Sugarcane Fire : गाळपापेक्षा फडातच होतेय ऊसाची होळी, महावितरणने हिसकावला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास

ऊस गाळप हंगामाचा सुरवातीचा काळ शेतकऱ्यांसाठी आणि साखर कारखान्यांसाठी अगदी सुखकर होता. पण अंतिम टप्प्यात सर्वकाही व्यर्थ ठरत आहे. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न तर कायम आहेच पण ऊसाला आग लागण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यंदाच्या हंगमात सर्वाधिक ऊसाला आगीच्या घटना घडल्या आहेत शिवाय याला महावितरणच जबाबदार असल्याचे पाहवयास मिळत आहे. बीड जिल्ह्यामध्ये 500 हून अधिक घटना घडल्या आहेत. हे सुरु असतानाच इंदापूर तालु्क्यातील लासुर्णे येथे उसाच्या शेतामध्ये विद्युत तारांचे घर्षण झाल्यामुळे लागलेल्या आगीमध्ये 7 एकर ऊस व ठिबक सिंचन जळून खाक झाले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

Sugarcane Fire : गाळपापेक्षा फडातच होतेय ऊसाची होळी, महावितरणने हिसकावला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास
विद्युत तारांच्या घर्षणामुळे इंदापूर तालुक्यात ऊसाला आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये 7 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 12:20 PM

इंदापूर :  (Sugarcane Sludge) ऊस गाळप हंगामाचा सुरवातीचा काळ शेतकऱ्यांसाठी आणि साखर कारखान्यांसाठी अगदी सुखकर होता. पण अंतिम टप्प्यात सर्वकाही व्यर्थ ठरत आहे. (Excess sugarcane) अतिरिक्त ऊसाचा प्रश्न तर कायम आहेच पण ऊसाला आग लागण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यंदाच्या हंगमात सर्वाधिक (Sugarcane Fire) ऊसाला आगीच्या घटना घडल्या आहेत शिवाय याला महावितरणच जबाबदार असल्याचे पाहवयास मिळत आहे. बीड जिल्ह्यामध्ये 500 हून अधिक घटना घडल्या आहेत. हे सुरु असतानाच इंदापूर तालु्क्यातील लासुर्णे येथे उसाच्या शेतामध्ये विद्युत तारांचे घर्षण झाल्यामुळे लागलेल्या आगीमध्ये 7 एकर ऊस व ठिबक सिंचन जळून खाक झाले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे अशा दुर्घटनांमध्ये शेतकऱ्यांचेच नुकसान होत आहे.

नागरिकांचा प्रयत्नही व्यर्थ

भोसले यांच्या शेतामध्ये विद्युत रोहित्र आहे शिवाय विद्युत तारांची वहिवाटही यांच्या शेतामधूनच आहे. अचानक विद्युत तारामध्ये घर्षण झाल्यामुळे आगीचे गोळी उसामध्ये पडल्याने उसाने पेट घेतला. अवघ्या काही वेळात आगीने रोद्र रुप धारण केले होती. नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र उन व वाऱ्यामुळे आग आटोक्यात आली नाही.

जळालेल्या ऊसाचे होते काय?

आगीच्या दुर्घटनेत होरपळलेल्या ऊसाचे काय होते असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही.आगीमध्ये ऊस जळाला तर कारखान्याकडून त्याची लागलीच तोड होते. शिवाय तो गाळपासाठीही नेला जातो. पण नियमित दरामपेक्षा 30 टक्के रक्कम ही कमी दिली जाते.जळालेल्या ऊसाचे वजन हे कमी भरते. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून केवळ महावितरणकडून पंचनामे आणि मदतीची प्रक्रिया पूर्ण झाली तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळतो.

ऊसाच्या क्षेत्रावरुनच विद्युत तारा

लासुर्णे शिवारात भोसले यांचा 7 एकरामध्ये ऊस असून तोडणीला आला होता. याच उस क्षेत्रावरुन विद्युत तारा गेलेल्या आहेत. सोमवारी वाऱ्यामुळे विद्युत तारांचे घर्षण झाल्याने शॉर्टसर्किटमुळे 7 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. शेती क्षेत्रातून विद्युत तारांची वहिवाट असली तरी योग्य संरक्षण असणे गरजेचे असते. यासंबंधी शेतकऱ्यांनी अनेक वेळा महावितरणकडे विनंती अर्जही केले होते. मात्र, महावितरणच्या दुर्लक्षाचा परिणाम काय होतो याची अनुभती शेतकरी भोसले यांना आली आहे.

ऊसासह शेती साहित्य जळून खाक

शॉर्टसर्किटमुळे भोसले यांच्या शेतातील 7 एकरातील ऊस तर जळून खाक झालाच आहे पण इतर शेती साहित्याचेही नुकसान झाले आहे. ऊस पिकाला पाणी देण्यासाठी भोसले यांनी तब्बल 7 एकरामध्ये ठिबकची सोय केली होती. शिवाय याकरिता लाखो रुपयांची खर्च त्यांनी केला होता. पण अवघ्या काही वेळात सर्वकाही होत्याचे नव्हते झाले आहे. ऊसाचे तर नुकसान झालेच पण इतर शेती साहित्याजी नुकसान भरपाई मिळणार तरी कशी असा सवाल आहे.

संबंधित बातम्या :

Photo Gallery : उन्हाच्या झळा अन् पीक काढणीची लगबग, शेतशिवारातलं नेमकं चित्र काय?

फेब्रुवारीतच खाद्यतेलाला महागाईची फोडणी, दर भडकण्याची शक्यता

कापसाला Record Break दर, हंगामाच्या अंतिम टप्प्यात ‘पांढऱ्या सोन्या’ला अधिक झळाळी, आवकही वाढली

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.