणारे नुकसान झाले असून अद्यापपर्यंत नुकासनीचे पंचनामे देखील झालेले नाहीत. त्यामुळे त्वरीत पंचनामे करुन नुकसानभरपाई देण्याची मागणी आ. केळकर यांनी केली आहे. त्यामुळे निसर्गाने हिसकावलेले उत्पन्न मदतीच्या स्वरुपात मिळणार का हे पहावे लागणार आहे.
गतवर्षीच्या नुकसानभरपाईची शेतकऱ्यांना प्रतिक्षा
यंदा तर सर्वाधिक नुकसान आंबा बागांचे होऊन देखील कोणतीही भूमिका प्रशासनाने घेतलेली नाही. अद्यापही पंचनामे झालेले नाहीत. एकंदरीत कोकणातील आंबा उत्पादकांच्या अर्थकारणावर परिणाम झालेला असतानाही राज्य सरकार ठोस भूमिका घेत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत आहे. यंदाचे सोडा गतवर्षी झालेल्या नुकसानीचे पैसे अद्यापही कोकणातील फळबागायत शेतकऱ्यांना मिळालेले नाही.
यंदाही ऊन-पावसाचा खेळ सुरुच
आंबा उत्पादकांवर यंदा चोहीबाजूने संकट ओढावले आहे. आतापर्यंत अवकाळी पावसाचा धोका होता. तर चार दिवसांपूर्वी वाढत्या ऊन्हामुळे फळगळती झाली होती. ऊन्हामुळे आंबा होरपळून गळला तर गळलेला आंबा भाजल्यामुळे नुकसान झाले होते. आता हे कमी म्हणून की काय आगामी चार दिवस पुन्हा अवकाळीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्यामुळे सर्वकाही नुकसानीचेच ठरत आहे.
संबंधित बातम्या :
Sugarcane Sludge : अतिरिक्त ऊसाचा भार 35 साखर कारखान्यांवर, ऊसतोडीसाठी कायपण?
Bhandara : ‘रोहयो’ चा उद्देश साध्य, भंडाऱ्यातील 85 हजार मजुरांच्या हाताला मिळाले काम