Sugar Factory: तेरणा सांगा कुणाचा? भैरवनाथ की ट्वेंटी वन, फैसला 31 जानेवारीला..! वाचा सविस्तर
जिल्ह्यातील ढोकी येथील तेरणा शुगर कारखान्यावर कोट्यावधींचे कर्ज असल्याने हा साखर कारखाना गेल्या 9 वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. वाढत्या कर्जाच्या डोंगरानंतर आता कुठे हा कारखाना भाडेतत्वावर देण्याच्या अनुशंगाने उस्मानाबाद जिल्हा बॅंकेने निविदा काढल्या होत्या. मात्र, निविदा प्रक्रियेच्या अनुशंगाने दाखल प्रकरणामध्ये कर्ज वसुली न्यायप्राधिकरण कोर्टाने 31 जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
उस्मानाबाद : जिल्ह्यातील ढोकी येथील तेरणा शुगर कारखान्यावर कोट्यावधींचे कर्ज असल्याने हा (Sugar Factory) साखर कारखाना गेल्या 9 वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. वाढत्या कर्जाच्या डोंगरानंतर आता कुठे हा कारखाना भाडेतत्वावर देण्याच्या अनुशंगाने उस्मानाबाद जिल्हा बॅंकेने निविदा काढल्या होत्या. मात्र, निविदा प्रक्रियेच्या अनुशंगाने दाखल प्रकरणामध्ये कर्ज वसुली (court of justice) न्यायप्राधिकरण कोर्टाने 31 जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश (High Court) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे तेरणा साखर कारखान्याचे काय होणार हे आता या महिन्याअखेरीस स्पष्ट होणार आहे. गेल्या 9 वर्षांपासून वाढत्या कर्जामुळे हा कारखाना बंद होता. मात्र, भैरवनाथ शुगर्सने निविदा भरुन कारखाना भाडेतत्वावर घेण्याची तयारी दर्शिवल्यानंतर निविदांवरुन लातूर येथील ट्वेन्टी वन शुगरने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. आता 31 जानेवारी पर्यंत काय न निर्णय होणार यावरच धुराडी पेटणार का हे ठरणार आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
लातूर-बार्शी रोडवर तेरणा सहकारी साखर कारखाना आहे. मात्र, वाढत्या कर्जामुळे तो गेल्या 9 वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे हा साखर कारखाना किमान भाडेतत्वावर का होईना सुरु व्हावा म्हणून उस्मानाबाद जिल्हा बॅंकेने निविदा काढल्या होत्या. मात्र, अधिकच्या रकमेमुळे पहिल्या टप्प्यात याला प्रतिसादच मिळाला नाही. त्यानंतर सोनारी येथील भैरवनाथ शुगर व ट्वेंटी वन शुगरने यामध्ये सहभाग घेतला होता. मात्र, ट्वेंटी वनची निविदा ही ठरवून दिलेल्या वेळेत मिळाली नसल्याचे सांगत बॅंकेने ती स्वीकारलीच नाही. त्यामुळे ट्वेंटी वन शुगरने थेट कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. त्यामुळे आता वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जात असलेल्या कारखान्याचा निर्णय सध्या प्रलंबित आहे.
दोन्ही कारखान्यांमध्ये स्पर्धा
9 वर्ष बंद असलेल्या हा तेरणा साखर कारखाना सुरु करण्यासाठी आता भैरवनाथ शुगर व ट्वेंटी वन शुगर यांच्यामध्ये स्पर्धा लागल्याचे चित्र आहे. औरंगाबाद खंडपीठाने हे प्रकरण डीआरडी कोर्टात निकाली काढण्याचे आदेश दिल्यानंतर पुन्हा ट्वेंटी वन शुगरने डीआरटी कोर्टात धाव घेतली होती. या कोर्टाने 15 जानेवारीपर्यंत बॅंकेने कोणताही निर्णय घेऊ नये असे आदेश दिले होते. मात्र, याला पुन्हा भैरवनाथ शुगरने औरंगाबाद उच्च न्यायालयात अव्हान दिले होते. त्यानुसार आता डीआरडी कोर्टाने 31 जानेवारी पूर्वी या दोन्ही साखर कारखान्यांचे प्रकरण निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तेरणा साखर कारखाना हा भाडे तत्वावर भैरवनाथकडे येणार ट्वेटीं वनकेडे याचा निकाल आता 31 जानेवारीपर्यंत लागणार आहे.
संबंधित बातम्या :
दुष्काळात तेरावा : निसर्गाचा लहरीपणा अन् बोगस बियाणे, उत्पादनावरील खर्चानेच शेतकरी मेटाकूटीला
Animal Bloating : कशामुळे फुगते जनावरांचे पोट? काय आहे उपाययोजना, वाचा सविस्तर