Ravikant Tupkar : मदत करा अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जा..! सरकारच्या भूमिकेवर ‘स्वाभिमानी’ आक्रमक

महागाईचा सामना करीत शेतकऱ्यांनी यंदा चाढ्यावर मूठ ठेवली खरी मात्र, विदर्भात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरिपातील सर्वच पिके ही पाण्यात आहेत. त्यामुळे केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.

Ravikant Tupkar : मदत करा अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जा..! सरकारच्या भूमिकेवर 'स्वाभिमानी' आक्रमक
रविकांत तुपकर, स्वाभिमानी शेतकरी संघटना
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 12:41 PM

बुलडाणा : (Heavy Rain) अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे. आता पूरस्थिती निर्माण होऊन 8 दिवसाचा कालावधी झाला. मात्र, केवळ पाहणी आणि आढावा ही औपचारिकता करण्यात आली आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अद्यापही एक रुपयाचीही (Financial assistance) आर्थिक मदत झालेली नाही. दोन दिवसांमध्ये (Farmer) शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये याप्रमाणे मदत करावी अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा इशाराच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार मंत्रिमंडळाच्या विस्तारात व्यस्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाली कोण असा सवालही तुपकर यांनी उपस्थित केला आहे.

हेक्टरी 50 हजार रुपयांची मागणी

महागाईचा सामना करीत शेतकऱ्यांनी यंदा चाढ्यावर मूठ ठेवली खरी मात्र, विदर्भात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरिपातील सर्वच पिके ही पाण्यात आहेत. त्यामुळे केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे. पाऊस होताच नुकसानीचा आढावा घेण्यात आला पण प्रत्यक्षात मदत अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजर रुपये मदत देणे गरजेचे आहे.

…अन्यथा लोकप्रतिनिधींचे फिरणेही मुश्किल होईल

शेतकऱ्यांसाठी केवळ मोठ-मोठ्या घोषणा केल्या जातात. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने शेतकऱ्यांच्या समस्या ह्या कायम राहत आहेत. सध्या सबंध राज्यातील शेतकरी अडचणीत असताना त्याच्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे तर लोकप्रतिनीधी हे मंत्रिमंडळात वर्णी लागेल या आशेने मुंबई वारी करीत आहेत. पुढील दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत रक्कम मिळाली नाहीतर लोकप्रतिनिधींचे फिरणेही मुश्किल होईल. शिवाय जे परिणाम होतील त्यास शेतकरी जबाबदार राहणार नाही असे तुपकर यांनी ठणकावले आहे.

राज्य सरकार मंत्रिमंडळात व्यस्त

अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना गरज आहे ती आर्थिक मदतीची. यंदाच्या खरिपातून उत्पादन सोडा पण झालेला खर्चही निघतो की नाही अशी स्थिती आहे. असे असताना राज्य सरकार मात्र, मंत्रिमंडळाच्या विस्तारात व्यस्त आहे. शेतकऱ्यांकडे असेच दुर्लक्ष होत गेले तर उद्या लोकप्रतनिधींना त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याचे तुपकर यांनी स्पष्ट केले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.