पोषक वातावरण असतानाही ऊस लागवड रखडली, काय आहेत कारणे?
ऊस लागवड तर लांबच पण सततच्या पावसामुळे वेळेवर रब्बीचा देखील पेरा झाला नाही. अजूनही काही भागात वाफसा नसल्याने पेरण्या आणि ऊसाची लागवड ही रखडलेली आहे. ऊस हे सर्वात मोठे नगदी पिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल हा वाढत आहे. त्यामुळे केवळ पश्चिम महाराष्ट्रातच नाही तर आता मराठवाड्यातही ऊसाचे क्षेत्र वाढताना पाहवयास मिळत आहे.
पुणे : यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. त्यामुळे (Rabbi Season) रब्बी हंगामातील पिके बाजूला सारुन शेतकरी हे ऊस लागवडीवर भर देण्याच्या तयारीत होते. सर्वकाही नियोजनाप्रमाणे होत असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि पाणी फेरले. ऊस लागवड तर लांबच पण सततच्या पावसामुळे वेळेवर रब्बीचा देखील पेरा झाला नाही. अजूनही काही भागात वाफसा नसल्याने पेरण्या आणि ( Sugarcane cultivation) ऊसाची लागवड ही रखडलेली आहे. ऊस हे सर्वात मोठे नगदी पिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल हा वाढत आहे. त्यामुळे केवळ पश्चिम महाराष्ट्रातच नाही तर आता मराठवाड्यातही ऊसाचे क्षेत्र वाढताना पाहवयास मिळत आहे. पण यंदा अधिकच्या पावसामुळे अजूनही ऊस लागवड रखडलेली आहे तर रोपवाटिकेतील ऊस हा मागणीअभावी पडून आहे.
खरीप नंतर ऊसाचेच होते नियोजन
यंदा खरीप हंगामातील पिकांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पिकांचे उत्पादन घेण्यापेक्षा खरिपातील नुकसान भरुन काढण्यासाठी ऊस लागवडीच्या तयारीत शेतकरी होते. पश्चिम महाराष्ट्रातील तर क्षेत्र हे वाढणारच होते पण मराठवाड्यात देखील यंदा विक्रमी लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला होता. पण सततचा पाऊस आणि मध्यंतरी झालेली अवकाळी यामुळे रोपवाटिकेतील ऊसाच्या रोपावर याचा परिणाम झाला आहे तर दुसरीकडे शेतात वाफसाच नसल्याने लागवड ही अद्यापही रखडलेलीच आहे.
असे झाले रोपवाटिकांचे नुकसान
हंगामाच्या सुरवातीला पोषक वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात ऊसाची रोप तयार करण्यात आली मात्र, अचानकच मागणी थंडावल्याने रोपवाटिकांमध्ये रोपे ही पडूनच आहेत. सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी ढगाळ वातावरणामुळे वाफसाच नाही. त्यामुळे रोपवाटिकांमधून ऊसाच्या रोपांची निर्मिती ही बंद करण्यात आली आहे. वाढती स्पर्धा, मजुरी, इंधन दरवाढ यातूनही रोपांची निर्मिती केली तरी मागणीच नसल्याने मोठे नुकसान होत आहे. मध्यंतरी ऊस पट्ट्यामध्येच पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे खरिपातील पिकांची काढणी झाली की ऊसाची लागवड शक्यच झाली नाही. आता पाऊस थांबला तरी वातावरणामुळे वाफसे हे झालेलेच नाहीत. शिवाय शेतकऱ्यांनी वेगळ्या पिकाचा विचार केल्याने ऊसाची रोपे ही पडूनच आहेत.
रोपांचे प्रमाण वाढले अन् मागणी घटली
ऊसाचे तयार झालेले रोपाची 25 दिवसांमध्ये लागवड होणे गरजेचे असते. मात्र, आता रोप तयार करुन 2 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. त्यामुळे आता मागणी होते की नाही अशी शंका रोपवाटिका मालकांना आहे. शिवाय मागणी झाली तरी दर हे पाडून मागण्याची भिती आहे. ऑक्टोंबर महिन्यातच ऊसाच्या लागवडीसाठी रोपांची मागणी अपेक्षित होती. मात्र, पावसाने सर्वच गणिते ही बिघडसलेली आहेत. शिवाय रोपवाटिका निर्मिती करण्याचे प्रमाण हे वाढलेले आहे. त्यामुळे स्पर्धा वाढल्याने त्याचाही फटका बसत आहे.