कोरोनाच्या संकटात आदिवासी युवकांच्या प्रयत्नांना मोठं यश, गुळवेल पुरवठ्यासाठी मिळाली दीड कोटी रुपयांची ऑर्डर

कोरोना संकटाच्या काळात ठाण्यातील कातकरी समुहाच्या लोकांना गुळवेल गोळा करुन पुरवठा करण्यासाठी ऑर्डर मिळाली आहे. tribal people group giloy

कोरोनाच्या संकटात आदिवासी युवकांच्या प्रयत्नांना मोठं यश, गुळवेल पुरवठ्यासाठी मिळाली दीड कोटी रुपयांची ऑर्डर
गुळवेल संकलन
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 10:48 AM

मुंबई: ठाणे जिल्ह्यातील आदिवासी समुहाला एक कोटी सत्तावन्न हजार रुपयांचा गुळवेल पुरवठा करण्याची ऑर्डर मिळाली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या लढ्यात गुळवेलमध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांचा वापर रुग्ण बरे होण्यासाठी व्हावा म्हणून हा प्रयत्न करण्यात येत आहे. आयुर्वेदात याला गुडुची असं म्हटलं जाते. गुळवेलाचा वापर व्हायरल ताप, मलेरिया, शुगर अशा आजारांमध्ये औषध म्हणून केला जातो. कोरोना संकटाच्या काळात ठाण्यातील कातकरी समुहाच्या लोकांना गुळवेल गोळा करुन पुरवठा करण्यासाठी ऑर्डर मिळाली आहे. (Thane based tribal people group got order of RS 1 crore 57 lakh to supply of giloy )

ट्रायफेडकडून मिळाली ऑर्डर

गुळवेल जमा करुन पुरवठा करण्याची ऑर्डर ट्रायफेडकडून देण्यात आली आहे. भारतीय जनजातीय सहकारी विपणन विकास परिसंघ (TRIFED) यांच्याकडून गुळवेल खरेदी करण्यात येणार आहे. ट्रायफेड ही आदिवासी समुहाकडून तयार करण्यात आलेली उत्पादन विकण्यासोबत समन्वयक म्हणून देखील काम करते.

1800 लोक कार्यरत

ठाण्यातील आदिवासी 27 वर्षांच्या सुनील या युवकानं सुरुवातीला 10  ते 12 मित्रांच्या सहकार्यानं गुळवेल गोळा करणे आणि कंपन्यांना पुरवठा करण्याचं काम सुरु केलं होतं. सुनील यांच्या ग्रुपसोबत आता 1800 हून अधिक लोक जोडले गेले आहेत. ट्रायफेडच्या सहकार्यानं सुनील यांनी कामाची व्याप्ती वाढवली आहे. सुनील यांना निधीची आवश्यकता होती, त्यावेळी ट्रायफेडकडून 25 लाखांची मदत देखील करण्यात आली.

डाबरकडून ऑर्डर मिळण्याची शक्यता

सुनील त्यांच्या कामाविषयी बोलताना सांगतात की, कोरोनाच्या संकटकाळात आम्ही स्वत:च्या कमाईवर जगतोय याचा आनंद वाटतो. आमच्याकडे आता 1.5 कोटी रुपयांची ऑर्डर आहे. पुढील काळात डाबर कडून देखील ऑर्डर मिळू शकते, असं सुनील म्हणाले.

पावडर बनवून विकणार

सुनील सांगतात की ते आतापर्यंत गुळवेल जमवून कंपन्यांना विकत होते. त्याला दर कमी मिळतो आता मात्र पुढील काळात गुळवेल पावडर करुन विकणार आहोत. यामुळे एक किलो पावडरला आम्हाला 500 रुपयापर्यंत दर मिळेल. गुळवेलची वाढती मागणी लक्षात घेता पुढील काळात कमतरता जाणवू नये म्हणून त्याची रोपवाटिका तयार करणार असल्याचं त्यांनी सांगतिल.

इतत बातम्या:

चांगली बातमी! सरकारने 89 लाख करदात्यांच्या खात्यात पैसे केले जमा, जाणून घ्या 

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्कने प्रतितास 127 कोटी रुपये कमावले, जाणून घ्या कसे? (Thane based tribal people group got order of RS 1 crore 57 lakh to supply of giloy )

Non Stop LIVE Update
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.