Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Success Story : सीएची नोकरी सोडून मधाच्या व्यवसाय, 6 महिन्यात उभारली 30 लाखाची कंपनी

मारली नोकरीला लाथ आणि सुरु केला मधाचा व्यवसाय. निर्णय योग्य ठरला आणि अवघ्या 6 महिन्यात या पठ्ठ्यानं 30 लाखाचा टर्नओव्हर करणारी कंपनी उभी केली.

Success Story : सीएची नोकरी सोडून मधाच्या व्यवसाय, 6 महिन्यात उभारली 30 लाखाची कंपनी
Follow us
| Updated on: Feb 07, 2021 | 12:06 AM

मुंबई : चार्टर्ड अकाऊंटंट अर्थात CA सारखी भरभक्कम पगाराची नोकरी सोडून एक पठ्ठ्यानं स्वत:चा व्यवसाय करण्याचा निश्चय केला. मग काय मारली नोकरीला लाथ आणि सुरु केला मधाचा व्यवसाय. निर्णय योग्य ठरला आणि अवघ्या 6 महिन्यात या पठ्ठ्यानं 30 लाखाचा टर्नओव्हर करणारी कंपनी उभी केली. ही कंपनी सुरु करणारे आहेत प्रतिक घोडा. मुळचे अहमदाबादचे असणाऱ्या प्रतिक घोडा यांनी CA सारखी नोकरी सोडून मधाचा व्यवसाय यशस्वी करुन दाखवला आहे.(Making millions from honey business by quitting CA job)

मध व्यवसायाची कल्पना कुठून आली?

प्रतिक घोडा यांनी 2006 मध्ये CAचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर कॅडिला, टोरेंट, मोटिफ इंडिया इन्फोटेक अशा मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांनी नोकरी केली. पण त्याचं मन काही या नोकरीमध्ये रमत नव्हतं. शेवटी 2020 मध्ये त्यांनी मधाचा व्यवसाय सुरु केला. मात्र या व्यवसायाची कल्पना त्यांना कशी सुचली? तर आपल्या रिसर्चसाठी ते एका वैद्यांकडे गेले होते. त्यावेळी त्या वैद्यांकडे अनेक रुग्ण आले होते. त्या रुग्णांच्या शरिराचे विविध भाग दुखत होते. तेव्हा त्या वैद्याने एक बॉक्स मागवला आणि त्यातून एक मधमाशी बाहेर काढली. लोकांना जो भाग दुखत होता, तिथे मधमाशीचा चावा दिला आणि त्या रुग्णांना काही वेळेतच आराम पडण्यास सुरुवात झाली. यासंबंधी वैद्याशी चर्चा केली असता मध आणि मधमाशी पालन व्यवसायासंबंधी अनेक फायदे लक्षात आले. त्यातूनच या व्यवसायाची कल्पना सुचल्याच प्रतिक यांनी सांगितलं.

प्रतिक यांनी शेतकऱ्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या. अनेक तज्ज्ञांशी चर्चा केली. मोठ्या रिसर्चनंतर त्यांनी जामनगर जवळच्या आमरण गावात मधमाशी पालन सुरु केलं. त्यानंतर 15 ऑगस्ट 2020 रोजी त्यांनी BEE BASE PVT LTD नावाने एक कंपनी सुरु करुन तिचं रजिस्ट्रेशन केलं.

15 लाखाची गुंतवणूक

सुरुवातीला प्रतिक यांना मधमाशी पालनाच्या 300 पेट्यांसाठी 15 लाख रुपये लागले. या 300 पेट्यांमधून दर 15 दिवसाला 750 किलो मध मिळण्यास सुरुवात झाली. गेल्या 6 महिन्यात 3 टन मधाचं उत्पादन झालं आहे. सर्वसाधारणपणे एका पेटीतून अडीच किलो मध मिळतो.

मार्केटिंगचं गणित आणि कर्मचारी

सोशल मीडियावर कंपनीचं एक पेज तयार करण्यात आलं. त्यावर कंपनीच्या उत्पादनांची माहिती देण्यात आली. या माध्यमातून लोकांना माहिती मिळत गेली आणि त्यांनी कंपनीशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. आतापर्यंत कुठल्याही रिटेल चैन किंवा डिस्ट्रिब्यूशन कंपनीची मदत घेतली नसल्याचं प्रतिक यांनी सांगितलं. असं असतानाही दर 15 दिवसाला 750 किलो मधाची विक्री करत असल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यातून दर 15 दिवसाला 6 लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं.

प्रतिक यांच्या मधमाशी पालन केंद्र आणि कार्यालयात एकूण 20 लोक काम करतात. महत्वाची बाब म्हणजे त्यातील 10 महिला या घरोघरी जाऊन मध पोहोचवण्याचं काम करतात. या माध्यमातून महिला सशक्तीकरणासाठी प्रयत्न करत असल्याचंही प्रतिक यांनी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या :

वयाच्या 11 वर्षांपासून दूग्ध व्यवसायात उडी, महिन्याला 6 लाख रुपये कमावणाऱ्या श्रद्धाची थक्क करणारी यशोगाथा

वावरातून फेसबुक-व्हॉट्सअ‌ॅप, सीताफळाची थेट ऑर्डर, नांदेडच्या शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग

Making millions from honey business by quitting CA job

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.